गोष्ट संपुर्ण गाव कंरोटाईन करण्याची. वाचा, प्रशासन नेमकं काय करतय.

२१ दिवस घरी थांबायचं आहे. काहीजणांना टेन्शन आलय. साहजिक आहे म्हणा. दिवसागणिक कोरोनाची व्याप्ती वाढतेय. काळजी घेणं तितकच गरजेच आहे. बाहेर पडणाऱ्यांना पोलीस चांगलच सोलून काढत आहेत. काहीजण प्रशासनावर टिका करण्यात देखील धन्यता मानत आहेत.

प्रशासन काहीच करत नाही, असं वाटणारी लोकं देखील आपल्याकडे आहेत. त्यासाठी हे गोष्ट वाचण्याची गरज आहे. पुणे मिररमध्ये या संबधित सविस्तर बातमी छापून आली होती.

पुण्यातील महिलेला कोरोना झाल्यानंतर कशाप्रकारे प्रशासनाने संपुर्ण गावाला विलगीकरण करण्याचं शिवधनुष्य पेललं त्याची ही गोष्ट.

वाचा आणि मगच सांगा प्रशासन काय काम करतय.

काही दिवसांपूर्वी बातमी आली की कोणताही परदेशी प्रवास न केलेल्या आणि कोणत्याही परदेशी प्रवास केलेल्या व्यक्तीच्या संपर्कात न आलेल्या एका अंगणवाडी सेविकेला कोरोनाची बाधा झाली. ही महिला अंगणवाडी सेविका होती. आपल्याला माहितच असेल निदान होईपर्यन्त कोरोनाचा रुग्ण एका कॅरियर प्रमाणे काम करतो. म्हणजे तो विषाणू इतर ठिकाणी पसरत जातो.

ही महिला अंगणवाडी सेविका होती. साहजिक प्रशासन सतर्क झालं आणि सुरू झाला एका पिक्चरसारखा प्रवास. पुढच्या दोन दिवसात अधिकारी वर्गाने अंगणवाडी सेविकेच्या संपर्कात आलेल्यांचा शोध घेण्यात सुरवात केली.

तारिख २० मार्च.

पुणे सातारा रोडवरच्या भारती हॉस्पीटल या खाजगी दवाखान्यात दाखल करण्यात आलेल्या महिलेला कोरोनाची बाधा झाल्याचं समजलं. त्यानंतर संपुर्ण टिम धावली ती वेल्हा तालुक्यातील एका गावात. या गावाला अंगणवाडी सेविकेने भेट दिली होती. २० मार्च रोजी सायंकाळी आरोग्य कर्मचाऱ्यांनी ३० घरांसह संपुर्ण गाव स्कॅन करण्यास सुरवात केली.

राजेश परदेशी, निर्मला गायकवाड, पूनम कांबळे आणि दिपक सुर्यवंशी या चार आरोग्य कर्मचाऱ्यांच्या पथकाने अंगणवाडी सेविकेने भेट दिलेली शक्य तितकी गावे स्कॅन करण्यास सुरवात केली.

एकूण १२ खेड्यांची संख्या होती. इकडे एक टिम संपुर्ण गावे स्कॅन करण्याच्या मार्गाला लागली होती तर तिकडे पुणे जिल्हा परिषदेच्या कार्यालयातील एका गटाने पुढच्या पातळीवर युद्धमोहीम हाती घेतली. या टिममध्ये वेल्ह्याचे तहसिलदार, गटविकास अधिकारी, जिल्हा परिषदेचे आरोग्य कर्मचारी, उपमुख्य कार्यकारी अधिकारी असे अधिकारी होते.

या दरम्यानच्या काळात अंगणवाडी सेविका कुठे कुठे गेली याची चौकशी करण्यात येत होती.

६ मार्चला ही महिला सिंहगड रोडवरील एक मिटींगला हजर होती. त्यानंतरच्या दोन दिवसात कोरोनाची सौम्य लक्षणे तिला जाणवू लागली. म्हणून तिने घरीच विश्रांती घेण्याचा निर्णय घेतला. ९ मार्चला ताप आल्यानंतर ती एका स्थानिक डॉक्टरांकडे गेली. औषधे घेवून ती दोन दिवस घरी राहिली होती. १२ मार्चला बरे वाटू लागल्याने ती अंगणवाडीच्या आपल्या कामासाठी वेल्हे तालुक्यातील काही गावांना भेटी देण्यासाठी गेली. पुन्हा तब्येत खालावल्याने ती १३ मार्चला स्थानिक दवाखान्यात व त्यानंतर भारती हॉस्पीटलमध्ये भरती झाली.

