विद्येचे माहेरघर असणाऱ्या पुण्यात महाराष्ट्रातील पहिली ‘सिटी लायब्ररी’ उभी राहणार आहे

अनादी अनंत काळापासून पुणे म्हटलं की लोक म्हणतात विद्येचे माहेरघर, ऑक्सफर्ड ऑफ ईस्ट.फक्त भारतच नाही तर संपूर्ण जगभरातून लोक शिक्षणासाठी पुण्याला येतात. या देशाला दोन पंतप्रधान, राष्ट्रपती पुण्याच्या विद्यानगरीने दिले. जगाच्या पाठीवरचं सगळं ज्ञान या गावात सामावलंय.

इतकं असलं तरी पुण्याचं एक दुर्दैव म्हणजे विद्येचं माहेरघर असूनही या शहरात सार्वजनिक ग्रंथालयं अगदी मोजकीच आहेत.

याहूनही धक्कादायक गोष्ट म्हणजे मागच्या ५० वर्षात एकही नवे सार्वजनिक ग्रंथालय उभे राहिले नाही. यावर अनेकवेळा चर्चा करून झाल्यानंतर पुणे महापालिकेच्या वतीने घोले रस्त्यावर असणाऱ्या पालिकेच्या मामाराव दाते मुद्रणालयाच्या जागेवर हि ‘सिटी लायब्ररी’ उभारण्यात येणार आहे.

तत्कालीन आयुक्त शेखर गायकवाड यांनी पालिकेत प्रस्ताव मंजूर झाल्यावर मामाराव दाते मुद्रणालयाच्या जागेची पाहणी केली होती. त्यानंतर आता या जागेवर पुणेकरांसाठी बलाढ्य अशी ‘सिटी लायब्ररी’ उभी राहणार आहे. 

लेखक, प्रकाशक यांच्यासह ग्रंथालयाचा सांस्कृतिक वारसा सिटी लायब्ररी उत्तम प्रकारे जपेल असे सांगण्यात येत आहे. 

पुणे महापालिकेच्या वतीने उभारण्यात येणारी ‘सिटी लायब्ररी’ हि राज्यातील पहिली असणार आहे.

मागच्या ५० वर्षांचा विचार केला पुणे शहरात एकही सार्वजनिक लायब्ररी उभी राहिली नाही

मागच्या ५-२५  वर्षांचा विचार केला तर विद्यार्थी, महाविद्यालये यांची संख्या वाढली मात्र त्याप्रमाणात ग्रंथालय, लायब्ररी वाढल्या नाहीत. हा गॅप भरून काढण्यास सिटी लायब्ररी महत्वाची ठरणार आहे.

पुणे मराठी ग्रंथालय, शासकीय ग्रंथालय, जयकर लायब्ररी हि पुणे शहरातील महत्वाची वाचनालय. 

पुणे मराठी ग्रंथालय

 नारायण पेठेतील पुणे मराठी ग्रंथालय हे तसे बऱ्याच जणांच्या परिचयाचे ग्रंथालय. मध्य वस्तीत आधुनिक तीन मजली इमारत, प्रशस्त पार्किंग आणि शिस्त यामुळे गेली कित्येक दशके ग्रंथालयाचे सभासदत्व असलेले पुणेकर आजही पुस्तकांसाठी पुणे मराठी ग्रंथालयात येतात. विजयादशमीला दोन ऑक्टोबर १९११ रोजी एका वाड्यात पुणे मराठी ग्रंथालयाची सुरुवात झाली. न. चिं. केळकर यांच्या पुढाकारातून ग्रंथालयाची स्थापना करण्यात आली. १९२९ साली ग्रंथालयाचे सध्याच्या वास्तूत स्थलांतर झाले. 

पुण्यातील शासकीय ग्रंथालय विश्रामबागवाड्यात वसलेला हा पुस्तक खजिनाच आहे.

