आम्ही पुण्याचे ब्राह्मण अँग्री !

भाजपचे प्रदेशाध्यक्ष व राज्याचे महसूल मंत्री कोल्हापूरचे चंद्रकांत दादा पाटील या विधानसभा निवडणुकीत उतरत आहेत. पण यासाठी त्यांनी कोल्हापूर नाही तर पुण्याच्या कोथरूडचा मतदारसंघ निवडला. मागच्या वेळी विक्रमी मतांनी निवडून आलेल्या मेधाताई कुलकर्णींच तिकीट कापलं म्हणून त्यांचे कार्यकर्ते चिडले. पुण्याच्या ब्राह्मण महासंघाने तर आधीच जाहीर केलं की बाहेरचा उमेदवार आम्हाला नको. यावरून सुद्धा राज्यभर खूप टीकाटिप्पणी झाली.

पुण्याच्या मध्यवर्ती असलेला कोथरूड हा मतदारसंघ भाजपच्या परंपरागत मतदारांचा मानला जातो. तिथे जातीच गणित उलगडून बघितल तर तिथे ब्राम्हण समाजाचे लोक जास्त प्रमाणात आहेत असं सांगितलं जातं. विशेषतः मध्यमवर्गीय उच्चशिक्षित पांढरपेशा समाजाचे लोक इथे असूनही चंद्रकांत दादा पाटील यांच्या उमेदवारीला विरोध होत आहे.

अनेकांनी कोथरूड मध्ये ब्राम्हणच उमेदवार हवा व भाजपने आम्हाला गृहीत धरु नये अशी मागणी केली.यातूनच आज परशुराम सेवा संघाचे अध्यक्ष विश्वजित देशपांडे हे कोथरूडमधून चंद्रकांत दादांच्या विरोधात शड्डू ठोकणार आहेत हे स्पष्ट झाले.  ते आज दुपारी कर्वेरोड वरील स्वातंत्र्यवीर सावरकर पुतळ्यापासून जोरदार  शक्तीप्रदर्शन करत अपक्ष अर्ज भरणार होते. त्यापूर्वी त्यांनी आपल्या एका फेसबुक पोस्टमधून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना थेट सवाल केला.

“शिवश्री देवेंद्र फडणवीस…ब्राह्मण समाजाच्या मतदारांना तुम्ही स्वतःच्या जहागिरी समजता का??

मा.शिवश्री देवेंद्र फडणवीस… आज सकाळीच माध्यमांमधून आपला भारतीय जनता पक्ष कोथरूड विधानसभा मतदार संघातून आमदार म्हणून काम केलेल्या उच्चशिक्षित मेधा ‘कुलकर्णी’ नावाच्या ब्राह्मण महिलेचं तिकीट कापून कोल्हापूरच्या चंद्रकांत पाटील यांना तुमच्या पक्षाकडून तिकीट देताय असं समजलं…खरं तर मला हे ऐकून अजिबात धक्का बसला नाही,कारण तुमच्या पक्षाचं ब्राह्मण समाज म्हणजे आपल्या बापजाद्यांच्या जहागिरी असल्या सारखं वागणं हे काही आम्हास नवीन नाही” 

त्यांच्या या पोस्टला नेटकर्यांचा जोरदार प्रतिसाद लाभला.

त्यातील काही प्रातिनिधिक प्रतिक्रिया.

जयंत गौरकर नावाच्या व्यक्तीने विश्वजित देशपांडे यांच्या निर्णयाला पाठिंबा दिला आहे. त्यांनी दिलेली कमेंट 

मी नथुराम गोडसे बोलतोय या नाटकामुळे प्रसिद्ध झालेले जेष्ठ अभिनेते शरद पोंक्षे यांनी दिलेली ही प्रतिक्रिया

प्रवीण बोडखे यांनी चंद्रकांत पाटलांना कोथरूडच्या ऐवजी बारामतीतून लढण्याचा सल्ला दिला. 

विजय गावंडे पाटील यांनी कोथरूडकरांच्या बरोबर अप्रत्यक्षरित्या मुख्यमंत्र्यांनाही टोला दिला.

फेसबुकवरील सुप्रसिद्ध विचारवंत अभिराम दीक्षित यांनी मात्र विश्वजित देशपांडे यांना जातीयवादी विचार करत आहेत असं सांगत टीका केली.

सुरेश मुळे यांनी कोणताही निर्णय घेण्यापूर्वी सर्व ब्राह्मण समाजाची मिटिंग बोलवण्याच आवाहन केलं होतं.

विशाल दोपवकर यांनी मराठा उमेदवार नको फक्त ब्राह्मण हवा अशी स्पष्ट भूमिका मांडली. त्यावर अनेकांनी विशाल यांच्यावर टीका देखील केली.

शंकर जोशी यांनी आपल्या सविस्तर प्रतिक्रियेत भाजप ब्राह्मणांची गठ्ठा मतदान मिळवत आहे पण समाजासाठी काही करत नाही असे विचार मांडले.

तर दुसऱ्या एका पोस्टवर फेसबुकवर आपल्या पोस्टमधून चर्चेत असणाऱ्या राजेश कुलकर्णी यांनी विश्वजित देशपांडे यांना अविचार करू नका असा सल्ला दिला.

फेसबुकवर अशा दोन टोकाच्या प्रतिक्रिया विश्वजित देशपांडे यांना अनुभवायला मिळाल्या. तरीही आज ते निवडणुकीचा अर्ज भरणारच होते. शिवाय त्यांच्याप्रमाणेच अखिल भारतीय ब्राह्मण महासंघाचे मयुरेश अरगडे यांनी देखील निवडणूक लढवण्याच घोषित केल्यामुळे या लढतीत आणखी वेगळा रंग भरला आहे.

हे ही वाच भिडू.

Leave A Reply

Your email address will not be published.