पुणेरी पगडी सर्वांस रगडी..

पुणेरी पगडी नाकारून पुण्याच्या पगडीने बातमीमुल्य मिळवलं. त्यानंतर चर्चा चालू झाली ती पुणेरी पगडीची. सोबत फुल्यांची पगडी देखील चर्चेत होती. पण पगडीचं हे राजकारण आजचं नाही पगडीच्या राजकारणाला देखील मोठ्ठा इतिहास आहे. काय आहे तो इतिहास. आणि पगडीचे नेमके किस्से काय आहेत ते सांगत आहेत प्रा. गणेश राऊत.

विविध जातींच्या पगड्या –

सध्याच्या काळात एखाद्याच्या जातीचा अंदाज बांधण्याचं अजब, गजब स्कील माणसांच्या अंगात असत. नाव सांगितलं तर समोरचा व्यक्ती आडनाव कसा सांगेल याचा अंदाज बांधणं. आडनाव माहित असेल तर तुम्ही मुळचे कुठले विचारतं एखाद्याच्या मुळाचा अचूक ठाव घेणं याच उत्तम स्कील लोकांकडे असत. शेवटी काहीही करुन समोरच्याच मुळ शोधून काढलं कि ती व्यक्ती मनातल्या मनात खूष होते.

पण जून्या काळी इतकं कष्ट घेण्याची गरज नव्हती. एखाद्याची पगडी देखील त्याची जात अचूक सांगत असे. किंवा अस देखील म्हणता येईल की त्या जातीने त्याच जातीचे पगडी डोक्यावर घालावी असा दंडकच होता. थोडक्यात सांगायचं झालं तर आपल्याकडे पगड्यांच्या देखील जाती होत्या.

आपल्याकडे १८ व्या आणि १९ व्या शतकात पागोट्यांची हि जातवार मांडणी दृढ झाली. ख्यातनाम लेखक, संशोधक द.ग. गोडसे यांनी त्यांच्या पुणेरी पोशाख या एक मेजशीर प्रसंग लिहला आहे. ते लिहतात –

एखाद्याने चुकिने किंवा हौस म्हणून दूसऱ्या जातीचे पागोटे कधी वापरले तर त्याला वाळीत टाकण्याची शिक्षा त्याला भोगावी लागे. सोनार जातीच्या एका व्यक्तीने माळी जातीच्या व्यक्तीसारखे पागोटे वापरले. म्हणून माळ्यांप्रमाणे सोनारावरही फिर्योद गुदरल्याचे दाखले मिळतात.

पगड्यांचा इतिहास – 

प्राचीन भारतात पगड्यांची नोंद तपासली तर सौंदर्य आणि संरक्षण या दोन्ही गोष्टींसाठी पगड्यांचा वापर होत असल्याचं दिसून येत. वैदिक काळात उष्णीष म्हणल्या जात असणाऱ्या पागोट्यांना मध्ययुगात पागोटे, पटका, फेटा, आणि पगडी अशी नावे मिळाली. एखाद्या विशिष्ट पद्धतीने कायम बांधून ठेवलेल्या बसक्या पागोट्याला पगडी म्हणत. त्यासाठी नउ इंच रुंद व २० ते २५ लांब तलम सुती कापड किंवा रेशीम रंगीत वस्त्र वापरत. 

लहानसा टोप घेवून त्याच्या भोवती अशा वस्त्रांचे लपेटे दिले की वेगवेगळ्या भागात वेगवेगळे उंचवटे तयार होत. यातूनच वेगवेगळ्या पगड्या तयार होत गेल्या. 

पुर्वी क्षत्रीयांच्या पगड्या उंच तर वैश्य समाजाच्या पगड्या ठेंगण्या असत. प्राचीन काळी स्त्रीयादेखील पगडी घालत असल्याची नोंद आहे. सैन्यांच्या आणि नागरिकांच्या पगड्या वेगवेगळ्या असत. पगडीचा एक सोगा पाठीवर सोडणे हा शुभसंकेत मानला जाई. मुल जन्माला आल्यावर पिवळ्या अथवा मोतिया रंगाची पगडी घालत. विवाहाच्या वेळी पगडीवर तुरा लावित असत. 

