पंजाबनं सोनू सूदला आपल्या ‘स्टेट आयकॉन’ पदावरून काढून टाकलयं

कोरोनाचा जवळपास २ वर्षांचा काळ मोठा अडचणींचा होता. मृत्यूच्या रोज धडकी भरवणाऱ्या आकड्यानं सगळ्यांचचं टेन्शन वाढलेलं. परिस्थिती अशी होती कि, आपल्याचं लोकांना आपल्यापासून लांब राहायला लागलं होत. वाढत्या आकड्यामुळं आरोग्य यंत्रणेचा सुद्धा खोळंबा झालेला. सगळ्याच गोष्टींचा तुटवडा पडलेला त्यात लॉकडाऊनमुळे बरीच जण तर आपल्या घरापासून लांब अडकून बसलेली.

पण या सगळ्या परिस्थितीत अभिनेता सोनू सूद अगदी देवमाणसा सारखे धावून आलेले. म्हणजे पार छोटं- छोट्या गोष्टींपासून त्यांनी मदतीचा हार पुढे केला. मग कोणाला हॉस्पिटलमध्ये बेडची, ऑक्सिजनची रेमेडिसिवीरची सोय करण्यापासून, कोरोना लॉकडाऊनमुळे बेरोजगार झालेल्या आणि आपल्या घरापासून दूर वेगवेगळ्या ठिकाणी अडकलेल्या स्थलांतरित कामगारांना त्यांच्या घरी नेण्यासाठी त्यांनी वाहतुकीची व्यवस्था केली होती.

एवढंच नाही तर सोनू सूदने प्रत्येकापर्यंत मदत पोहोचावी म्हणून २४ तासांची सेवा सुद्धा सुरु केली होती. त्यांच्या याच कामामुळे अभिनय क्षेत्रात व्हिलन म्हणून काम कारण सोनू रिअल लाईफमध्ये सगळ्यांचा हिरो बनला होता.

लोकांनी त्याला डोक्यावर उचलून घेतलं होत. प्रत्येकासाठी तो आयडियल बनला होता. सोशल मीडियावर, माध्यमांमध्ये त्याच्याचं नावाची चर्चा होती.

त्यांच्याच परिणाम म्हणून राजधानी दिल्लीच्या अरविंद सरकारने त्यांना आपला ब्रँड अँबॅसिटर बनवलेलं. एवढच नाही तर मूळचा पंजाबचा असलेल्या सोनू सूदला पंजाब सरकारने आपलं स्टेट आयकॉन सुद्धा बनवलेलं.

पण आता भारतीय निवडणूक आयोगाने अभिनेता सोनू सूदची पंजाबचे ‘स्टेट आयकॉन’ म्हणून केलेली नियुक्ती रद्द केली आहे. राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी एस करुणा राजू यांनी शुक्रवारी ही माहिती दिली.

राजू यांनी अधिकृत निवेदनात म्हटले आहे की, भारताच्या निवडणूक आयोगाने पंजाबचे ‘स्टेट आयकॉन’ म्हणून सूद यांची नियुक्ती रद्द केली आहे. सुमारे वर्षभरापूर्वीच निवडणूक आयोगाने (ECI) सोनू सूद यांची पंजाबचा ‘आयकॉन’ म्हणून नियुक्ती केली होती.

एवढंच नाही तर सोनू सुदने ट्विटमध्ये म्हटले की,

‘प्रत्येक चांगल्या गोष्टीप्रमाणे हा प्रवासही संपवायला हवा होता. मी ‘स्टेट आयकॉन ऑफ पंजाब’ या पदावरून स्वेच्छेने पायउतार झालो आहे. हा निर्णय निवडणूक अयोग्य आणि मी मिळून घेतला आहे. कारण माझ्या कुंटुंबातील एक सदस्य पंजाब विधानसभेच्या निवडणुकीत उभे राहणार आहे.’

खरं तर, सोनू सूदला पंजाब आणि दिल्ली सरकारने दिलेल्या महत्त्वामूळं ते राजकारणात येतील अशा चर्चा सुरू झाल्या होत्या. पण सोनू सूदने गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये सांगितले होते की, तो नाही तर त्याची बहीण मालविका राजकारणात प्रवेश करत आहे, परंतु तिचा असा कोणता फिक्स विचार नव्हता.

पण आता मालविका यांचं निवडून लढवायचं फिक्स झालं आहे. अजून तरी कोणत्या पक्षातून निवडणूक लढवणार हे फिक्स झालेले नाही पण तरी सोनू सूद आपली बहीण मालविकाच्या प्रचारासाठी मैदानात उतरलाय. सूद हा मूळचा पंजाबमधील मोगा जिल्ह्यातील आहे. मालविका मोघा मतदारसंघातूनच निवडणूक लढवणार आहे. त्या लोकांमध्ये बसून आपल्या बहिणीसाठी वोट मागत आहेत.

त्यामुळे असं म्हंटलं जात की, निवडणुकीत उभे असलेले उमेदवार किंवा त्याच्या कुटुंबातील कोणताही सदस्य स्टेट आयकॉनच्या कॅटेगरीत बसत नाही आणि म्हणूनचं अभिनेता सोनू सूदला पंजाब स्टेट आयकॉन या पदावरून पायउतार व्हावं लागलं

हे ही वाचा भिडू :

 

Leave A Reply

Your email address will not be published.