एकही निवडणूक न जिंकलेली उमेदवार ममता दीदींना चॅलेंज देणार का?
पश्चिम बंगाल, समसेरगंज, जंगीपूर आणि भवानीपूरच्या तीन विधानसभा जागांसाठी पोटनिवडणूक ३० सप्टेंबर रोजी होणार आहे. मुख्यमंत्री ममता बॅनर्जी भवानीपूरमधून लढणार आहेत. ममता यांचा शुभेंदू अधिकारी यांनी नंदीग्राममध्ये १९५६ मतांनी पराभव केला होता, त्यामुळे त्यांना मुख्यमंत्री पद टिकवण्यासाठी निवडणूक जिंकणे आवश्यक आहे…
जर त्या या पोटनिवडणूकीत हरल्या तर त्यांचं मुख्यमंत्री पद जाऊ शकतं!
आता हि निवडणूक त्यांच्यासाठी आणखीनच अवघड झाली आहे. कारण भाजपने ममतांच्या विरोधात त्यांचा एक उमेदवार दिला आहे. त्यांचं नाव आहे वकील प्रियांका तिब्रेवाल.
भाजपच्या एका वरिष्ठ नेत्याने सांगण्यानुसार, प्रियांका यांचे नाव निश्चित झाले आहे, आता फक्त या प्रक्रीयेची औपचारिकता बाकी आहे. प्रियंका या भाजपसाठी पहिली पसंती नव्हती. तर या निवडणुकीला नंदीग्रामसारखा रंग देता यावा म्हणून पक्षाला एक मोठा चेहरा लाँच करायचा होता, पण सर्व मोठ्या नेत्यांनी ममतांच्या विरोधात जाण्यास नकार दिला.आणि शेवटी प्रियांका याचं नाव ठरलं.
विधानसभा निवडणुकीपूर्वी भाजपमध्ये सामील झालेल्या मिथुन चक्रवर्ती यांच्याशीही पक्षाने संपर्क साधला होता, परंतु त्यांनी ही निवडणूक लढवण्यास नकार दिला.
भाजपचे मोठे नेते जमानत जप्त होण्याची भीती बाळगून आहेत त्यामुळे त्यांना बदनामीची भीती आहे नाही.
ममता यांच्या विरोधात रिंगणात उतरलेल्या प्रियंका या विधानसभा निवडणुकीतही पराभूत झाल्या.
आता प्रियांका तिब्रेवाल ज्यांना भाजपने उमेदवारी दिली आहे. त्या नुकत्याच पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीतही एंटलीमधून पक्षाच्या उमेदवार होत्या, परंतु तृणमूलच्या स्वर्ण कमल यांनी त्यांना ५८,२५७ मतांच्या फरकाने पराभूत केले. प्रियांकाला २०१५ मध्ये कोलकाता महानगरपालिका निवडणुकीत बॉण्ड क्रमांक ५८ वरून भाजपने उमेदवारी दिली होती, जेव्हा त्यांचा टीएमसीच्या स्वपन समदरने पराभव केला होता.
२०२० च्या ऑगस्टमध्ये भाजपने प्रियांकाला भारतीय जनता युवा मोर्चाचे प्रदेश उपाध्यक्ष बनवले होते.
बंगालमधील काही पत्रकार म्हणतायत कि, ममतांचा विजय निश्चित आहे. त्या किमान ५० हजारच्या मतांच्या फरकाने ही निवडणूक जिंकतील, त्यामुळे कोणत्याही मोठ्या नेत्याला त्यांचे नाव खराब करायचे नाही त्यामुळे कुणीही त्यांच्याविरोधात उभे राहणार नाहीत.
काँग्रेसने मात्र ममतांच्या विरोधात उमेदवार उभा केला नाही.
काँग्रेसने ममता बॅनर्जी यांच्याविरोधात उमेदवार उभा न करण्याचा निर्णय घेतला आहे. विधानसभा निवडणुका काँग्रेस आणि डाव्यांनी युती करून लढवल्या होत्या. दुसरीकडे, डाव्यांनी श्रीजी बिस्वास यांना उमेदवार बनवण्याचा निर्णय घेतला आहे पण काँग्रेस युतीमध्ये असूनही त्यांच्यासाठी प्रचार करणार नाही.
