सिरीयलप्रमाणे आपल्या आईवडिलांचा खून करून त्यांना सिगरेटचे चटके देणारा सायको किलर.

टीव्ही सिरीयल बघून कोणावर काय परिणाम होईल हे सांगता येत नाही. विशेषतः टीव्हीवरील प्रोग्राम बघून लहान मुलांच्या मनावर त्याचे परिणाम अधिक होत असल्याचे आपण बघितले आहेत. तर अशीच एक घटना कलकत्त्यात घडली होती. ज्यात एका १६ वर्षाचा मुलगा क्राईम पेट्रॉल टाईपचा गुन्हेगारी वर आधारित प्रोग्राम बघून आपल्या आईवडिलांचा खुनी बनला होता.

ही गोष्ट आहे कलकत्ता जिल्ह्यातल्या दमदम शहरातील सजल बरुई आणि त्याच्या पाच मित्रांची.

सजल त्याची आई नियती आणि वडील सुबल यांच्या सोबत राहत होता. अशातच सजलचे वडील सुबल यांचे मिनाती नामक एका दुसऱ्याशी स्रीसोबत संबंध आले. तेव्हा त्यांची पहिली पत्नी नियती दोघांत अडथळा ठरत होती, तर एक दिवस त्यांनी तिला सोडून दिले आणि मिनाती सोबत राहायला लागले. याचदरम्यान नियतीने सजलला जन्म दिला. मिनातीला सुद्धा त्यांच्यापासून एका मुलगा झाला.

पुढे काही वर्षांनी सुबल आपल्या पहिल्या पत्नीकडे परत आले आणि सजलला आपल्या सोबत घेऊन गेले. तेव्हा सजल फक्त आठ वर्षांचा होता. त्यानंतर त्याला आपल्या खऱ्या आईचा चेहरा बघायला मिळाला नाही.

इकडे सजल त्याच्या सावत्र आई मिनातीच्या डोळ्यात खुपायचा, ती कायमच त्याचा तिरस्कार करायची. इतका की, ती सजलला जळत्या सिगारेट आणि गरम इस्त्रीचे चटके द्यायची. याचा एक ना एक दिवस बदला घ्यायचा असे सजलने मनात ठरवले.

तारीख होती २२ नोव्हेंबर १९९३ ची, सजल आणि त्याच्या पाच मित्रांनी हत्येचा कट रचला. सगळे एकाच वयोगटातील होते. रात्री सगळे सजलच्या राहत्या घरी आले, त्याची सावत्र आई घरी एकटीच असल्याची संधी साधली आणि तिला गाठलं. सगळ्यांनी धरून तिला खुर्चीला बांधले.

थोड्याच वेळात त्याचा सावत्र भाऊ घरी आला आणि रात्री उशिरा त्याचे वडील ही आले. या तिघांनाही त्यांनी बांधून ठेवले व गळा दाबून मारण्याचा प्रयत्न केला पण त्यात फक्त सावत्र आई मेली. सावत्र भाऊ आणि वडील निसटणार होते तोच सजल व त्याचा मित्र रणजीतने त्यांच्यावर झडप घातली अणि धारदार शस्त्राने त्यांची हत्या केली.

हे नाट्य जवळपास तीन तास चालले. हत्या केल्यानंतर सजलच्या सांगण्यानुसार त्याच्या मित्रांनी शस्त्र मोहरीच्या तेलाने स्वच्छ केले आणि व्यवस्थित टेबलवर मांडून ठेवले. त्यानंतर त्यांनी घरातील फ्रीज मधील बंगाली मिठाई खाल्ल्या आणि त्याचे बिल म्हणून काही सुट्टे पैसे टेबलावर ठेवले.

ही सगळी डॉकट्यालिटी सजलची होती, जे त्याला क्राईम पेट्रोल बघून सुचले होते. खून केल्यावर सजलने त्यांना सिगारेट चटके देऊन आपल्या बालपणीचा बदला घेतला. खुनाचा संशय यायला नको म्हणून जाता जाता मित्रांनी सजलला सुद्धा खुर्चीला बांधून गेले, जेणेकरून अस दिसावं की आपण ही हत्यारांचे बळी होतो.

