प्रियंका गांधी तर भेटल्या, मग राहूल गांधी सिद्धूवर नाराज आहेत काय?

पंजाब काँग्रेसमध्ये सुरु असलेला वाद हळू – हळू प्रत्येकालाच क्लियर कट कळायला लागलाय. राज्यात कॅप्टन अमरिंदर सिंग यांच्या नेतृत्वात काँग्रेस पक्ष सत्तेत आहेत, मात्र पक्षातल्याच काही काही नेतेमंडळींना कॅप्टनचं नेतृत्व खटकायला लागलय. त्यात  पुढच्या वर्षी  राज्यात  विधानसभा निवडणूका आहेत आणि त्याआधी पक्ष दोन गटांमधी विभागला गेलाय. या नाखुश नेत्यांमधलं  महत्वाचं नाव म्हणजे  नवज्योतसिंग सिद्धू.

नवज्योतसिंग सिद्धू आणि कॅप्टन मधली ही भांडण उघड आहेत.  सिद्धू बऱ्याचदा कॅप्टनच्या  विरोधात बोलताना दिसतायेत. त्यांच्या म्हणण्यानुसार मुख्यमंत्री आमदारांना साधं भेटत सुद्धा नाहीत. त्यामुळं अर्थातच काम राखडताते. आणि हाच सूर पक्षातल्या इतर नेत्यांनी सुद्धा लावून धरलाय. 

त्यात अनेकांना  नवज्योतसिंग सिद्धू पक्षाचं भविष्य म्हणून दिसायला लागलेत. पण कॅप्टन अमरिंदर सिंग यांची मुख्यमंत्री होण्याची  हौस काय पूर्ण होईना. मग काय नवज्योतसिंग गप्प बसणाऱ्यातले थोडीना आहेत. त्यांनी माध्यमातून, सोशल मीडियावरून आवाज उठवायला सुरुवात केली. आणि हे प्रकरण थेट जाऊन पोहोचलं दिल्ली दरबारात. काँग्रेन हा मिटवायचा  प्रयत्न केला पण तोडगा काय निघाला नाही.

दरम्यान, त्यांनतर आता नवज्योतसिंग सिद्धू यांनी बुधवारी दिल्लीत पक्षाच्या सरचिटणीस प्रियंका गांधी यांची भेट घेतली. आता या भेटीमागचं कारण काय असणार हे काय नव्याने सांगायला नको. पण या भेटीनंतर सिद्धूंचा आनंद काय लपून राहिला नाही.  त्यांनी  ट्विटरवर प्रियंकासोबत भेटीचा एक फोटो शेअर केलाय. यात सिद्धू पूर्ण आत्मविश्वासाने भरलेले पाहायला मिळतात तर  प्रियांका गांधींच्या चेहऱ्यावरचं मंद हसूही काही लपून राहिलेलं नाही. 

आता या हसण्यामागच नेमकं कारण काय? याच उत्तर तर अजून काही मिळालं नाही पण यामुळे बरेच प्रश्न मात्र  डोक्यात यायला लागलेत.  म्हणजे पंजाबात आता सगळं नीट होणार का ? सिद्धू आणि कॅप्टन यांना एकमत करण्यात हाय कमांड यशस्वी होणार का? सिद्धू यांच्या या शेअर केलेल्या या फोटोनंतर अमरिंदर सिंगाना काय वाटलं?

यात सांगल्यात महत्वाचं म्हणजे सिद्धू एवढी पायपीट करत दिल्लीला गेले खरे पण राहुल गांधींना न भेटता आले. यावरून राहूल सिद्धूंवर नाराज तर नाही ना? असे अंदाज बांधायला सुरुवात झालीये. कारण राहुल  गांधी सिद्धूंना नाही भेटले, पण प्रियांका गांधी  सिद्धूंना भेटल्यानंतर सोनिया गांधी आणि राहुल गांधींना मात्र आवर्जून भेटल्या. 

सिद्धू यांच्या ऑफिसातनं फोन गेला कि, त्यांना राहुल गांधींची भेट घ्यायचीये. दरम्यान, काँग्रेसच्या माजी अध्यक्षांनी सांगितलं कि, आजसाठी कोणतीच बैठक निश्चित नसणारे. हेच राहुल गांधींना विचारलं तर त्यांनी अशी कोणतीही बैठक नाकारली. त्यामुळं राहुल गांधी सिद्धूवर नाराज असल्याच्या बातम्या समोर येऊ लागल्यात.

राहुल गांधींना मिळतायेत सगळे अपडेट

राहुल गांधी प्रत्यक्ष सगळ्यांसमोर येऊन याबाबत बोलत नसले तरी ते सगळ्या प्रकारावर लक्ष  ठेवून आहेत. याआधी जेव्हा हा वाद हाय कमांडपर्यंत पोहोचला होता, तेव्हाही राहुल गांधीही पंजाबातल्या डझनभर मंत्र्यांना फोन केला होता. त्यांनतर गेल्या आठवड्यात सुद्धा पंजाब कॉंग्रेसचे अध्यक्ष सुनील जाखड़, अर्थमंत्री मनप्रीतसिंग बादल, खासदार प्रतापसिंह बाजवा आणि मनीष तिवारी यांनी राहुल गांधींची भेट घेतली. राहुल गांधींना पंजाबात वाढत्या भांडणाची संपूर्ण माहिती देण्यात आली. 

या बैठकीनंतर सुनील जाखड म्हणाले,  ‘काही चुकीचे लोक आमदारांच्या कुटुंबियांना नोकरी देण्याच्या निर्णयावर मुख्यमंत्र्यांना सल्ला देतायेत. तसेच त्यांनी सांगितले कि, नवज्योतसिंग सिद्धू यांच्या मुद्दय़ावर पक्षाचे नेतृत्व चर्चा करीत आहे.

विरोधी पक्ष संधिसाधुच्या भूमिकेत 

काँग्रेसच्या या वादा दरम्यान बाकीचे पक्ष आपापली पोळी भाजून घेण्याच्या तयारीत आहेत. आम आदमी पक्षाचे नेते अरविंद केजरीवाल पंजाबमध्ये सक्रिय झालेत. दुसरीकडे अकाली दल आणि बसपानं  कित्येक वर्षानंतर पुन्हा एकत्र येत करार केलाय. यात पडद्यामागूनही भाजप देखील चांगलीच तयारी करतंय. अश्यात काँग्रेसनं आपली एकी टिकवून निवडणुकीची तयारी सुरू करणं   फार महत्वाचं आहे.  पण  सिद्धू यांना कॅप्टनला हटवून त्यांची जागा घ्यायचीये, असे बोललं जातंय. ज्यामुळंच वाद पेटंत चाललंय. 

दरम्यान, प्रियंका गांधींची भेट घेण्यापूर्वी नवज्योत सिंग सिद्धू यांनी पुन्हा एकदा  कॅप्टनवर लिमिट क्रॉस करत हल्लाबोल केला. पण प्रियांकांच्या भेटीनंतर त्यांच्या चेहऱ्यावर आलेली स्माईल कॅप्टन डोकेदुखी वाढवणार एवढं मात्र नक्की.

हे ही वाच भिडू :

Leave A Reply

Your email address will not be published.