मी मुल मेल्यावर त्यांच्यावर बलात्कार करायचो कारण जिवंतपणी त्यांना वेदना होऊ नये म्हणून.

सन २००४, ठिकाण पंजाब. एक एक करून मजदुरांची मुलं गायब होत होती. पण गायब होणाऱ्या मुलांसाठी ना कोणत्या पैशाची मागणी ना कोणती खबर. म्हणजे २००६ साली झालेल्या निठारी कांडच्या वेळी जी दहशत पंजाबमध्ये होती तिच २००४ साली निर्माण झाली होती.

२००४ साली एप्रिल ते ऑक्टोंबरच्या दरम्यान पंजाबमधील जलिंधर जिल्ह्यातून तब्बल २३ पोर गायब झाली. आणि सगळी मुल ही कामगारांची मुल होती. २३ पैकी १७ मुलांसोबत बलात्कार सुद्धा झाले होते. जेव्हा ह्या सर्व घटनेमागचा आरोपी पोलिसांनी पकडला तेव्हा तो निघाला भारतीय सैन्याचा माजी जवान दरबारा सिंह.

दरबारा सिंह हा मूळचा अमृतसर जिल्ह्यातील जल्लीपुर खेरा गावचा. तो पुढे जाऊन भारतीय सशस्त्र दलात रुजू झाला आणि पठाणकोट येथील हवाई दलाच्या स्टेशनवर त्याला तैनात करण्यात आले.

एकदा त्याचे सैन्याचे वरिष्ठ अधिकारी मेजर व्ही.के.शर्मा यांच्यासोबत काही कारणास्तव वाद झाले. त्या वादावरून दरबारा सिंह याने व्ही.के.शर्मा यांच्या परिवारावर हातबॉम्ब फेकून हल्ला केला. या हल्ल्यात व्ही.के.शर्मा त्यांच्या पत्नी आणि त्यांचा लहान मुलगा गंभीर जखमी झाला. या कारणास्तव दरबारा सिंह याला सैन्यातून बरखास्त करून त्याला अटक करण्यात आली. पुढे जाऊन त्याची सुटका झाली.

दरबारा सिंह हा सनकी स्वभावाचा होता. त्याच्या या स्वभावामुळे त्याची बायको आणि त्याची मुल देखील त्याला सोडुन गेली होती.

एकदा दरबारा सिंह एका कामानिमित्त कपूरथाळा ह्या शहरात गेला होता. तेथे त्याला स्थलांतरित मजदुर मोठ्या प्रमाणावर दिसले. आणि ना जाणे का त्याला त्यांच्याबद्दल मत्सर वाटू लागला. तेथे त्यानी एका प्रवासी मजुराच्या लहान मुलीला पकडुन तिच्यावर बलात्कार करून तिचा खून करण्याचा प्रयत्न केला.

१९९७ मध्ये त्याला या बलात्कार आणि खून करण्याचा प्रयत्न या प्रकरणात त्याला दोषी ठरवून ३० वर्षांच्या तुरूंगवासाची शिक्षा सुनावण्यात आली.

कपूरथाळा येथून जालंधर मध्यवर्ती कारागृहात आणि नंतर लुधियाना मध्यवर्ती कारागृहात त्याला हलविण्यात आले. पुढे जाऊन ३ डिसेंबर २००३ रोजी त्याने कोर्टाकडे दया याचिका दाखल केली. कारागृहातल्या त्याच्या चांगल्या आचरणाच्या आधारे त्याची ही याचिका कोर्टाने स्वीकारली आणि त्याला तुरूंगातून सोडण्यात आले.

पण या दरम्यान त्याची स्थलांतर करणार्‍या मजदुरांबद्दलची द्वेषबुद्धी खुप वाढत गेली होती. आणि आपल्या आयुष्यातील बरेच वर्षे याच मजदुरांमुळे वाया गेले म्हणुन यासाठी तो त्यांना जबाबदार धरत गेला.

