विकास पुरुषाचा वाद झाला पण आता पुण्यात शहराच्या विकासावरून स्पर्धा लागली आहे

पुणे महापालिकेचा निवडणुकीला अजून ६ महिने बाकी आहे. मात्र आता पासून राजकारण तापल आहे. गेल्या महिन्यात राष्ट्रवादी कॉंग्रेस आणि भाजप मध्ये पुण्याच्या ‘विकास पुरुष’ कोण यावरून चांगलाच वाद रंगला होता. आता त्यानंतर शहरातील विकास कोणी केला याबाबत दोन्ही पक्षांनी एकमेकांवर कुरघोडी करतांना दिसत आहे.

मागच्या महिन्यात भाजपकडून विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस तर राष्ट्रवादी कॉंग्रेसकडून अजित पवार या दोघांच्या वाढदिवसानिम्मित शहरभर बॅनर लावण्यात आले होते. या बॅनर फडणवीस यांना ‘विकासपुरुष’, ‘नव्या पुण्याचे शिल्पकार’ अशी विशेषणे लावण्यात आली होती. तर त्याला प्रत्युत्तर म्हणून राष्ट्रवादी कॉंग्रेसकडून  ‘पुणेकरांचा विश्वास, दादा म्हणजेच विकास,’ असे दिले बॅनर लावण्यात आले होते.

या वादानंतर पुन्हा एकदा विकासाचा मुद्दा पुढे करून दोनही पक्ष स्पर्धेच्या माध्यमातूम एकमेकांसमोर उभे राहिले आहेत.  कोरोनामुळे पुणे महापालिकेची निवडणूक वेळेवर होईल का याबाबत प्रशासन साशंक आहे. मात्र दोन्ही पक्ष विकासाच्या मुद्यावरून एकमेकांना टार्गेट करत आहेत. तर आमच्या कार्यकाळातच पुण्यात कसा विकास झाला याचा दावा दोन्ही पक्ष करतांना दिसत आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसकडून  विकासाची पोलखोल स्पर्धा

पुणे महापालिकेतील सत्ताधारी भाजपाविरोधात राष्ट्रवादी काँग्रेसकडून विकासाची पोलखोल या स्पर्धेची घोषणा करण्यात आली आहे. यामध्ये व्हिडिओ आणि सेल्फी फोटो पोस्ट करणार्‍या विजेत्या स्पर्धकास ११ हजार ११ बक्षीसाची घोषणा देखील करण्यात आली.

पुणे महापालिकेत २०१७ पर्यंत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची सत्ता होती. पण २०१७ च्या निवडणुकीत पुणेकर नागरिकांनी भाजपाच्या हाती सत्ता दिली. मात्र मागील साडेचार वर्षाच्या काळात महापालिकेतील सत्ताधारी भाजपाकडून कोणत्याही योजना पूर्णत्वाकडे घेऊन जाण्यात अपयश आल्याचा दावा राष्ट्रवादीने केलाय.

कचरा प्रकल्प पूर्ण क्षमतेने सुरू नाही, दांडेकर पूल येथे कालवा फुटीची घटना, शहरात अनेक भागात खड्डे, यासारख्या समस्या आहेत असं राष्ट्रवादीचं म्हणणं आहे. रस्त्यावरील खड्ड्यांसारख्या दैनंदिन आयुष्याशी निगडीत समस्यांमुळे सर्व सामान्य नागरिकांना वाहने चालविणे कठीण झालं राष्ट्रवादीकडून सांगण्यात आले आहे.

आपल्या परिसरातील समस्या संबधित व्यक्तीने व्हिडिओ किंवा फोटो #polkholpune या हॅशटॅगवर पोस्ट करण्याचे आवाहन राष्ट्रवादी पक्षाकडून करण्यात आले आहे. या स्पर्धेत विजेत्या ठरणाऱ्या व्हिडिओ आणि सेल्फी फोटोला प्रत्येकी ११,१११ रुपये असे बक्षिस देण्यात येणार आहे.

भाजपकडून महाविकास सरकारने पुणे शहरासाठी केलेले एक भरीव विकासकाम दाखवा अशी स्पर्धा आयोजित केली आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसच्या पोल खोल स्पर्धेनंतर भाजपकडून अशाच प्रकाराची घोषणा करण्यात आली आहे.  राज्यात गेल्या दीड वर्षात सत्तेत असलेल्या महाआघाडी सरकारने पुणे शहरासाठी केलेले एक भरीव विकासकाम दाखवा आणि बक्षीस जिंका अशी घोषणा पुणे भाजपकडून करण्यात आली आहे. 
तिघा जणांना प्रत्येकी १५ हजार रुपयांचे रोख बक्षीस देण्यात येणार आहे . या स्पर्धेत सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले आहे. या दोन्ही स्पर्धांमधून राष्ट्रवादी विरुद्ध भाजपाचा एकमेकांवर कुरघोडी करण्याचा सामना पुणेकरांना पाहण्यास मिळत आहे.

“राज्यात भाजपाचे सरकार सत्तेत असताना खूप मोठ्या प्रमाणात विकासकामे झाली. मेट्रो, पीएमआरडीएची स्थापना, पुणे विकास आराखड्याला मान्यता, भामा आसखेड पाणीपुरवठा प्रकल्प, समान पाणीपुरवठा प्रकल्प, स्वारगेट मल्टी ट्रान्सपोर्ट हब, चांदणी चौक बहुउद्देशीय वाहतुक प्रकल्प, बस खरेदी, कॅन्टोन्मेंट बोर्डासाठी विकासनिधी अशा विविध प्रकल्पांमुळे शहराच्या नियोजनबद्ध विकासाला चालना मिळाली. काँग्रेस राष्ट्रवादीच्या कारकीर्दीत शहराचा विकास खुंटला असा आरोप जगदीश मुळीक यांनी केला आहे.

राज्यात महविकास आघाडी सत्तेत आल्यानंतर पुन्हा शहराच्या विकासाला खीळ बसली आहे. गेल्या दीड वर्षांत शहरासाठी एकही नवीन प्रकल्प आणता आला नाही. उलट सुरू असलेल्या विकासकामात खोडा घालण्यात आला.

महविकास आघाडी सरकार भ्रष्टाचारी, स्त्रियांवर अन्याय करणारे आहे. या सरकारमधील माजी गृहमंत्री फरार आहेत. महिलांवर अत्याचार करणाऱ्या मंत्र्याला राजीनामा द्यावा लागला. जनतेच्या हिताचा कोणताच निर्णय सरकारला घेता आला नाही. विकासकामांच्या नावाने हातात भोपळा आहे. त्यामुळे जनतेमध्ये प्रचंड असंतोष आहे. याच भीतीने राष्ट्रवादीची नौटंकी सुरू आहे. याला उपरोधिकपणे उत्तर देण्यासाठी ही स्पर्धा आयोजित केली करण्यात आल्याचे जगदीश मुळीक यांनी सांगितले.

महाविकास सरकारने पुणे शहरासाठी केलेले एक भरीव विकासकाम दाखवा अशी स्पर्धा आयोजित केले असून त्याचे उत्तरे  ९९२२७४४६४४ या व्हॉट्सॲप नंबरवर पाठवावीत. योग्य व समाधानकारक उत्तर देणाऱ्या पहिल्या तीन स्पर्धकांना प्रत्येकी पंधरा हजार रुपयांचे बक्षीस दिले जाईल असे पुणे भाजकडून सांगण्यात आले आहे. 

हे हि वाच भिडू 

Leave A Reply

Your email address will not be published.