पुण्याच्या राजभवनात घुसला वीरपन्न …

राजभवन म्हणजे काय माहिताय का ? नाही. आत्ता ते पण सांगायचं का ? राजभवन म्हणजे राज्यपाल राहतात ती जागा. ओके. अशा पण जागा असतात जिथं राज्यपाल राहत नाहीत. म्हणजे ते कधीतरी राहू शकतात पण त्यांचा मुड आला की ते जिथं जावू शकतात अशी हक्काची जागा. महाराष्ट्रात अशी राजभवनं पुणे, महाबळेश्वर आणि नागपुरमध्ये आहेत.

थोडक्यात सांगायचं झालं तर मुंबईतलं राजभवन हे रोजचं मुक्कामाचं केंद्र आणि पुण्यातलं हे हक्काचं वाटेल तेव्हा येवून रहायचं ठिकाण. पुणे विद्यापिठाकडून औंधच्या दिशेनं चाललं कि ट्रफिक लागतं. या ट्रॅफिकमध्येच डाव्या हाताला राजभवन आणि त्याच्या अलीकडं उजव्या हाताला चतुश्रृंगी पोलिस स्टेशन लागतं. या पोलिस स्टेशनच वैशिष्य म्हणजे नाव लिहायला अवघड असणारं हे एकमेव पोलिस स्टेशन आहे. असो तो विषय वेगळा आहे आपण मुदयावर येवूया.

तर हे राज्यपालांच निवासस्थान गर्द झाडीनं नटलं आहे, अस म्हणलं जातं. पुणेकरांना त्यावर विश्वास बसणं शक्य नाही पण हि घटना ऐकल्यानंतर तुमचा पण विश्वास बसेल. तर या राजभवनाच्या आवारात झाडी आहे. उत्तम मोकळी जागा आहे. भव्यदिव्य पटांगण आहे, तीन चार गेट आहेत आणि या सर्वांवर देखरेख करण्यासाठी एकच पोलिस आहे ???? काय फक्त एकच पोलिस.

जीं हां मित्रों सहीं सुनां आपनें. गेट तीन औरं आदमी एक. क्या ये सच हैं. जी हां बिल्कुल सच हैं… आत्ता याच एकट्या माणसाचा फायदा घेवून पुण्याच्या राजभवनमधून चक्क पाच चंदनाची मोठ्ठी झाडं चोरीला गेली आहे.

पाच झाडं. ती पण मोठ्ठी. ती कापली. ट्रकामध्ये टाकली. आणि घेवून गेले. ते पण राजभवनातून ते पण पाच. पुढं पोलिस स्टेशन. नेतायत कुठणं राजभवनातनं. छान छान. आत्ता काय करायचं. ?

हे राजभवन ३२ एकरवर पसरलं आहे. या बत्तीस एकरवर एकुण CCTV कॅमेरे आहेत शुन्य. आणि पोलिस एक. आत्ता या पुढची हाईट म्हणजे दोन वर्षांपुर्वी देखील अशी विरप्पनगिरी या राजभवनात झाली होती आणि तेव्हा चार झाडं या चोरांनी चोरुन नेली होती. त्याचवेळी पोलिसांनी मनावर घेवून कारवाई करणं अपेक्षीत होतं पण राहिलं. गुलाबराव पोळ कमिश्नर असताना. तेच ते ज्यांच्यावर प्लॅनचेटचे आरोप झालते. तर त्यांनी राजभवनाची सुरक्षा मनावर घेवून सूचना केलेल्या पण त्या देखील तशाच राहिल्या.

या सर्व कार्यक्रमात सामान्य पुणेकरानां मागच्या वेळी चार घेवून गेले या वेळी पाच घेवून गेले तर यांनी मागच्या वेळीच ९ च्या ९ झाडं का नेली नाहीत, रामदेवबाबांचा गुडघा दुखाय लागल्यामुळे भक्तांनी चंदनाचा लेप लावायला हि झाडं नेली असावीत असा गुढ प्रश्न पुणेकरांना पडला आहे अस आमचा प्रतिनिधी कळवतो.

1 Comment
  1. Anonymous says

    रामदेव बाबा च्या गुडघ्याला राष्ट्रपती भवनातली झाड नेत्याल की… पुन्यापत्तुर कह्याला येत्याल?

Leave A Reply

Your email address will not be published.