राजीव गांधींच्या मारेकऱ्याला प्रियांका गांधी भेटल्या अन तिला माफ देखील केलं होतं

२१ मे १९९१. वेळ सकाळची १०.२१. ठिकाण तामिळनाडू चेन्नईजवळील श्रीपेरुंबदुर. राजीव गांधी कार्यक्रमाच्या दरम्यान मोठ्या घोळक्यात उभे होते. तेवढ्यात त्यांना काही शाळकरी मुली आणि महिला भेटायला आल्या होत्या, त्यात धनू नावाच्या मुलीने राजीव गांधी यांची भेट घेतली, त्यांना शुभेच्छा दिल्या. त्यानंतर तिने त्यांच्या पायाला स्पर्श करण्याच्या बहाण्याने खाली वाकली आणि तिच्या कपड्यातील आरडीएक्सने भरलेल्या बेल्टचे डिटोनेटर दाबले. … एक मोठा स्फोट झाला. राजीव गांधी यांच्यासहित आणि धनू तसेच जवळ असलेलय जवळपास १५ जणांचा जागीच मृत्यू झाला.

या गंभीर कटाचा भाग असलेल्या आरोपींना शोधण्यात आलं आणि तामिळनाडू सरकारने अटक केली. या प्रकरणी मुरुगन, संथन, पेरारिवलन, जयकुमार, रॉबर्ट पायस, रविचंद्रन आणि नलिनी हे सात जण जन्मठेपेची शिक्षा भोगत आहेत. 

पण याच सरकारने राजीव गांधी हत्या प्रकरणातील सात आरोपींपैकी एक असलेल्या नलिनी श्रीहरन यांचा आज पॅरोल मंजूर केला आहे. तिच्या आईने तिला एका महिन्याचा पॅरोल मिळावा म्हणून याचिका दाखल केली होती. त्या याचिकेत म्हटले होते की, तिला अनेक आजार आहेत आणि आपल्या आयुष्याच्या शेवटी आपल्या मुलीने आपल्यासोबत राहावे अशी तिची इच्छा आहे. अखेर तिला पॅरोल मिळाला. 

गांधी घराण्याने सगळं विसरून नलिनीला फाशी माफ केली होती. 

नलिनी यांना न्यायालयाने फाशीची शिक्षा सुनावली होती, परंतु राजीव गांधी यांच्या पत्नी काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांनी प्रियांका गांधींच्या विनंतीवरून नलिनी यांच्या फाशीची शिक्षा जन्मठेपेत बदलण्यासाठी सन २००० मध्ये अपील केले होते. अपील मान्य करण्यात आले. नंतर नलिनीने आपल्या कृत्याबद्दल खेद देखील व्यक्त केला होता. २० वर्षे तुरुंगात घालवल्यामुळे नलिनी यांनी नंतर आपली सुटका व्हावी, असा अर्ज न्यायालयात दाखल केला, परंतु तिला काय सुटका मिळाली नाही. 

पण याच संबंधातील एक घटना देखील आपल्याला विचार करायला भाग पाडते..ती म्हणजे जेंव्हा प्रियांका गांधी या नलीनीला तुरुंगात भेटण्यासाठी गेलेल्या…

ती तुरुंगात शिक्षा भोगत होती तरी ती, गेल्या काही वर्षांत ती अनेक कारणांमुळे चर्चेत आहे.” राजीव गांधी असैसिन: हिडेन ट्रुथ्स’ नलिनी मीटिंग” या पुस्तकात, नलिनी श्रीहरन यांनी प्रियंका गांधी वड्रा यांच्याशी झालेल्या भेटीचे तपशील शेअर केले आहेत. 

त्याचाच एक भाग म्हणजे, नलिनीने स्वतः सांगितले होते की, माजी पंतप्रधानांची कन्या प्रियांका गांधी जेव्हा त्यांना पहिल्यांदा भेटली तेंव्हा नेमकं काय घडलं होतं. 

