पुण्यात कंदिलाच्या प्रकाशात गांधीजींचं ऑपरेशन पार पडलं त्याची आठवण जपलेली आहे

आपल्या सर्वांना पुण्यातील ससून जनरल हॉस्पिटल माहीत आहे. पण तुम्हाला कदाचित हे माहिती नसेल कि, याच ससून सरकारी रुग्णालयाच्या इतिहासात राष्ट्रपिता गांधींजींच्या संबंधित एक घटना महत्वाची मानली जाते….ती घटना म्हणजे महात्मा गांधीजींचे एक ऑपरेशन याच हॉस्पिटल मध्ये पार पडले होते…तेंव्हाच घटनाक्रम काय होता?

अमेरिकन पत्रकार लुई फिशर यांनी त्यांच्या “महात्मा गांधी – हिज लाइफ अँड टाइम्स” या पुस्तकात ससून मध्ये पार पडलेल्या शस्त्रक्रियेची सविस्तर माहिती दिली आहे.

१९२२ दरम्यान ब्रिटीश राजवटीत महात्मा गांधींना देशद्रोहाच्या प्रकरणात ६ वर्षांची शिक्षा झाली होती.  त्यादरम्यान त्यांना पुण्यातील येरवडा कारागृहात ठेवण्यात आले होते. शिक्षा भोगत असतांनाच १२ जानेवारी १९२४ रोजी गांधीजी तुरुंगात गांधीजी आजारी पडले, त्यांना अॅपेन्डिसाइटिस झाला होता.  

महात्मा गांधींना त्यांचे अपेंडिक्स काढण्यासाठी ऑपरेशनसाठी ससून हॉस्पिटलमध्ये आणण्यात आले. मुंबईहून भारतीय डॉक्टर येण्याची वाट पाहण्यास सरकार तयार होते.  ऑपरेशन थिएटर शस्त्रक्रियेसाठी सज्ज होत असताना, सर्व्हंट्स ऑफ इंडिया सोसायटीचे प्रमुख व्ही एस श्रीनिवास शास्त्री आणि गांधींचे मित्र डॉ. फाटक यांना त्यांच्या विनंतीवरून बोलावण्यात आले.

पण मध्यरात्रीच्या आधी, ब्रिटिश सर्जन कर्नल मॅडॉक यांनी गांधीजींना कळवले की त्यांचे ताबडतोब ऑपरेशन करावे लागेल आणि एकत्रितपणे, त्यांनी एक सार्वजनिक निवेदन तयार केले, ज्यात असे म्हटले होते की गांधी ऑपरेशनसाठी सहमत आहेत, डॉक्टरांनी त्यांच्यावर चांगले उपचार केले आहेत आणि काहीही झाले तरी सरकारविरोधी आंदोलन होऊ नये. गांधीजींकडून त्यांनी संमती मिळवली आणि हे ऑपरेशन सुरु झाले. 

या निवेदनाची अत्यंत आवश्यकता होती कारण, हॉस्पिटलच्या अधिकाऱ्यांना आणि गांधींना माहीत होते की ऑपरेशन जर नीट झाले नाही तर संपूर्ण भारतात वादळ येऊ शकते. 

येथील बीजे मेडिकल कॉलेजच्या संग्रहालयाच्या माहितीनुसार, १२ जानेवारीच्या मध्यरात्री १२ वाजता त्यांच्यावर शस्त्रक्रिया सुरू झाली. बापूंवर शस्त्रक्रिया करणारे ब्रिटिश सर्जन कर्नल मडक नावाचे डॉक्टर होते. पण गांधीजींवर जे ऑपरेशन चालू होते ते चालू असतांनाच अचानक लाईट गेली. आणि त्यामुळे ऑपरेशन अर्धेच झाले होते. 

पण डॉक्टरांच्या टीम ने लाईट गेल्यावर कंदिलाच्या उजेडात बापूंचे ऑपरेशन पूर्ण केले. 

पण नंतर प्रचंड गडगडाटी वादळामुळे हॉस्पिटलची वीज गेली आणि एक फ्लॅशलाइट वापरण्यात आला पण तोही संपला.. शेवटी, एक दिवा बचावासाठी आला आणि बापूंचे ऑपरेशन कंदिलाच्या उजेडात पूर्ण झाले. त्यादरम्यान त्यांना पुण्यातील येरवडा कारागृहात ठेवण्यात आले होते. तुरुंगात असताना गांधीजींना अॅपेन्डिसाइटिस झाला होता. तपासणीनंतर त्यांच्यावर शस्त्रक्रिया करण्याचा सल्ला देण्यात आला. आणि विशेष म्हणजे हि शस्त्रक्रिया देखील यशस्वी झाले होते. यशस्वी शस्त्रक्रियेनंतर गांधींनी मॅडॉकचे आभार मानले, असे फिशरने त्यांच्या पुस्तकात लिहिले.

५ फेब्रुवारी १९२४ रोजी सरकारने गांधींची उर्वरित शिक्षा माफ केली आणि त्यांची बिनशर्त सुटका केली.

त्यावेळी या संपूर्ण घटनेवर आधारित एक पेंटिंगही बनवण्यात आली होती जी आजही या रुग्णालयात सुरक्षित जपून ठेवण्यात आली आहे.

ससून रुग्णालयाच्या इमारतीत ज्या खोलीत बापूंवर शस्त्रक्रिया करण्यात आली होती ती खोली आता बंद करण्यात आली आहे. तिथे बापूंच्या ऑपरेशन दरम्यान बनवलेले दुर्मिळ पेंटिंग बसवण्यात आली आहे. 

अजूनही ससून हॉस्पिटल महात्मा गांधींच्या शस्त्रक्रियेचा यशस्वी दिवस म्हणून उत्सव साजरा करत असते.  त्यानंतर रुग्णालयाच्या जुन्या दगडी इमारतीत, या घटनेच्या आजूबाजूला आणि शस्त्रक्रिया झालेल्या खोलीत गांधीजींचे स्मारक तयार करण्यात आलेय. या स्मारकात महात्मा गांधींचे ज्या खाटेवर  ऑपरेशन झाले त्यासही टेबल, शस्त्रक्रियेच्या वस्तू, ऑपरेशन नोट्स आणि भूलतज्ज्ञांची नावे जतन करून ठेवली आहेत. रूग्णालयाच्या नेत्रचिकित्सा विभागात त्या खोलीत त्या घटनेचे स्मरण करणारे बापूंच्या ऑपरेशन दरम्यान बनवलेले दुर्मिळ पेंटिंग बसवण्यात आली आहे. 

परंतु हे स्मारक सामान्य लोकांसाठी प्रवेश नाहीये आणि केवळ वर्धापनदिनानिमित्त उघडले जाते.

हे हि वाच भिडू :

 

 

 

 

 

Leave A Reply

Your email address will not be published.