सुटल्यानंतर तो जालंधर येथे आला. त्याने लेदर कॉम्प्लेक्स परिसरातील एका कारखान्यात काम करण्यास सुरवात केली. तो तिथे एका भाड्याच्या खोलीत राहत होता. आणि इथूनच सुरू झाला प्रवास स्थलांतरित मजदुरांविरुद्ध ‘सूड’ घेण्याचा.

मजदुरांवर सुड उगवण्यासाठी त्याने त्यांच्या मुलांना लक्ष्य करण्यास सुरुवात केली. तो गावा गावातून आपल्या सायकलवर फिरू लागला.

त्याच्या सायकलला एक पिशवी बांधलेली असायची. त्या पिशवीत टॉफी, चॉकलेट, फटाके असायचे. तो लहान मुलांना त्या पिशवीतील टॉफी,चॉकलेट,फटाके यांचा मोह दाखवुन त्यांना रानावनात घेऊन जाऊन तो त्यांना मारून टाकू लागला. नुसते मारून नाहीतर मेलेल्या मृतदेहावर तो बलात्कार करु लागला. जेव्हा त्याला अटक झाली तेव्हा त्यानी सांगितल की,

“मी मुल मेल्यावर त्यांच्यावर बलात्कार करायचो कारण जिवंतपणी त्यांना वेदना होऊ नये म्हणून.”

तो नुसता मोह दाखवून नाही तर काही मुलांना समोसा खायला आणि उसाचा रस प्यायला घेऊन जात आणि तसचं त्यांना मारून टाकत.

हे सगळं तो सकाळी १० ते १२ च्या दरम्यान करत. कारण त्याला माहित होत की मजदुर लोक त्याच वेळेस कामासाठी घराबाहेर पडत. दरबारा सिंह हा असा गुन्हेगार होता जो कुठलीच नशा न करता मुलांची हत्या करायचा पण एकदा का मुलांची हत्या केली की दारु पिऊन आणि चांगले अन्न खाऊन तो पार्टी करायचा.

२००४ साली वारीना येथे एका मुलाचा कापलेला हात सापडला तसेच चहेरू येथे एका १० वर्षीय मुलीचा कुजलेला मृतदेह सापडला. यावरुन खुनीला पकडण्यासाठी यंत्रणा युद्धपातळीवर प्रयत्न करु लागली. वेगवेगळ्या ठिकाणावरून मिळालेल्या माहितीतून पोलिसांनी त्याचे एक चित्र रेखाटून घेतले.

एकदा चित्रात दिसणारा व्यक्ती हा सायकलवरून चालला आहे ह्याची माहिती पोलिसांना मिळाली व पोलिसांनी सापळा रचून दरबारा सिंह याला अटक केली.

पोलिसांसमोर त्याने आपले सगळे गुन्हे कबुल केले. २३ पैकी १७ मुलांना मारून टाकलंय अस त्यानेच पोलिसांना सांगितल. “हे कृत्य करताना मला काहीच वाटल नाही उलट मी माझे कर्तव्य पार पाडले.” असे देखील तो पोलिसांसमोर बोलला. पण एकदा चुकुन एका पंजाबी मुलीला त्याने आपल शिकार बनवल आणि हे जेव्हा त्याला कळलं की ती मुलगी स्थलांतरित नसुन पंजाबी आहे तेव्हा त्याला त्या गोष्टीचा हादरा बसला. अस त्याने पोलिसांसमोर सांगितले.

अश्या ह्या क्रुर व सायको दरबारा सिंहला फाशीची शिक्षा झाली. पुढें जाऊन ती शिक्षा जन्मठेपेत बदलली गेली. आणि ६ जुन २०१८ साली त्याचा जेलमध्येच मृत्यु झाला.

  • कपिल जाधव

हे ही वाच भिडू.

Leave A Reply

Your email address will not be published.