माजी पंतप्रधान राजीव गांधी यांची मुलगी प्रियंका वाट पाहत असलेल्या खोलीत नलीनीला घेऊन गेले आणि नलीनीला धक्काच बसला…. तुरुंगात एवढं हाय प्रोफाईल व्यक्तिमत्व तिची भेट घेईल अशी तिला  अपेक्षा नव्हती. “मी प्रियांका आहे,” हिरव्या साडीत घातलेल्या राजीव गांधींच्या मुलीने स्वतःची ओळख करून दिली. “माझे नाव प्रियांका आहे,” तिने खुर्चीवर बसून पुन्हा पुन्हा सांगितले, स्तब्ध नलिनी तिच्याकडे टक लावून पाहत उभी होती”. प्रियांका गांधींनी नलीनीला बसायला सांगितले. प्रियांका जवळजवळ दोन मिनिटे नलीनीला पाहतच राहिल्या. त्या ठिकाणची शांतता भयावह होती. 

नलिनीने मान वर केली आणि तिने प्रियांका यांच्याकडे पाहिले. प्रियांका खूप  होत्या, त्यांचे गाल लाल झाले होते. थरथरत्या ओठांनी त्यांनी विचारलं,

“माझे वडील खूप चांगले व्यक्ती होते तू त्यांच्यासोबत असं का केलं? तुला त्यांच्याशी जी काही समस्या होती ती बोलवून सोडवू शकली असतीस”

असं म्हणत त्या ओक्सोबोक्शी रडायला लागल्या.

नलिनी यांचा हवाला देत या पुस्तकात लिहिले आहे की, ‘मला वाटायचे की, वडिलांच्या घरी परतण्याची वाट पाहणाऱ्या १७ वर्षांच्या त्या मुलीला टीव्हीवरच्या बातम्यांमधून कळलं कि, आपले वडील गेले, या जगात नाहीत”. नलीनीने उत्तर दिले कि, ‘मॅडम, मला काहीच माहीत नाही. मी मुंगीलाही इजा करू शकत नाही. मी परिस्थितीची कैदी आहे. मी स्वप्नातही कोणाचे नुकसान करण्याचा विचार केला नव्हता.”

प्रियांकाने पुन्हा नलिनीला विचारले की तू स्वतःहून गुन्हा स्वीकारला आहेस का?

नलिनीने उत्तर दिले की, “माझ्यावर सतत मानसिक आणि शारीरिक अत्याचार करण्यात आले. त्यांना मला ग्लुकोज द्यायचे होते. जेंव्हा त्या अधिकाऱ्याने माझ्या ड्रेसवर हात ठेवला तेव्हा मी आणखी लढू शकले नाही. मी शरणागती पत्करली आणि त्यांना पाहिजे असलेल्या कबुलीजबाबावर मी सही केली”.

प्रियांकाने विचारले की तुम्हाला त्या आत्मघातकी हल्लेखोरांबद्दल माहिती आहे का? यावर नलिनी म्हणाली की मला त्यांच्याबद्दल काहीच माहिती नाही. नलिनी यांच्या म्हणण्यानुसार, प्रियांका गांधी यांनी त्यांच्याशी ज्या पद्धतीने वागल्या ते पाहून नलिनी खूप प्रभावित झाली होती. तेंव्हा तिने असाही म्हणाली कि प्रियांका गांधी नक्कीच एका मोठ्या राजकीय चळवळीचे नेतृत्व करू शकते असे मला वाटले.

प्रियांका यांनी आपल्या वडिलांच्या मारेकऱ्याला माफ करणं म्हणजे फार मोठी गोष्ट होती.  

हा सगळं वृत्तांत ज्यात आहे ते पुस्तक जवळपास ६०० पानांचं आहे. ज्याची प्रस्तावानंच तमिळ नेत्यांनी १०० पानांमध्ये लिहिली आहे.

 Webtitle : Priyanka Gandhi met and forgive Rajiv Gandhi’s killer

हे हि वाच भिडू :

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

Leave A Reply

Your email address will not be published.