सांची, मथुरा अमरावती येथील शिल्पांमध्ये वेगवेगळ्या पगड्या पहायला मिळत. देवांच्या मस्तकावर मुकूट तर  यक्षगंधर्वाच्या मस्तकावर पगडी दिसते. 

इ.स. १० व्या शतकातील  मेवाडमधील कल्याणपुर गावातील पगड्यांचे नमुने हे सर्वात जूने समजले जातात. 

पगड्यांचे महत्व – 

पुर्वीच्या काळात डोक्यावर काही न घेता म्हणजे बोडक्यानं फिरण्याची सोय नव्हती. ज्याच्या डोक्यावर काहीच नसे त्याला सुतक असल्याचा समज पुर्वीच्या काळी होता. विशेष म्हणजे पागोटे वापरण्याबाबत गरिब आणि श्रीमंत असा भेदभाव देखील नव्हता. माणूस कितीही श्रीमंत असो कि गरिब असो त्यांने डोक्यावर पागोटे वापरावेच असा अलिखित नियमच होता. 

आज आपण छत्रपती शिवाजी राजांच्या राज्याभिषेकांच चित्र पाहतो या चित्रात दिसणारा जो इंग्रज वकिल हेन्री ओक्झैडन यांच्या डोक्यावर देखील टोपी आहे. माधवरावांच्या दरबाराचे चे चित्र उपलब्ध आहे त्यामध्ये देखील इंग्रज अधिकाऱ्यांच्या डोक्यावर टोपी आहे. याचाच अर्थ भारतीयच नाही तर परदेशी नागरिकांना देखील डोक्यावर पागोट ठेवणं गरजेचं होतं. 

 

पगडी वापरणारे सुप्रसिद्ध पुणेकर –  

१) श्रीधर विठ्ठल दाते २) केरुनाना छत्रे ३) कृष्णशास्त्री चिपळुणकर ४) विष्णुशास्त्री चिपळुणकर ५) रा.गो.भांडारकर ६) न्या. म.गो. रानडे ७) वा.शि. आपटे ८) बाळ गंगाधर टिळक ९) गो.ग आगरकर १०) गोपाळ कृष्ण गोखले. 

  • साहित्यसम्राट  न.चिं केळकर यांनी श्रीधर विठ्ठल दाते यांचे वर्णन करताना म्हणतात, त्यांच्या डोक्यावरील पागोट्याएवढे मोठ्ठे पागोटे त्यावेळी सर्व पुण्यात दूसऱ्या कुणाचे देखील नव्हते. 
  • गडद निळ्या पोशाखातच सदैव वावरणारे व अंगकांतीनेही सावळे असलेले सेवासदनचे प्रसिद्ध गोपाळ कृष्ण देवधर डोक्यावर असणाऱ्या सैटिनच्या अंगारलाल पगडीमुळे आणि तिच्या झिळमिळीमुळे “चालत्या बोलत्या अगरबत्तीसारखे दिसत” असे वर्णन आहे. 
  • पुण्याचे पगडीवाले –  हा शब्द विशेषत: कोकणस्थांचा उल्लेख करण्यासाठी वापरला जात असे. 
  • पुण्याची पगडी सर्वांस रगडी –  पुण्याचे पगडी घालणारे लोक सर्वांस मात करुन वर्चस्व मिळवतात. 
  • अठरापगड जातींचे पुणे –  वेगवेगळ्या जातींनुसार पागोटे घालणारे पगडबंद आणि त्यांच्या जातींबाबत.

संदर्भ –  गोडसे पुर्वोक्त ३६८ , शहर पुणे खंड दूसरा ३६७

 

Leave A Reply

Your email address will not be published.