कृपया हा एलियन नाही, तर पुण्याच्या सहा मुलांनी मिळून केलेला “ट्रॅफिक रोबो” आहे. 

पुण्याची गेल्या चार-आठ दिवसातली ओळख म्हणजे एकावर एक कांड निर्माण करणारे शहर अशी झालेय. म्हणजे काही दिवसापुर्वी पुण्यात एलियन आले होते. आत्ता काल दूसरी बातमी लागली की एका महिलेस चंद्रावर जमिन देतो म्हणून फसवलं. त्यांनी दोन चार एकर चंद्रावर जागा घेण्यासाठी पैसै भरले होते म्हणे. आत्ता आमचा एक भिडू म्हणाला,

“फसवलं नाही तर त्या जागेच्या व्यवहारासाठीच एलियन आलेला. पण न्यूज लावून मिडीयाने त्याला हाकलून लावला. आत्ता एलियन काय येत नसतो म्हणून फुढचं प्रकरण झालं” 

इतक्यात आकाशातून एलियनचा आवाज आला फुढचं नाही रे. पुढचं म्हणा.

मग आम्ही लगेच विषयाला हात घालायचं ठरवलं. तर झालय अस कि आत्ता आपणा पुणेकरांना चौकाचौकात एलियन दिसण्याची शक्यता आहे. म्हणजे कसं तर पुण्यात ट्रॅफिक पोलीसांची जागा आत्ता रोबोट घेणार आहेत आणि हि कामगिरी पार पाडणारी मुलं आहे टोटल सहाजण. बरं हे सहाजण इयत्ता सातवी, आठवी शिकणारी मुलं आहे. आत्ता त्यांच कर्तृत्व मान्य असलं तरी हेल्मेट न वापरणाऱ्या सामान्य पुणेकरांसाठी हा एक नवा ताप असणारा आहे यात शंका नाही. 

असो, तर विस्कटून मॅटर सांगतो. 

झालय काय तर पुण्यातल्या एसपी रोबोटिक्स मेकर यांच्या डोक्यात एक कल्पना आली. पुण्याच्या ट्रॅफिकची जबाबदारी रोबोटवर सोपवली तर. या लॅबचे हेड आहेत संदिप गौतम. या लायब्ररीत काय काम केल जातं तर रोबोटिक्सबद्दल मुलांना शिकवलं जातं. त्याचसोबत वेगवेगळे प्रयोग करण्यासाठी त्यांना उद्युक्त केलं जातं. हि गोष्ट या आदि कंचकर, पार्थ कुलकर्णी, रचित जैन, शौर्य सिंह, श्रुतेन पांडे आणि विनायक कृष्णा या मुलांनी सिरीयस घेतली. त्यांनी चैन्नईच्या एका टिमसोबत काम करुन या रोबोटचा संकल्प पुर्ण केला.

आत्ता हा रोबोट काय करणार तर ट्रॅफिक सिग्नलवर थांबणार. त्यावर सोळा इंचाचा LED डिस्प्ले असणार आहे. त्यावर हेल्मेट वापरा, सिग्नल मोडू नका, झेब्रा कॉसिंगच्या मागे थांबा टाईम सूचना असणार आहे. (ज्या वाचण्याची शक्यता अजिबातच नाही). आत्ता याहून अधिक म्हणजे या रोबोटचे हात असे आहे  की तो सिग्नल बंद असला की गाड्या थांबवणे, सोडणे अशी कामे करु शकतो. शिवाय एका ठिकाणावरुन दूसरीकडे जाण्यासाठी रोबोटला खास चाके देखील देण्यात आली आहेत. 

या मुलांनी या रोबोटच नाव रोडियो ठेवलं आहे. पोलीस प्रशासनाने हा रोबोटो प्रायोगिक तत्वावर लावण्यात येणार असल्याच सांगितलय. त्याचा उपयोग झाला तर अशाच प्रकारचे रोबोट पुणे शहरात लावण्यात येण्याची शक्यता देखील नाकारता येत नाही. 

बस्स !!! 

आत्ता या गोष्टी कितपत फायद्याच्या होतील ते सांगता येत नाही पण त्या सहा मुलांच कौतुक करणं महत्वाच आहे. पुण्यात ट्रॅफिक आहे हे त्या सहाजणांना दिसतं त्यावर ते उपाय शोधतात. काम करतात. अंमलात आणतात. आणि आपली शक्यता सांगायची झाली तर रोबोट काय करतोय म्हणून त्याला कट मारण्याचीच जास्त आहे. असो पोलीसांना भित नाही म्हणून कायदे मोडायचा कॉन्फिडन्स आला असेल तर किमान त्या मुलांच्या क्रिएटिव्हिटीचा रिस्पेक्ट म्हणून तरी रोबोच्या समोर थांबण्याचं कष्ट घ्या. 

हे ही वाचा.

Leave A Reply

Your email address will not be published.