वाराणसीतल्या या जत्रेमुळं अख्या पंजाबची निवडणूक पुढे ढकलण्यात आली आहे

पंजाबमधील विधानसभेच्या निवडणुका आता १४ फेब्रुवारीच्या मूळ तारखेऐवजी २० फेब्रुवारी रोजी होणार असल्याची घोषणा निवडणूक आयोगाने केलीआहे. १६ फेब्रुवारी रोजी येणार्‍या गुरु रविदास जयंतीच्या पार्श्वभूमीवर निवडणुका पुढे ढकलण्यात आल्या आहेत.

आता निवडणूका १४ ला होणार होत्या आणि जयंती १६ ला असताना तारीख पुढं का ढकलल्या तर याच्या मागं हे कारण भिडूला मिळालं.

तर संत रविदास यांची जयंती १६ फेब्रुवारीला येते. मात्र उत्सवाच्या एक आठवडा अगोदर मोठ्या संख्येने भाविक वाराणसीला जाण्यास सुरुवात करतात आणि १४ फेब्रुवारीला मतदान झाल्यामुळे त्यांना मतदानापासून वंचित राहावे लागले असते.

संत रविदासांची जयंती सीर गोवर्धन वाराणसी येथे साजरी होणार आहे. 

संत रविदासांचे काशीचे जन्मस्थान दुसरे सुवर्ण मंदिर म्हणून ओळखले जाते. 

येथे २०० किलोपेक्षा जास्त सोने आहे. या मंदिराच्या शिखराच्या कलशापासून आणि मंदिरात उपस्थित संत रविदासांच्या पालखीपासून छत्रीपर्यंत सर्व काही सोन्याचे आहे. संत रविदास मंदिरात १३० किलो सोन्याची पालखी ठेवण्यात आली आहे. हही  २००८ मध्ये जालंधर, पंजाब येथे युरोपातील भक्ताने बांधली  होती. फेब्रुवारी 2008 मध्ये बसपा सुप्रीमो मायावती यांनी याचे अनावरण केले होते.यामध्ये रविदास धर्म मानणारे देशातूनच नव्हे तर परदेशातूनही लाखोंच्या संख्येने येतात. या गर्दीत अशा अनेक अनिवासी भारतीयांचा समावेश आहे जे आपल्या लाडक्या संत रविदासांना सोने अर्पण करतात.

आता हे झाले धार्मिक कारण मात्र यामागे राजकीय कारण पण आहे. 

सर्व प्रमुख राजकीय पक्षांनी राज्याच्या निवडणुका पुढे ढकलण्याची मागणी केली होती हे दलित आणि गुरु रविदासांचे अनुयायी असलेल्या रविदासिया समाजाच्या राजकीय महत्त्वाची साक्ष आहे.

 मुख्यमंत्री चरणजित सिंग चन्नी, स्वतः दलित आणि रामदासिया समाजाचे आहेत, यांनी आयोगाला पत्र लिहून निवडणुका पुढे ढकलण्याची मागणी केली होती. त्यांनी लिहिले की त्यांना अनुसूचित समाजाच्या सदस्यांकडून निवेदने मिळाली आहेत ज्यात त्यांनी गुरु रविदासांच्या जयंती उत्सवात सहभागी होऊ शकतील अशा प्रकारे निवडणुकीची तारीख बदलली जावी असे आवाहन केले होते.

पंजाबमध्ये दलित मतांचा ३२ टक्के एवढा मोठा वाटा आहे, जो देशातील सर्वाधिक आहे. 

पंजाब विधानसभेच्या एकूण ११७ जागांपैकी ३० जागा अनुसूचित जातींसाठी राखीव आहेत. याचाच फायदा घेऊन पंजाबमधूनच येणाऱ्या काशीराम यांनी दलित मुख्यमंत्री बनवण्याचा प्रयत्न केला होता मात्र त्यांचा हा प्रयोग यशस्वी झाला शेजारच्या उत्तरप्रदेश राज्यात. तरी ९०च्या दशकात बहुजन समाज पार्टीचा पंजाबमध्ये चांगल्या जागा निवडून आणण्यास यशस्वी झालं होतं . पुढे बसपाची ताकद कमी झाली मात्र दलित समाजाचं राजकीय महत्व राहिलच.

येणाऱ्या निवडणुकांत सगळे पक्ष दलित मतांसाठी पुरेपूर प्रयत्न करतायत. 

काँग्रेसनं चन्नी यांच्या रूपाने पहिला मुख्यमंत्री दिला आहे तर अकाली दलाने बहुजन समाज पार्टीशी युती केली आहे. आम आदमी पार्टीनं पण दलित समाजाला आपल्याकडे खेचण्यासाठी अनेक घोषणा केल्या आहेत. 

बाकी पंजाबच्या दोआबच्या प्रदेशामध्ये आर्थिक दृष्ट्या ही रविदासीय समाजाचा दबदबा आहे. चामडयाच्या उद्योगाने या समाजाची भरभराट झाली आहे. 

आणि ह्याच सगळ्या फॅक्टरमुळे या समाजाच्या मतांचं महत्व खूप आहे आणि त्यामुळेच निवडणूक आयोगानंपण इलेक्शन पुढं ढकलंल आहे. 

हे ही वाच भिडू :

 

 

 

 

 

Leave A Reply

Your email address will not be published.