पण जेव्हा पोलीस तिथे पोहचले तेव्हा त्याच्या शरीरावर कसली जखम वा इजा नव्हती. त्यांनी त्याची चतुराई क्षणात पकडली आणि त्याला अटक केली. त्याला आपल्या केल्या कृत्याबद्दल कसलाच पश्चाताप नव्हता. चेहऱ्यावर सुद्धा तसे काही भाव नव्हते. उलट जेव्हा त्यांना मृत्युदंडाची शिक्षा सुनावली तेव्हा हसत हसत टाळ्या वाजवून तो गाणं म्हणायला लागला होता.

तेव्हा सजलचे वय अवघे १६ वर्षे होते आणि त्याचे मित्रही जवळपास सारख्याच वयाचे होते. नियमानुसार ते अल्पवयीन असल्याने त्यांना फाशीच्या ऐवजी जन्मठेपेची शिक्षा देण्यात आली.

सजल अपराधी असला तरी तो बुद्धीने अत्यंत हुशार आणि तल्लख होता. तो एक उत्कृष्ट पेंटर असण्यासोबतच व्यायामाची सुद्धा त्याला आवड होती. जेलमध्ये असतांना जेल प्रशासनाने त्याची पेंटिंगची कला जपण्यासाठी त्याला सहाय्य केले. त्याची एक पेंटिंग कलकत्त्यात भरलेल्या एका प्रदर्शनात ८,००० रुपयाला विकली गेली होती.

प्रशासकीय समस्येमुळे २००० मध्ये सजलला दमदम काँटोंमेंट मधून मिदणापूरच्या सेंट्रल जेलमध्ये हलवण्यात आले होते. तिथे आपली शिक्षा भोगत असताना २००१ मध्ये त्याने पळून जाण्याची योजना आखली आणि आपल्याला किडनीचा आजार झाला असल्याचे नाटक केले. तेव्हा कलकत्त्याच्या मेडिकल कॉलेजमध्ये ऍडमिट करण्यात आले.

ऍडमिट केल्याच्या काही दिवसांनीच १५ सप्टेंबर २००१ रोजी त्याने त्याच्यावर पहारा ठेवत असलेल्या दोन पोलीस हवालदारांना बिअर पार्टी दिली. त्याने बिअर मध्ये झोपेच्या टाकून त्यांना प्यायला दिली आणि ते झोपी जाण्याची वाट पाहू लागला. जसा त्यांचा डोळा लागला, सजलने तिथून लगेचच पळ काढला.

निसटल्यावर तो मुंबईत आपल्या मित्राकडे गेला. तिथे लग्न केले आणि काही वर्षांनी बायकोला मुंबईत सोडून स्वतः कलकत्त्याला परतला. तेव्हा त्याच्यातली गुन्हेगारी वृत्ती अधिकच वाढली होती. स्थानिक गुंडांच्या मदतीने त्याने अनेक चोऱ्या केल्या. तो मिदणापूर जिल्ह्यातील पश्चिम भागात असलेल्या जम्बोनी गावात नाव बदलून राहत होता.

पुढे फेब्रुवारी २००३ मध्ये एका चोरीच्या गुन्ह्यात शेख राजू नामक व्यक्ती ला अटक करण्यात आली होती. तीन महिने शेख राजून म्हणून मिदणापूर सेंट्रल जेलमध्ये राहिल्यानंतर तिथले जेलरने ओळखले की हा सजल बरुई आहे. जो जन्मठेपेची शिक्षा भोगत असताना अलीपुरच्या सेंट्रल जेलमध्ये सजलला भेटला होता.

त्याच्या या अतरंगी आणि तितक्याच क्रूर वागण्यावर एक बंगाली फिल्म देखील बनवण्यात आली आहे. तीच नाव आहे धूसर. २०१७ साली ही फिल्म रिलीज झाली होती.

हे ही वाच भिडू.

4 Comments
  1. Swapnil mahajan says

    1993 साली क्राईम पेट्रोल ही मालिका लागत नव्हती पण तुमि जी कहाणी सांगितली ती कहाणी क्राईम पेट्रोल वाल्यानी tv वर दाखवली आहे.

  2. Yogesh says

    स्वप्निल महाजन बरोबर आहे तुमचे , crime petrol ही मालिका 2003 पासून सुरू झाली

    बोल भिडू च्या टीम ला एकच विनंती आहे की तुम्ही चांगले लिहिता फक्त खरं आहे तेच दाखवत जा

Leave A Reply

Your email address will not be published.