पंजाबच्या मुख्यमंत्र्यांनी चक दे इंडियाच्या कबीर खान कडून राष्ट्रवाद शिकला पाहिजे.

जगातल्या सर्वात खेळांपैकी एक खेळ, जो भारताचा राष्ट्रीय खेळ म्हणून ही प्रसिद्ध आहे. अर्थातच हॉकी…

आता आपला देश क्रिकेटवेड्यांचा देश आहे. तसं हॉकीसाठी कोणी एवढ्या मोठ्या प्रमाणात दिवानं  असलेलं दिसत नाही. म्हणजे तशा मॅचेस पाहण्याचं प्रमाण तुलनेनं कमी..आणि महिलांची हॉकी तर नाहीच नाही..पण याच महिलांच्या हॉकीवर २००७ मध्ये आलेला चक दे इंडिया मात्र सगळ्यांनीच पाहिलाय.

या चित्रपटात एक सीन होता, कबीर सिंग जो विमेन्स टीमचा कोच होता, प्रत्येक प्लेयरला आपली ओळख विचारतो..प्रत्येक प्लेयर आपल्या राज्यच नाव सांगतात, त्यावर कबीर सिंग म्हणतो,

इस टीम को सिर्फ वो प्लेयर्स चाहीये, जो पहले इंडिया के लिए खेल रहें हैं,…इंडिया…फिर अपनी टीम में अपने साथीयों के लिए…और उसके बाद भी अगर थोडी बोहोत जान बच जाये तो अपने लिए…स्टेट गव्हर्नमेंट की नौकरी या रेल्वे फ्लॅट के लिए नहीं..

एकदम जबरदस्त डायलॉग होता हा. प्रांतवाद सोडून तो त्याच्या प्लेयर्सना इंडियासाठी खेळायला शिकवतो. आणि त्याच्या या शिकवणीची गरज आता पंजाबच्या मुख्यमंत्र्यांना आहे.

कारण कॅप्टन अमरिंदर सिंह यांनी महिला हॉकी टीमचं अभिनंदन करताना प्रांतवाद मध्ये आणलाय. काय ट्विट केलंय बघा तुम्हीच.

टोकियो ऑलिम्पिक २०२० मध्ये ब्रिटनचा ३-१ असा पराभव करून ४१ वर्षांनंतर भारताच्या पुरुष हॉकी संघाने उपांत्य फेरीत प्रवेश केलाय. भारताच्या पुरुष हॉकी संघाचा संपूर्ण देशवासियांना अभिमान आहे. अशा परिस्थितीत पंजाबचे मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंग या प्रसंगी प्रादेशिक राजकारण करण्यापासून स्वतःला परावृत्त करू शकले नाहीत.

त्यांनी पुरुष संघाच्या विजयावर ट्विट केले आणि मुख्यत्वे ट्वीटमध्ये ते फक्त तीन खेळाडूंबद्दलच बोलले. म्हणजे ते म्हणतायत कि गोल करणारे पंजाबचे आहेत. आपला आनंद व्यक्त करताना ते म्हणाले,

“… ४१  वर्षानंतर टीम इंडियाने टॉप ४ मध्ये प्रवेश केला आहे. सर्व ३ गोल पंजाबचे खेळाडू दिलप्रीत सिंग, गुरजंत सिंग आणि हार्दिक सिंह यांनी केले हे जाणून आनंद झाला. अभिनंदन. गोल्ड घेऊन या. “

आता ते इथंच थांबले नाहीत. त्यानंतर महिला संघाच्या विजयावर देखील त्यांनी असेच एक ट्विट केले.

“आमच्या महिलांचा अभिमान आहे की त्यांनी तीन वेळा विजेत्याला हरवून उपांत्य फेरी गाठली. संपूर्ण सामन्यात एकमेव गोल करणाऱ्या अमृतसरच्या गुरजीत कौरचे अभिनंदन. आपण इतिहासाच्या उंबरठ्यावर आहोत. मुलींनो शुभेच्छा. गोल्ड घेऊन या. “

ऐसा कैसे चलेगा पाजी?

आता हे सर्वज्ञात आहे की हॉकी हा एक सांघिक खेळ आहे. ज्यामध्ये १० फील्ड प्लेयर आणि १ गोलकीपर असतो. संघात प्रत्येक राज्यातील वेगवेगळे खेळाडू असतात, पण जेव्हा ते आंतरराष्ट्रीय स्तरावर खेळायला जातात, तेव्हा संघाला ‘भारतीय’ म्हटले जाते. पण..नाही..पंजाबच्या मुख्यमंत्र्यांना प्रांतवाद मध्ये आणायचा होता. त्यांनी अभिनंदन पर केलेले ट्विट सुचवते की त्यांना या क्षणीही त्यांच्या प्रांतवादाच्या राजकारणात घुसखोरी करायची आहे. पंजाबला भारतापेक्षा वेगळे दाखवायचे आहे.

आणि कॅप्टन ट्रोल झाले.

तथापि, सोशल मीडिया वापरकर्ते इतके सक्षम आहेत की जेव्हा भारताच्या अखंडतेचा प्रश्न येतो, तेव्हा ते कोणत्याही तर्कशुद्ध प्रयत्नांना उत्तर देतात. यावेळी देखील, वापरकर्त्यांनी कॅप्टन अमरिंदर यांना  सांगितले की ज्यांना ते पंजाबी खेळाडू म्हणत आहे ते प्रत्यक्षात टोकियोमध्ये भारतीय म्हणून ओळखले जात आहेत.

एका शीख ट्विटर युजरने लिहिले आहे की,

“एक शिख म्हणून मला असे म्हणायचे आहे की ते खेळाडू पहिल्यांदा भारतीय आहेत. जर बाकीच्या खेळाडूंनी चेंडूच हलवला नाही तर ते कसे गोल करतील?”

त्यामुळे कॅप्टन अमरिंदर सिंह यांनी यातून धडा घेऊन परत ट्विट करताना खबरदारी बाळगावी इतकंच.

हे ही वाच भिडू 

 

Leave A Reply

Your email address will not be published.