राजकीय तज्ञांचे म्हणणे आहे की टीएमसी केवळ भवानीपूरच नाही तर समसेरगंज आणि जंगीपूर जागाही जिंकण्याची शक्यता आहे.
दीदींनी निवडणूक लढवण्यासाठी भवानीपूरचीच निवड का केली?
ममता बॅनर्जी यांनी याधी देखील भवानीपूरमधूनच पोटनिवडणूक लढवली होती आणि त्या निवडून आल्या होत्या.
ममता बॅनर्जी यांच्या टीएमसी पक्षाची सत्ता पहिल्यांदाच २०११ मध्ये सत्तेत आली होती. त्यानंतर टीएमसीने ३४ वर्षांचा डावा किल्ला पाडला. त्या वर्षी ममता बॅनर्जींनी भवानीपूरमधूनच पोटनिवडणूक लढवली होती आणि त्या सुमारे ५४ हजार मतांच्या फरकाने विजयी झाल्या होत्या. २०१६ मध्येही ममता बॅनर्जी यांनी या जागेवरून निवडणूक लढवली, जरी त्यांच्या विजयाचे अंतर ५४ हजारांवरून २५ हजारांवर आले होते.
२०११ मध्ये या जागेवर भाजपला फक्त ५०७८ मते मिळाली होती, पण २०१४ च्या मोदी लाटेत हा आकडा ४७ हजारांच्या पुढे गेला आहे.
२०१९ च्या लोकसभा निवडणुकीत, टीएमसीच्या माला रॉय यांनी येथून निवडणूक लढवली आणि भाजपचे उमेदवार चंद्र कुमार बोस त्यांच्या समोर होते. मग भवानीपूरमधून टीएमसी फक्त ३१६८ मतांची आघाडी घेऊ शकली. त्याचप्रमाणे २०१५ च्या कोलकाता महापालिका निवडणुकीत भाजपने भवानीपूरचा प्रभाग क्रमांक ७० जिंकला होता.
२०२१ च्या विधानसभा निवडणुकीत तृणमूल काँग्रेसचे शोभनदेव चट्टोपाध्याय यांनी भाजपच्या रुद्रनील घोष यांचा २८,००० मतांच्या फरकाने पराभव केला. टीएमसीच्या सलग विजयामुळे ममता बॅनर्जींनी पुन्हा निवडणुकीसाठी भवानीपूरची निवड केली आहे. याच ठिकाणी कालीघाटही येते, जिथे त्यांचे घर आहे.
ममता तिसऱ्या मुख्यमंत्री आहेत ज्या निवडणूक हरल्या आहेत.
ममता पश्चिम बंगालच्या तिसऱ्या मुख्यमंत्री आहेत, ज्यांनी स्वतः निवडणूक हरली आहे. त्यांच्या आधी १९६७ मध्ये प्रफुल्ल चंद्र सेन होते त्यांनी देखील निवडणूक हरली होती. आणि २०११ मध्ये बुद्धदेव भट्टाचार्यही हे देखील त्यांचीन जागा वाचवू शकले नव्हते. पण आता येणारी पोटनिवडणूक ममता यांच्यासाठी जिंकणं अत्यंत महत्वाचं झालंय कारण कधी काय फासे उलटे फिरू शकतात काही सांगता येत नाही.
त्यामुळे प्रियांका तिब्रेवाल यांच्यासारख्या एकही निवडणूक न जिंकलेली उमेदवाराने ममता दीदींना चॅलेंज दिलं आहे त्यामुळे अजूनही मुख्यमंत्री पद राहणार किं जाणार अशी टांगती तलवार ममता दीदींवर आहे.
हे हि वाच भिडू :
- ही साधी पोटनिवडणूक नाही तर ममता दिदींच्या मुख्यमंत्रीपदाचा प्रश्न निर्माण झालाय..
- हे तर काहीच नाही, ममता दीदी तर थेट जयप्रकाश नारायणांच्या गाडीवर चढून नाचलेल्या.
- भाजप जाऊ दे ममता दीदींनी काँग्रेसला देखील सुरुंग लावलाय.