प्रियांका गांधी यूपी निवडणुकांच्या आधी तिथे महाराष्ट्र मॉडेलचा प्रयोग करणार आहेत..
येत्या २०२२ ला मार्च महिन्यात उत्तर प्रदेशातल्या सध्याच्या सरकारचा कार्यकाळ संपणार असून राज्यात विधानसभा निवडणूक होणार आहेत. या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सगळ्याचं पक्षांनी आपापली रणनीती आखून जय्यत तयारी सुरु केलीये.
सत्ताधारी पक्ष भाजप ब्रँड योगीच्या बॅनरखाली निवडणुकीची तयारी करतंय. तर काँग्रेससुद्धा तगडी टक्कर देत मोठी खेळी खेळणार असल्याचं म्हंटल जातंय. ज्यात मागल्या वेळच्या चुका पुन्हा होणार नाहीत यावर सर्वाधिक भर दिला जातोय.
सध्या काँग्रेस उत्तर प्रदेशात प्रियांका गांधी यांच्या नेतृत्वात निवडणूक लढवतंय. याचं साखळीत प्रियंका गांधी ३० वर्षांनंतर संघटनेची पुनर्बांधणी करण्याची शक्यता वर्तवली जातेय. ज्यासाठी काँग्रेस नेतृत्व महाराष्ट्र मॉडेलवर काम करणार असल्याचं समजतंय.
काय आहे महाराष्ट्र मॉडेल ?
खरं तर, या वर्षाच्या सुरुवातीला बाळासाहेब थोरात यांनी महाराष्ट्र काँग्रेस प्रदेशाध्यक्ष पदाचा राजीनामा दिला. आता यामागचं कारण तरी स्पष्ट केलं गेलं नाही, परंतु राज्यात काँग्रेस पक्षाला आणखी मजबुती मिळावी, यासाठी प्रदेशाध्यक्ष पदात बदल केल्याचं उत्तर त्यावेळी काँग्रेसच्या बड्या नेत्यांनी दिलं. कारण बाळासाहेब थोरात यांच्याकडे आधीच मंत्रिपद होतंच, सोबत अनेक जबाबदाऱ्या होत्या.
यांनतर महिन्याभरात नाना पटोले यांची काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षपदी निवड करण्यात आली. त्याआधी पटोलेंनी महाराष्ट्र विधानसभेच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला होता. आणि नंतर प्रदेशाध्यक्षपदाची सूत्र हाती घेतली होती.
एवढंच नाही तर काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांनी शिवाजीराव मोगे, बसवराज पाटील, मोहम्मद आरिफ नसीम खान, कुणाल रोहिदास पाटील, चंद्रकांत हंडोरे आणि प्रणती शिंदे या पाच नेत्यांवर कार्यकारी अध्यक्षपदाची जबाबदारी सोपवली होती. सोबतच, १० उपाध्यक्षांची नेमणूक केली. संसदीय मंडळ आणि आगामी नागरी निवडणुकांसाठी धोरण, स्क्रीनिंग आणि समन्वय समितीही स्थापन करण्यात आली होती.
याचा बदलाचा परिणाम महाराष्ट्रात दिसून आला. राज्यात काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेना यांचा महाविकास आघाडी सरकारचा कारभार नीटनेटका चालूच आहे. सोबतचं, स्थानिक स्वराज निवडणुकांमध्ये सुद्धा काँग्रेसला पहिल्यापेक्षा चांगली खेळी करता आली.
आता असाचं काहीसा प्लॅन प्रियांका गांधी यांच्या नेतृत्वात काँग्रेस आखायच्या तयारीत आहे. कारण काही माध्यमांच्या म्हणण्यानुसार युपी काँग्रेसमधले काही नेतेमंडळी प्रदेशाध्यक्ष अजय सिंह लल्लू यांच्या कारभारावर नाराज आहेत. त्यामळे राज्यात पक्षांतर्गत वाद पेटण्याची भीती निर्माण झालीये.
आधीच पंजाब आणि छत्तीसगड काँग्रेसमधली पक्षपक्षातली भांडण सोडवता सोडवता हायकंडला नाकीनऊ आलीत. अश्यात निवडणुकीला काहीचं दिवस शिल्लक असताना प्रियांका गांधींना उत्तर प्रदेशात कोणताही राडा व्हायला नको किंवा गटबाजी नको आहे.
म्ह्णूनचं, काँग्रेस पक्षात काही बदल करण्यात येणार असल्याचे बोलले जातेय. त्याच दृष्टीने पक्षातील असंतुष्ट नेते आणि जातीय समीकरण यावर लक्ष दिले जाणार आहे.
महत्वाचे म्हणजे, काँग्रेस पक्ष उत्तर प्रदेशात सगळ्याच्या सगळ्या ४०३ विधानसभा जागांवर लक्ष देणार नाहीये. माहितीनुसार त्यांचं लक्ष फक्त १०० जागांवर असणार आहे. म्हणजे फक्त १०० उमेदवार उभे करून त्यांच्यावर जास्त भर देऊन विजयांनंतर सत्ता स्थापन करण्यात इतर पक्षांसोबत युती करता येईल, असाचं काहीसा प्लॅन काँग्रेस हायकमांडच्या डोक्यात आहे.
म्हणजे कसं, १०० उमेवार उभे केले आणि त्यांच्याकडं जास्त लक्ष दिले जाईल. आणि यातल्या ८० जागा जरी जिंकल्या तरी काँग्रेसला टेंशन राहणार नाही. कारण ८० जागा जरी जिंकल्या तरी त्यांच्याशिवाय सरकार बनवणं अवघडं होईल.
दरम्यान, गेल्या विधानसभा निवणुकीवेळी म्हणजे २०१७ ला काँग्रेसने १०५ उमेदवार मैदानात उतरवले होते. मात्र या निवडणुकीत काँग्रेसला जबरदस्त फटका बसला होता. या १०५ उमेदवारांपैकी काँग्रेसच्या फक्त ७ जागा निवडून आल्या होत्या. त्यामुळे यंदा काँग्रेस जोमाने तयारीला लागलंय. पक्ष टार्गेट ठेवलेल्या जागा आणण्यासाठी पूर्ण ताकद लावतंय.
उत्तर प्रदेशाच्या यंदाच्या विधानसभा निवडणुकीत प्रियांका गांधी मोठा चेहरा आहेत. माहितीनुसार, या प्लॅनसोबतचं प्रियांका गांधींची यूपी योजना आणखी एक मोठं सरप्राईज असणारं आहे.
हे ही वाचं भिडू :
- उत्तरप्रदेशच्या राजकारणात अमिताभ ठाकूर यांच्यामुळे येणारी वादळ नवीन नाहीत
- युपी निवडणूकीच्या तोंडावर बसपा आणि काँग्रेसमुळे अखिलेश यादव अस्वस्थ का आहेत?
- युपीच्या निवडणुकीसाठी आम आदमी पार्टी तिरंगा झेंडा घेऊन उतरलीय