प्रजासत्ताक दिनाची शान असलेल्या चित्ररथांची निवड नक्की कशी केली जाते

२६ जानेवारीला शाळेतुन झेंडावंदन करून आल्यानंतर एक ठरलेला कार्यक्रम असायचा. शाळेतुन पळत यायचं आणी टीव्हीवर झेंडा डीडी नॅशनल लावयचं. मग खिशातून शाळेत वाटलेलं एक एक चॉकलेट खिशातून काढून मस्त प्रजसत्ताक दिनाची परेड बघत बसायची. महाराष्ट्राचा रथ दिसल्यावर तर उभा राहून टाळ्या पण पिटल्या आहेत

मॅडमनी भारत हा विविधतेने नटलेला एक देश आहे हे हजारवेळा सांगितलं पण कळलं फक्त रिपब्लिक डेची परेड पाहूनच.

आता या रिपब्लिक डेच्या रथांवरूनच वाद सुरु झालेत.  केरळ आणि पश्चिम बंगाल यांचे रथ रिजेक्ट करण्यात आले आहेत. या राज्यांनी केंद्रांनी मुद्दामून आमच्या रथाची थीम नाकारली असं म्हटलंय. वेस्ट बंगालची या प्रजासत्ताक दिवसाच्या परेडसाठी थीम होती सुभाषचंद्र बोस यांची जीवनगाथा तर केरळने समाज सुधारक श्री नारायण गुरु यांच्या कार्याबद्दल सांगायचं ठरवलं होतं.

केंद्राने कोणतेही ठोस कारण न देता आमचे रथ रद्द केल्याचं या राज्याचं म्हणणं आहे.

सरकारने परेडसाठी निवडलेली यादी जाहीर करणे बाकी असताना, सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, परेडमध्ये २१ झांकी असतील, ज्यात १२ राज्ये आणि केंद्रशासित प्रदेश आणि केंद्र सरकारच्या अंतर्गत विभागाच्या नऊ झाकी असतील. त्यामुळं आता बघू तरी नक्की हे रथ कोण सिलेक्ट करतं, त्यासाठी नेमके कोणते निकष वापरले जातात आणि सरकराचा हे रथ निवडण्यात खरंच केंद्राचा सहभाग किती असतो.

तर रथांच्या आयोजनाची जबाबदारी असते संरक्षण मंत्रालयावर. 

जरवर्षी सप्टेंबरच्या सुरवातीलाच संरक्षण मंत्रालय सर्व राज्ये, केंद्रशासित प्रदेश, केंद्रसरकारचे जवळपास ८० विभाग त्याचबरोबर इलेक्शन आयोगांसारख्या संविधानिक संस्था यांना आपापल्या रथांची संकल्पना कळवण्यास सांगते. मग सप्टेंबरच्या अखेरीपर्यंत त्यांना आपलं प्रोपोजल सबमिट करण्यास सांगितलं जातं. पुढे मग ऑक्टोबरच्या दुसऱ्या आठवड्यातच प्रजासत्ताक दिनासाठी रथांची निवड करण्याची प्रक्रिया सुरु होते.

संरक्षण मंत्रालय या रथांमध्ये काय समाविष्ट करू शकते किंवा काय असावे याबद्दलच्या गाइडलाईन देखील जाहीर करते. 

त्याचबरोबर सहभागी रथांनी “प्रसिद्ध संस्थांमधील एक्स्पर्ट डिझायनर” वापरावा, रथ उठावदार आणि चमकदार दिसावा म्हणून इलेक्ट्रॉनिक डिस्प्ले भिंती, रोबोटिक्स किंवा मेकाट्रॉनिक्स वापरून हलणारे घटक, थ्रीडी प्रिंटिंग ,ऑप्टिक्स आणि व्हिज्युअल इफेक्ट्स वापरायची सूचना देखील केले जाते.तसेच रथावर राज्याच्या नावाव्यतिरिक्त कोणतेही घोषवाक्य किंवा लोगो नसावा अशी अपेक्षा असते.  

रथांची निवड प्रक्रिया विस्तृत आणि वेळखाऊ आहे.

संरक्षण मंत्रालयान कला, संस्कृती, चित्रकला, शिल्पकला, संगीत, वास्तुकला, नृत्यदिग्दर्शन इत्यादी क्षेत्रातील प्रतिष्ठित व्यक्तींची एक तज्ज्ञ समिती स्थापन करते जी आलेल्या प्रस्तावांमधून रथ शॉर्टलिस्ट करण्यात मदत करतात.अंतिम निवड करताना समिती इतर घटकांसह दृश्य अपील, जनमानसावर होणारा परिणाम, रथाची कल्पना व थीम, डिटेल्स, संगीत या घटकांचे नियोजनह या गोष्टी पाहते.

प्रजासत्ताक दिनी राजपथावर होणाऱ्या संचलनात सहभागी होण्यासाठी महाराष्ट्राच्या चित्ररथालाही सुरवातीला परवानगी देण्यात आली नव्हती अशा बातम्या आल्या होत्या. मात्र नंतर महाराष्ट्राचा सहभाग निश्चित करण्यात आला.  यापूर्वी केंद्र सरकारने सुरक्षेच्या कारणास्तव महाराष्ट्राच्या चित्ररथाला परवानगी नाकारली होती. त्यामुळे अनेकांचा हिरमोड झाला होता. परंतु, आता केंद्र सरकारने अचानक निर्णय बदलल्याने महाराष्ट्राचा चित्ररथ राजपथावरील संचलनात सहभागी होणार आहे.

महाराष्ट्राच्या चित्ररथावरील यंदाच्या देखाव्यातून राज्यातील जैवविविधतेचे दर्शन घडवले जाणार आहे.

यामध्ये राज्यप्राणी, राज्यपक्षी यांसह महाराष्ट्रात आढाळणाऱ्या विविध सजीव प्रजातींचा समावेश असेल. प्रजासत्ताक दिनाच्या परेडमध्ये महाराष्ट्राचा रेकॉर्ड लै भारी आहे. २०१५मध्ये ‘पंढरीची वारी’ या संकल्पनेवर आधारित चित्ररथ साकारला होता. तर २०१८ रोजी ‘शिवराज्याभिषेक’ या संकल्पनेवर आधारित चित्ररथ साकारला होता. या दोन्ही चित्ररथांनी प्रथम क्रमांक पटकावला होता.

हे ही वाच भिडू :

 

 

 

 

 

Leave A Reply

Your email address will not be published.