खरं तर या ग्रंथालयाची स्थापना स्वातंत्र्य मिळाल्यानंतर लगेचच म्हणजे १९४८ साली करण्यात आली आहे. पुणे महानगरपालिकेने या ग्रंथालयाची स्थापना केली होती. १९६७च्या कायद्यानुसार मधुकरराव चौधरी यांच्या पुढाकाराने ‘गाव तिथे ग्रंथालय’ ही योजना राबवायला सुरुवात झाली. त्यानंतर सहा प्रशासकीय विभागांमध्ये एकेक शासकीय ग्रंथालय उभारण्यात आले. त्यानुसार एक ऑक्टोबर १९६९पासून हे ग्रंथालय शासनाच्या ताब्यात गेले आहे.

आज ग्रंथालयात मराठी, इंग्रजी, हिंदी अशी तिन्ही भाषांमधील मिळून तीन लाख ५७ हजारांहून अधिक पुस्तके आहेत. या ग्रंथालयाचे सभासदत्व मिळवण्यासाठी वाचकांना पुण्याचा रहिवासी दाखला आणि शंभर रुपये अनामत रक्कम जमा करावी लागते. 

पुण्याची ग्रंथालयपरंपरा

१८४८ – पुणे नगर वाचन मंदिर (ब्रिटिशकालीन नेटिव्ह जनरल लायब्ररी)

१९१० – भारत इतिहास संशोधक मंडळाचे ग्रंथालय

१९३२ – केसरी-मराठा ग्रंथशाळा

१९४८ – शासकीय प्रादेशिक ग्रंथालय (विश्रामबागवाडा)

१९५० – जयकर ग्रंथालय (सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ)

५० वर्षानंतर आता पहिल्यांदा सिटी लायब्ररी उभी राहणार आहे.

शिवाजीनगर परिसरात अनेक शैक्षणिक संस्था असून, शाळा-महाविद्यालयांसह इतर खासगी संस्थांतही अनेक विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. या विद्यार्थ्यांच्या अभ्यासासाठी आवश्यक जागा उपलब्ध करून देण्यासाठी ‘सिटी लायब्ररी’ निर्माण करण्यात येणार आहे.

३ मजली इमारत उभी राहणार आहे

पुणे शहर हे जगभरातील विद्यार्थ्यांसाठी एज्युकेशनल हब बनले आहे. मात्र त्याला साजेशी एकही लायब्ररी नाही. पुणे शहराला साहित्याचा मोठा इतिहास आहे. स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करण्यासाठी राज्याचा कानाकोपऱ्यातून विद्यार्थी येत असतात.

आता ६ हजार स्क्वेअर फुट जागेवर ३ मजली इमारत उभी राहणार आहे. पार्किंगसाठी वेगळी व्यवस्था असणार आहे. पहिल्या मजल्यावर खासगी कार्यालये आणि मेसची व्यवस्था करण्यात येणार आहे. यातून काही प्रमाणात आर्थिक फायदा होणार आहे.

आणि दुसऱ्या मजल्यावर लायब्ररी, वेटिंग रूम, वाचनालय, तसेच डिजिटल लायब्ररी, कार्यालय आणि बुक गॅलरी असणार आहे. तर तिसऱ्या मजल्यावर रिडींग रूम आमी डिजिटल लायब्ररी असणार आहे. कतात.

सिटी लायब्ररीसाठी साधारण ६.७१ कोटी खर्च येणार असल्याचे महापालिकेच्या वतीने सांगण्यात येत आहे. 

या लायब्ररीत ५० हजार पुस्तक असणार आहे. वाचनालयात ४०० विद्यार्थांना बसण्याची सोय करण्यात आली आहे. तसेच ४० कम्प्युटर असणार आहे. मेस मध्ये येकाचवेळी ६० जण बसून जेऊ शकतात. याची क्षमता १५० पर्यंत वाढविण्यात येणार आहे. तर  ६४ कार, ४०० पेक्षा अधिक दुचाकीच्या  पार्किंगची व्यवस्था असणार आहे.

अशा प्रकारची लायब्ररी शहराच्या मध्यभागी उभी राहिल्याने साहित्य सेवेत आणखी भर पडेल याबाबत दुमत नाही. फक्त पुण्यातच नाही तर संपूर्ण महाराष्ट्रात उभी राहणारी ही पहिली सिटी लायब्ररी असणार आहे. 

हे हि वाच भिडू 

webtitle : Pune News: Maharashtra’s first city library is starting in Pune.

Leave A Reply

Your email address will not be published.