पुलवामा चा भ्याड हल्ला कसा झाला, जैश-ए-मोहम्मद संघटनेच मुळ काय ?

१४ फेब्रुवारी २०१९, पुन्हा एक काळा दिवस आपल्याला पाहावा लागला. भारतमातेच्या रक्षणाची जबाबदारी खांद्यावर घेत आपल्या देशाच्या संस्कृतीचा भाग असणाऱ्या स्वर्ग सौंदर्य लाभलेल्या काश्मीर मधील पुलवामा येथे सीआरपीएफच्या ताफ्यावर भ्याड अतिरक्यांनी हल्ला केला.

ह्या हल्ल्यात आपल्या देशासाठी लढणाऱ्या ३९ सैनिकांचा दुखद मृत्यू झाला.

या भागाची सुरक्षा २००५ पूर्वी बीएसएफचे जवान करत होते त्यानंतर येथील सगळी सुरक्षा जबाबदारी ही सीआरपीएफच्या जवानांवर होती.

काल झालेल्या या भ्याड हल्याचा निषेध प्रत्येक भारतीय करतो आहे. आपल्याच कुटुंबातील सदस्य आपल्यातून गेल्याचे दुख आपल्या सगळ्यानाच आहे. थेट आपल्या देशावर हल्ला करण्याची धमक नसल्याने पाकिस्तान सरकार काही दहशवादी संघटनाना पोसत त्यातलीच एक म्हणजे जैश-ए–मोहम्मद ही संघटना. याच अतिरेकी संघटनेने या हल्ल्याची जबबदारी स्वीकारली आहे. भारताचा स्वर्ग असणाऱ्या काश्मीर खोऱ्याचा नरक करण्यासाठी हे नेहमीच भारत व्याप्त काश्मीर खोऱ्यात हल्ले करत आले आहेत.

पण काल झालेला हल्ला आज पर्यंत आपल्या सैनिकांवर झालेला सगळ्यात मोठा हल्ला असल्याचे तज्ञांनी सांगितले आहे. या हल्ल्याचे प्रतिउत्तर यांना मिळेलच कारण आज पर्यंत जेव्हा जेव्हा आपल्या छातीवर पाय ठेवण्याचा प्रयत्न केला तेव्हा तेव्हा आपण नरडीचा घोट घेतला आहे, तसेच प्रतिउत्तर या हल्लेखोरांना देखील मिळेल.

पुलवामा येथे झालेल्या हल्ल्याचा घटनाक्रम. 

  • सुट्टीवर असणाऱ्या सीआरपीएफ जवानांचा ताफा पाहते ३.३० वाजता काश्मीरच्या दिशेने रवाना झाला.
  • सीआरपीएफ तुकडीतील २५४७ जवान या ताफ्यात होते. ७८ गाड्यांमधून ते प्रवास करत होते आपल्या सुरक्षेची जबाबदारी खांद्यावर घेण्याच्या दिशेने.
  • हा ताफ्फा पुलवामा जिह्ल्यातील श्रीनगर जम्मू महामार्गावरून प्रवास करत होता. सिनिकांच्या या गाड्या अवंतीपूरा येथील लट्टूमोड येथे ही वाहने दाखल झाली.
  • याच ठिकाणी स्फोटके भरलेली एक गाडी येऊन थेट जवानांच्या एका गाडीला थडकला.
  • यात ७६व्या बाटेलीयंच्या बसच्या चिंधड्या उडाल्या आणि आपल्या देशाचे ३९ जवान मृत्युमुखी पडले.
  • या गाडी मध्ये सुमारे १०० किलो स्फोटके असण्याचा अंदाज व्यक्त करण्यात येतो आहे. एकूण मृत्यू पावलेल्या ज्वानानांच्या संख्येचा देखील अधिकृत माहिती नाही.

सूसाइड बॉम्बिंग चा हा प्रकार होता. कारबॉम्बिंग करणारा जैश- ए–मोहम्मद चा अतिरेकी आदिल अह्म्म्द दार हा होता.

आदिल अह्म्म्द दार हा कुकर्मी कोण आहे ?

  • आदिल अह्म्म्द दार हा पुलवामा जिह्ल्यातील गुंदिबाग गावाचा रहिवासी होता.
  • तो वयाच्या २०व्या वर्षी या संघटनेत दाखल झाला आहे.
  • बुरहान वाणीच्या हत्येनंतर उसळेल्या हिंसाचारात देखील याचा सहभाग होता.

जैश ए मोहम्मद या अतिरेकी संघटनेचा काळा इतिहास काय सांगतो. 

