कोण आहेत पुण्याचे दोशी ज्यांचं मोदींपासून एलिझाबेथ राणीपर्यंत सगळ्यांनीच कौतुक केलयं.

भारतात कलेची आणि कलाकारांची कमी नाही. त्यामुळेच आपला देश आपल्या अनोख्या कलेच्या वारश्यासाठी  देखील ओळखला जातो. ज्याची दखल आंतरराष्ट्रीय स्तरावर देखील नेहमीच घेतली जाते. यातलचं सध्याचं उदाहरण म्हणजे प्रसिद्ध भारतीय वास्तुविशारद बाळकृष्ण दोशी.  ज्यांना ‘रॉयल ​​गोल्ड मेडल २०२२’ ने गौरवण्यात येणार आहे.

रॉयल ​​गोल्ड मेडल हा ब्रिटन सरकारचा प्रतिष्टीत पुरस्कार आहे, जो वास्तुकलेसाठी जगातील सर्वोच्च सन्मानांपैकी एक मानला जातो. नुकताच रॉयल इंस्टिट्यूट ऑफ ब्रिटिश आर्किटेक्ट्स (RIBA) ने ट्विट करून ही घोषणा केलीये.

RIBA ने बाळकृष्ण दोशी यांच्या कामाची दाखल घेत म्हंटल की, ९४ वर्षीय दोशी यांनी आपल्या ७०  वर्षांच्या कारकिर्दीत आणि १०० पेक्षा जास्त बांधलेल्या प्रोजेक्टसोबत आपल्या सराव आणि शिकवणीद्वारे भारत आणि त्याच्या आसपासच्या प्रदेशातील वास्तुकलेच्या दिशेवर प्रभाव टाकला आहे.

त्यामुळेचं आजीवन केलेल्या कामाला मान्यता देणाऱ्या रॉयल गोल्ड मेडलला राणी एलिझाबेथ II ने वैयक्तिकरित्या मान्यता दिली आहे. आणि हे अशा व्यक्ती किंवा लोकांच्या गटाला दिले जाते, ज्यांचा वास्तुकलेच्या विकासावर महत्त्वपूर्ण प्रभाव पडला आहे.

RIBA च्या या घोषणेनंतर दोशी यांना मोठा आनंद झालाय. त्यांनी आपल्या प्रचंड विजयाबद्दल म्हंटल की,

” मी आश्चर्यचकित आहे आणि इंग्लंडच्या राणीकडून ‘रॉयल ​​गोल्ड मेडल’ मिळाल्याच्या गोष्टीने सन्मानित झाल्यासाखं वाटतंय. हा खूप मोठा सन्मान आहे.’

आता बाळकृष्ण दोशी यांच्याबद्दल बोलायचे झाले तर, १९२७ मध्ये पुण्यात फर्निचर उत्पादनात गुंतलेल्या कुटुंबात जन्मलेल्या बाळकृष्ण दोशी यांनी जेजे स्कूल ऑफ आर्किटेक्चर, बॉम्बे येथे शिक्षण घेतले. त्यांच्या  कामात भारताच्या वास्तुकला, हवामान, स्थानिक संस्कृती आणि कलाकुसरीच्या परंपरांवर खोलवर ठसा उमटवलेल्या आधुनिकतावादाचे एकत्रीकरण दिसून येते.

त्याच्या प्रकल्पांमध्ये प्रशासकीय आणि सांस्कृतिक सुविधा, गृहनिर्माण विकास आणि निवासी इमारतींचा समावेश आहे. त्यांनी जेले कॉर्बुझियर यांच्यासोबत पॅरिसमध्ये वरिष्ठ डिझायनर म्ह्णून १९५१ ते १९५४ या चार वर्षांच्या काळात काम केले.

दोशी यांनी वास्तुविशारद लुई कान यांच्यासोबत इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट (IIM), अहमदाबाद तयार करण्यासाठी सहयोगी म्हणून काम केले. त्यांनी १० वर्षाहून अधिक काळ कान्समध्ये सहकार्य केले. त्यांच्या या कामासाठी त्यांना २०१८ साली प्रित्झकर पुरस्काराने सुद्धा सन्मानित करण्यात आलंय.

दोशी पंजाबची नवीन राज्य राजधानी जी सध्या पंजाब आणि हरियाणाची संयुक्त राज्याची राजधानी म्हणून काम करते. या राजधानीच्या डिझाइनमध्ये  सहभागी होते.

ब्रिटन सरकारच्या घोषणेनंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देखील दोशी यांचे प्रतिष्ठित यूके पुरस्कार जिंकल्याबद्दल बाळकृष्ण दोशी यांचे अभिनंदन केले आहे. ते म्हणाले की, “दोशी यांचे जगातील वास्तुकलेतील योगदान अविस्मरणीय आहे. सर्जनशीलता आणि वेगळेपणामुळे  त्यांच्या कलाकृतींचे जगभरात कौतुक होत आहे.”

दरम्यान, बाळकृष्ण जोशी यांना ब्रिटनचा हा रॉयल गोल्ड मेडल पुरस्कार पुढच्या वर्षी मिळणार आहे.

हे ही वाचं भिडू :

English Summary:

Prime Minister Narendra Modi Friday congratulated acclaimed Indian architect Balkrishna Doshi on being awarded the UK’s prestigious Royal Gold Medal 2022 and said his contributions to the world of architecture are monumental. Mr. Doshi will receive the Royal Gold Medal 2022, one of the world’s highest honors for architecture, the Royal Institute of British Architects (RIBA) announced.

 

Web Title : Pune News :Renowned Architect Bal Krishna Doshi Awarded 2022 RIBA Royal Gold Medal for Architecture

 

 

Leave A Reply

Your email address will not be published.