जेवढी हिट गाणी तेवढेच डेंजर मॅटर करणाऱ्या पंजाबी गायकानं काँग्रेसमध्ये एन्ट्री मारलीये…

गुन्हे फक्त खऱ्या मर्दांवरच नोंदवले जातात असं म्हणणाऱ्या सिद्धू मूसेवाला या पंजाबी सिंगरनं काल काँग्रेसमध्ये प्रवेश केला. पंजाबचे मुख्यमंत्री चरणजित सिंग चन्नी आणि पंजाब काँग्रेसचे अध्यक्ष नवज्योतसिंग सिद्धू यांच्या उपस्थित काल हा रॅपर काँग्रेसमध्ये आला.

जाट दा मुकाबला , इस्सा जाट अश्या गाण्यांमधून जाट अस्मितेचा उदो उदो करणारा मूसेवाला पंजाबी युवकांमध्ये चांगलाच फेमस आहे. 

त्याच्या याच लोकप्रियेतेचा फायदा येणाऱ्या निवूडणुकीत होईल असा काँग्रेसचं सरळसोपं गणित आहे.

सिद्धू मूसेवालाचं खरं नाव आहे, शुभदिप सिंग सिद्धू. मग म्युझिक इंडस्ट्रीमध्ये आल्यावर जरा कुल वाटावं म्हणून त्यानं ‘सिद्धू मुसेवाला’ हे नाव घेतलं. इंजिनिरिंग झाल्यांनतर  झाल्यावर जसे सगळे पंजाबी करतात तसं हा भिडू पण गेला कॅनडाला. त्याचं  लिहलेलं लायसन्स हे पहिलं  गाणं ठीक ठाक चाललं. मग भाऊ फुलटाईम सिंगर होण्याकडे वळले.

गँगस्टर रॅप हा हिपहॉपचा प्रकार मुसेवालाची खासियत. याच कारणामुळे पंजाबमधील तरुणाई त्याला डोक्यावर घेते. त्याच्या गाण्यांचे बोल बऱ्याचदा फक्त बंदुक, मारामारी आणि ड्रग्स या भोवतीच असतात.

त्यामुळेच मुसेवालावर आपल्या गाण्यातून ड्रग्स आणि हिंसा यांना उत्तेजन दिल्याबाबद्दल एफआयर दाखल आहे.

पंजाबचे तत्कालीन मुख्यमंत्री अमरिंदर सिंग यांनी अश्या गाण्यांमधून ड्रग्सचं समर्थन केला जातं त्यावर नाराजीही व्यक्त केली होती. पण सिद्धू मुसेवालानं फक्त याच कारणामुळं कोर्टाच्या पायऱ्या चढल्यात, असं अजिबात नाहीये. 

कारण या सिद्धू भाऊला बंदुकीचाही भलताच नाद. २०२० मध्ये एक व्हिडीओ व्हायरल झाला, त्यात हा गडी पोलिस बाजूला असताना एके ४७ चालवत होता. तेव्हा त्याच्यावर आर्म्स ऍक्टची पहिली केस झाली होती. त्या केसमधून जामिनावर बाहेर आल्यानंतर, त्यानं संजू हे गाणं काढलं.

 यात त्यानं स्वतःची तुलना एके ४७ चं कांड करणाऱ्या संजय दत्तशी केली होती.

पुन्हा २०२० मध्ये टिकटॉक व्हिडीओमध्ये बंदूक चालवताना त्याचा एक विडिओ व्हायरल झाला होता. या केसमध्ये मुसेवालाला जेलची हवा खायला लागली होती. 

२०१९ मध्ये एका गाण्यात १८व्या शतकातील शीख योद्धा माय भागो यांचा अपमान केल्यामुळेही सिद्धू चांगलाच वादात सापडला होता. त्यावेळी त्याला शिरोमणी अकाली दल आणि इतर शीख संघटनांच्या रोशाला सामोरे जावे लागले होते.

पंजाबचा विकास आणि पंजाबचा आवाज दिल्लीत पोहचवण्यासाठी आपण काँग्रेसमध्ये येत असल्याचं सिद्धूनी म्हटलं आहे.

शेतकरी आंदोलनातही होता सहभाग

दिल्ली सीमेवर चालू असणाऱ्या शेतकऱ्यांच्या आंदोलनाला याने उघड पाठिंबा दिला. टीक्रि इथे जाऊन त्याने शेतकरी आंदोलनात प्रत्यक्ष सहभागही घेतला होता. सरकारने तीनही कृषी कायदे मागे घेतलेच पाहीजे अशी भूमिकाही त्यानं मांडली होती .

पंजाबचा हा बॅड बॉय राहुल गांधींच्या काँग्रेसमध्ये गुड बॉय होतो का हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे. पंजाब काँग्रेसमध्ये आधीच एक सिद्धू धिंगाणा घालतोय, त्यात आता या दुसऱ्या सिद्धूचा काय प्रभाव पडतोय हे येणाऱ्या निवडणुकांनंतरच कळेल.

हे ही वाच भिडू:

 

English Summary: Punjabi rapper siddhu moosewala joins congress

Web Title: Punjabi rapper Siddhu Moosewala joins congress

Leave A Reply

Your email address will not be published.