शरद पवारांचे स्वीय सहाय्यक म्हणाले, “साहेब मी संघाच काम केलंय…” 

शरद पवाराचे स्वीय सहाय्यक राहिलेल्या प्रत्येक व्यक्तींनी शरद पवारांच्या पंचाहत्तरी निमित्त आपल्या आठवणी मांडल्या होत्या. या आठवणी संवाद व सुशासन नावाच्या पुस्तकामार्फत प्रकाशित करण्यात आल्या. टी.एन.धुवाळी, जिवाजी परब, दळवी, पाटील, खरे, धर्माधिकारी, अय्यंगार, राजे, निंबाळकर, बन्सल, प्रभाकर देशमुख, रानडे, राऊत, बोराटे अशा कित्येक अधिकाऱ्यांनी आपआपल्या आठवणी या पुस्तकाच्या निमित्ताने सांगितल्या आहेत. 

या पुस्तकातलीच एक आठवण म्हणजे सी.एस. खरे यांची. नंदुरबार येथील एका दुर्गम भागातून सी.एस.खरे MPSC ची परिक्षा उतीर्ण झाले  होते. सुरवातीच्या काळापासूनच डेप्युटेशनवर काम करणारे खरे हे बबनराव ढाकणे, दि.बा.पाटील, दत्ता पाटील, निहाल अहमद, अण्णा पाटील आदी नेत्यांचे स्वीय सहाय्यक म्हणून काम करत होते. 

१९८८ च्या सुमारास सी.एस. खरे हे शरद पवारांचे स्वीय सहाय्यक म्हणून काम पाहू लागले. शरद पवार तेव्हा मुख्यमंत्री होते. एका मुख्यमंत्र्यांसोबत काम करण्याचा हा पहिलाच अनुभव खरे यांच्या आयुष्यात आला होता. 

त्यांची नियुक्ती झाल्यानंतरचा एक किस्सा त्यांनी आपल्या आठवणींमध्ये सांगितला आहे. 

ते म्हणतात, 

मी साहेबांकडे काम करण्यास सुरवात करुन साधारणपणे चारेक वर्षाचा कालावधी लोटला होता. साहेबांसोबत एकदा नगर जिल्ह्याच्या दोऱ्याचा प्रसंग होता. साहेबांनी प्रवासादरम्यान सहज गाडीत बोलताना माझी चौकशी केली. घरी कोणकोण असतं, गावी कोण असतं? कुटूंबात शेतीकडे लक्ष कोण देत? वगैरे वगैरे. 

त्यात एक प्रश्न त्यांनी सहजपणे विचारला. 

खरे तुम्ही सामाजिक क्षेत्रात काही काम केलं आहे का ? 

मी साहेबांना म्हणालो,

“साहेब खर सांगतो नोकरीत रुजू होण्यापुर्वी मी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच काम करायचो. माझ्या घरात ते वातावरण लहानपणापासून आहे. एवढच नव्हे तर आणीबाणीच्या काळात देखील निरोप्या म्हणून मी काम केलं आहे. लहानपणी अटल बिहारी वाजपेयी यांच्या आमच्या जिल्हातल्या दौऱ्याच्या वेळी समुह गाण म्हणण्याच्या गटात मी सहभाग नोंदवला आहे.”

या साऱ्या गोष्टी सांगितल्यावर साहेबांनी अरे व्वा !

अशी केवळ एका शब्दात माझ्या सामाजिक कामाचं कौतुक केलं. खरे पुढे सांगतात,

“शरद पवार केंद्रात गेले आणि माझं काम बंद झालं. साधारण दहा अकरा वर्ष त्यांनी शरद पवारांसोबत काम केलं पण माझा संघाशी असणारा संबंध शरद पवारांना कधीच आड आला नाही.  या काळात त्यांचा माझ्याकडे पाहण्याचा, माझ्या कामावरच्या विश्वासात तूसभरही कमतरता जाणवली नाही”

हे ही वाचा. 

Leave A Reply

Your email address will not be published.