या काळात तिने मुंबईतील एका लग्नासाठी हजेरी लावली होती. लग्नात सुमारे दिड हजार लोक उपस्थित होते. त्याचबरोबरीने तिने हा प्रवास शेअरिंग रिक्षा, बस, जीप असा केला होता.

मात्र सर्वात कठिण गोष्ट होती तिने भेट दिलेली १२ गावे. ही बारा गावे सीमा सुरक्षा बल BSF मार्फत ताब्यात घेण्यात आली. समाधानाची बाब अशी होती की एकाही व्यक्तीला लक्षणे दिसत नव्हती.  शनिवारी रात्री 9 वाजेपर्यंत सर्व्हे करून BSF सूचनांच्या प्रतीक्षेत होते. त्यांच्या मदतीसाठी स्थानिक पोलिसांची टीमही दाखल झाली होती आणि त्यांचे वरिष्ठ अधिकारी पुण्याहून रवाना झाले होते.

वरिष्ठ अधिकारी ऑर्डर घेवून आले.

अंगणवाडी सेविका कार्यरत असलेल्या खेड्यांसह, १२ खेड्यांचा संपूर्ण परिसर कंटेन्टमेंट झोन म्हणून घोषित करण्याच्या सूचना देण्यात आल्या

या भागात जाण्या येण्यावर प्रतिबंधित करण्यात आला. आजूबाजूला चौक्या तयार कराव्यात अशी सुचना देण्यात आली. गेल्या काही दिवसांपासून जी व्यक्ती त्यांच्या संपर्कात आली होती त्या प्रत्येक व्यक्तीला घरी अलग ठेवणे ही आणखी एक महत्त्वाची सूचना होती.

30 हून अधिक अधिकाऱ्यांची फौज कार्यरत झाली. जिल्हाधिकाऱ्यांनी जारी केलेल्या  होम क्वारंटाईन ठेवण्याच्या आदेशासह आणि शाश्वत शाईने शिक्के घेऊन ही टीम त्या घरात गेली जिथे या महिलेच्या संपर्कात आलेल्या 20 व्यक्ती राहत होत्या.

संपर्कात आलेले लोक आणि त्यांचे कुटुंबीय यांना वेगळे  ठेवण्यात आले मध्यरात्रीपर्यंत 73 जणांना आपापल्या घरात क्वारंटाईन करण्यात आलं. त्यानंतर हे बीएसएफ पथक शिबिरात गेले. ज्येष्ठांना आता काय खबरदारी घ्यावी याची माहिती दिली कारण त्यांचे संकुलही कंटेन्टमेंट झोन अंतर्गत होते.

हे सगळ करताना मध्यरात्रीची झाली,चार आरोग्य कर्मचारी सकाळपासुन काहीचं खाल्लेल नव्हत, एका पोलिसांनी  प्रत्येकाच्या रात्रीच्या जेवणाची व्यवस्था केली होती कारण रविवारचा दिवस फार कठिण होता.

दुसर्‍याच दिवशी राष्ट्रीय जनता कर्फ्यू दरम्यान १२ गावात पसरलेल्या १०० हून अधिक आरोग्य कर्मचाऱ्यांनी पुन्हा एकदा प्रत्येक घरातील पाहणी केली. आणखी एक टीम संपूर्ण वेल्हा तालुक्यात अंगणवाडी सेविकांच्या शोधात निघाली, ज्या व्यक्ती अंगणवाडी सेविकेच्या थेट किंवा अप्रत्यक्ष संपर्कात आले असेल अशा सर्वांची तपासणी करण्यात आली. अथक प्रयत्नानंतर रविवारी संध्याकाळपर्यंत होम क्वारंटीनची संख्या 87 वर गेली.

अथक परिश्रम घेवून संपुर्ण टिमने संपुर्ण गावं कोरंन्टाईन करण्याची कामगिरी पार पाडली.

हे ही वाच भिडू.

Leave A Reply

Your email address will not be published.