जीएन साईबाबा : १ व्यक्ती, २ आरोप, ८ वर्षांची कैद आणि निर्दोष मुक्तता, असं आहे संपूर्ण प्रकरण
नक्षलवाद्यांशी संबंधित असल्याचे सांगत दिल्ली विद्यापीठातील राम लाल कॉलेज मध्ये इंग्रजी शिकवणाऱ्या जी एन साईबाबा यांना २०१४ मध्ये अटक करण्यात करण्यात आली होती. मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने त्यांची निर्दोष मुक्तता केली आहे. न्यायमूर्ती रोहित देव आणि न्यायमूर्ती अनिल पानसरे यांच्या खंडीपीठाने हा निर्णय दिला.
९ मे २०१४ ला साईबाबा यांना अटक करण्यात आली होती. त्यांच्यासोबत जवाहरलाल नेहरू विद्यापीठाचा विद्यार्थी हेम शर्मा, महेश तिरकी, पांडू नरोटे, विजय तिरकी, प्रशांत राही यांना सुद्धा अटक करण्यात आली होती.
१९९० पासून आरक्षणच्या चळवळीत साईबाबा सहभागी होत होते.
मूळचे आंध्रप्रदेश मधील असणारे साईबाबा २००० मध्ये हैद्रराबाद येथून दिल्लीत आले. तेव्हा पासून हे दिल्ली विद्यापीठाच्या राम लाल कॉलेज मध्ये इंग्रजी शिकवायचे. त्यांचे शरीर ९० टक्के अपंग आहे. व्हीलचेअर शिवाय ते कुठेही जाऊ शकत नाही.
९० च्या दक्षकापासून साईबाबा वेगवेगळ्या चळवळीत सहभागी होत होते. १९९० मध्ये आरक्षण बचाव चळवळ सुरु झाली होती. साईबाबा त्यात सहभागी झाले होते. त्यानंतर साईबाबा यांनी आंध्रप्रदेश पोलीसांच्या विरोधात आंदोलन केले होते. आंध्र पोलीस हे नक्षलवाद्यांचे आणि निरपराध लोकांचे इनकॉउंटर करत असल्याचा आरोप केला होता.
तसेच दिल्लीत आल्यावर त्यांनी ऑल इंडिया पीपल्स रेझिस्टन्स फोरम (AIPRF) संघटनेच्या माध्यमातून त्यांनी कामाला सुरुवात केली. AIPRF चा कार्यकर्त्या म्हणून ते काश्मीर आणि ईशान्येतील दलित, आदिवासीसाठी काम करत होते. यासाठी ते काही हजार किलोमीटर व्हीलचेअरवर चालले होते.
२००९ मध्ये केंद्र सरकाराच्या वतीने ग्रीन हंट चळवळ सुरु करण्यात आली होती. तेव्हा पहिल्यांदा साईबाबा यांना नक्षलवादी चळवळीशी संबंधित असल्याचे कारण देऊन अटक करण्यात आली होते. तर दुसऱ्यांदा म्हणजेच २०१४ मध्ये परत साईबाबाला नक्षलवाद्यांशी निगडित असल्याचा आरोप ठेऊन अटक करण्यात आली होती.
गडचिरोली येथील सेशन कोर्टाने २०१७ मध्ये साईबाबा यांना जन्मठेपेची शिक्षा सुनावली होती. देशविरोधी कारवाई आणि नक्षलवाद्यांशी संबंध असल्याचे आरोप त्यांच्यावर ठेवण्यात आला होता. विजय राही यांना १० वर्षांची शिक्षा आणि साईबाबा आणि इतरांना १० वर्षांची शिक्षा सुनावण्यात आली होती. यानंतर साईबाबा हे उच्च न्यायालयात गेले होते. ५ वर्षानंतर न्यायालयाने त्यांची निर्दोष मुक्तता केली.
साईबाबा यांच्यावर कुठले आरोप ठेवण्यात आले होते
साईबाबा हे तरुणांना परदेशातील समविचारी संघटनांना आणि भारत- संघटनांबरोबर जोडण्यासाठी प्रयत्न करत होते. आंध्र प्रदेशातील अमलापुरम पासून ते अबुजमध जंगला पर्यंत तसेच नेपाळ आणि श्रीलंकासारख्या देशांमध्ये त्यांचे नेटवर्क असल्याच्या आरोप पोलिसांनी ठेवला होता.
जी एन साईबाबा यांनी २००५ मध्ये रिवॉल्यूशनरी डेमोक्रेटिक फ्रंट (आरडीएफ) या संघटनेत सामील झाले होते. आंध्रप्रदेश सरकारने या संघटनेवर बंदी घातलेली आहे. नक्षलवाद्यांच्या केंद्रीय समितीच्या सदस्या अनुराधा धांडे यांच्या नावाने एक पॅनल तयार करण्यात आले होते. त्यात पॅनल साईबाबा यांचे नाव होते. त्यामुळे ते पहिल्यांदा प्रकाश झोतात आले होते.
२०१३ मध्ये संसदेवर हल्ला झाल्यानंतर माओवादी केंद्रीय समितीच्या गतीने एक समिती स्थापन केले होती. या समितीचे काम होते ते म्हणजे राजकीय कैदी यांना सोंडवण्याठी ही समिती स्थपण करण्यात आली होती. ही समिती स्थपान करण्यासाठी साईबाबा यांनी मदत केली होती. या काळात त्यांनी इंग्लंड, हॉलंड, जर्मनी, ब्राझील अमेरिका आणि हाँग काँग या देशात जावून समविचारी लोकांची आणि काही संस्थांची भेट घेतली होती. तसेच भारतातील काही संघटनाही त्यांना जोडून दिले होते.
जर्मनीत जर्मन मार्क्सिस्ट आणि लेनिनिस्ट संघटनेच्या वतीने घेण्यात आलेल्या कार्यक्रमाला साईबाबा यांनी हजेरी लावली होती. तसेच नक्षलवाद्यांकडून पोलिसांवर काही हल्ले झाले होते. त्या सगळ्या घटनांचे मास्टर माईंड हे साई बाबा होते असा आरोप पोलिसांनी केला होता.
५ वर्षानंतर साईबाबा यांची निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे.
हे ही वाच भिडू
- नक्षलवादी समजून आपल्याच नागरिकाची हत्या केल्याचे छत्तीसगढ पोलिसांवर आरोप होतायेत
- बिहारच्या या गावात घरटी एक पोरगं IIT मध्ये आहे..
- १४ वर्षाचा मुलगा ज्याला १० मिनिटांत मृत्युदंड दिला आणि ७० वर्षांनी तो निर्दोष असल्याचं समजलं