पाकिस्तान नेहमीच आपल्या देशाच्या हद्दीतील काश्मीर प्रांतात वेगवेगळ्या मार्गाने अशांतता पसरवत असत. त्यासाठी ते थेट अतिरेक्यांना पाठींबा आणि मदत देखील करतात. यापूर्वी लष्करे तोयबा ही दहशवादी संघटना अशा कारवाया करायची. पण मुंबई बॉम्बस्फोट मध्ये मुख्य आरोपी असलेल्या हाफिज सयद या अतिरेक्याच्या पार्श्वभूमीवर या अतेरेकी संघटनेवर कारवाई करण्यासाठीचा अंतराष्ट्रीय दबाव वाढत आहे. या वाढत्या दबावामुळे पाकिस्तान ने या संघटनेला मदत करण्याचे बंद करत जैश-ए-मोहम्मद या संघटनेला मदत करण्यास सुरवात केली आहे. त्यानंतर या अतिरेकी संघटनेने वारंवार हल्ले करण्यास सुरवात केली.

Screenshot 2019 02 15 at 1.45.44 PM

  • जैश ए मोहम्मद ही संघटना २००० साली स्थापन करण्यात आली. कंधार विमान अपहरणा वेळी प्रवाशांना सुटकेच्या बदल्यात सोडलेल्या मसूद अजहर हा या संघटनेचा प्रमुख आहे.
  • २००१ साली यांनी काश्मीर विधानसभेवर कार बॉम्ब हल्ला केला होता.
  • २०१६ साली झालेल्या नागरोटा येथील हल्ल्यात देखील याच संघटनेचा सहभाग होता.
  • जानेवारी २०१७ मध्ये पुलवामा येथे झालेला हल्ला, उरी पठाणकोट येथील हवाई तळावरील हल्ल्यात देखील या संघटनेचा सहभाग होता.
  • आपल्या संसदेवर २००१ साली झालेल्या हल्ल्यात देखील लष्करे तोयबा या संघटनेला यांनी मदत केली होती.

हा यांच्या दहशवादी कारवायांचा काळा इतिहास आहे. पाकिस्तान सैन्य आणि आय.एस.आय चा देखील या संघटनेला मदत करण्यात हात आहे. पण या सगळ्यांना आपले सैनिक नेहमीच तोडीस तोड उत्तर देत आलेत.

  • २५ जून ते १४ सप्टेंबर २०१८  मध्ये आपल्या जवानांनी ८१ अतिरेकी ठार केले आहेत.
  • २०१७ साली एकूण ३४२ अतिरेकी हल्ले झाले आहेत. यात २१३ अतिरेक्यांना चकमकी दरम्यान आपल्या सैनिकांनी ठार केले आहे.

काश्मीर खोऱ्यात किंवा भारतात होणाऱ्या अतिरेकी हल्ल्यांमध्ये पाकिस्तानचा हात आहे किंवा अतिरेक्यांना तेच मदत करतात हे आपल्याला माहिती आहे. याच पार्श्वभूमीवर पाकिस्तानने अशा पद्धतीने मदत करणे बंद करावे असे देखील भारतीय परराष्ट्र मंत्रालयाने काल झालेल्या हल्ल्यानंतर पाकिस्तानला बजावले आहे.

१९९६ साली झालेल्या “कॅग” करारा अंतर्गत आपण पाकिस्तानला मोस्ट फेवर्ड नेशन्स चा दर्जा दिला होता. 

व्यापर करण्यासाठी अनुकूल राहणे हेच या कराराचे मुख्य कारण होते. पण कालच्या भीषण हल्ल्यानंतर नेहमीच अतिरेक्यांना मदत करणाऱ्या पाकिस्तानची व्यापारात कोंडी करण्याच्या हेतूने मोस्ट फेवर्ड नेशन हा दर्जा काढून घेण्यात आला आहे. आज झालेल्या विशेष बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे. या बैठकीनंतर पाकिस्तानला चोख प्रतिउत्तर देणार असल्याचे सांगून अर्थमंत्री अरुण जेटली यांनी पाकिस्तानला इशारा देखील दिला आहे. गृहमंत्री राजनाथ सिंह हे सुरक्षा व्यवस्थेची पाहणी करण्यासाठी काश्मीरला भेट देणार आहेत.

या दुर्घटनेत मृत्युमुखी पडलेल्या रत्न ठाकूर या जवानाच्या वडलांनी प्रतिक्रिया देताना सांगितले,

“माझ्या मुलाने देशासाठी बलिदान दिले याचा अभीमान वाटतो पण पाकिस्तानला उत्तर मिळाले पाहिजे. देशसेवेसाठी मी माझा दुसरा मुलगा देखील कुर्बान करण्यासाठी तयार आहे.”

आपल्या देशासाठी लढणाऱ्या जवानांनचे आई वडील देखील अशी भावना व्यक्त करता असतांना आपल्या सगळ्यांचे मन हेलावून जाते. धर्माच्या नावाखाली दहशतवादाची बीजे पेरणाऱ्या या अतिरेक्यांना आणि त्यांना मदत करणाऱ्या पाकिस्तानला आपण भारतीय नक्कीच चोख प्रतिउत्तर देऊ. कारण दरवेळी अशा भ्याड हल्यांना भारतीय सैन्याने तितकेच चोख प्रतिउत्तर दिले आहे.

बोल भिडू कडून शहिद जवानांना भावपूर्ण श्रद्धांजली ! 

Leave A Reply

Your email address will not be published.