फक्त एका रात्रीसाठी जगभरातल्या मुली भारतातल्या या खेड्यात येत असतात..!


भारताचं आकर्षण कशासाठी. नक्कीच एका रात्रीसाठी नाही. भारताची संस्कृतीत विविधता आहे पण ती इतकी नाही की जगभरातल्या मुली भारतातल्या एखाद्या खेड्यात फक्त झोपण्यासाठी येत असाव्यात. पण कसय ना. विविधतेने नटलेल्या भारतात. तितक्याच विविध थिअरी आहे. आम्ही मुळचे इथले म्हणून या गावातून त्या गावातला संदर्भ देणारी माणसं आपण. 

तर असाच आपल्या मुळाचा संदर्भ देणारी, आणि आमचाच खरा संदर्भ मानणारी दोन-चार गाव भारतात आहेत. त्यांची थेअरी अशी की आम्ही प्युअर आर्य आहोत. 

आत्ता आर्य म्हणलं कि निम्मा विषय खल्लास होता. आर्य मुळचे कुठले यावर खूप जणांनी पुष्कळ लिहून ठेवलय. अभिजन बहूजन पासून जगाच्या कुठल्या ना कुठल्या कोपऱ्या हा नेहमीचा राडा सुरू असतो. बर यातून भलेभले लोक सुटले नाहीत. आदरणीय हिटलर महाशयांनी तर मीच कसा आर्य म्हणून तलवार, भाला, बंदूका आणि गॅस चेंबर घेवून जगाची वाट लावली होती. (आदरणीय उपहासात्मक आहे यांची नोंद हलक्या डोळ्याच्या वाचकांनी घ्यावी) तर आत्ता गोष्ट वर्तमानकाळाची. 

जम्मू काश्मीरच्या एरियात लडाख येत. लडाखचं मुख्य ठिकाण लेह. तिथून १६० किलोमीटरवर आहे दारचिक गाव. दारचिक हे मुख्य गाव व त्याच्या आजूबाजूला असणारी धा, हानू, गहानू अशी खेडी. चार गावांची मिळून लोकसंख्या चार हजारांच्या आसपास होत असेल. तर इथे राहणारे लोक्स ब्रोगपा नाहितर ड्रोगपा (फुटबॉलमधला नाही) या नावाने ओळखली जातात. 

तर या लोकांच्या दाव्यानुसार आम्ही आहोत आर्य..! 

एकमेव आर्य. जगाच्या पाठीवर शिल्लक असणारी फक्त चार पाच हजारचं आर्य. अधिच उंचावर असणारी हि लोकं अजून उंचीच थियरी मांडतात. बर ते आपल्या व्हॅलीला आर्यव्हॅली म्हणतात. इथपर्यन्त तर आपण ठिकाय ना. असतय एकेकाचं म्हणून सोडून देवू शकतो. पण तस नाही. याच आर्य लोकांबरोबर नाईट घालवून आपण आर्य वंशाच एक मूल इथून घेवून जावू असा किडा जगभरातील स्वत:ला प्युअर समजणाऱ्या लोकांमध्ये असतो. त्यातही हे प्रमाण जर्मनीमध्ये अधिक. तर अशा कित्येक मुली या गावात येत राहतात. फक्त एक रात्र इथल्या मुलांसोबत घालवणं इतकाच प्रामाणिक उद्देश त्यांचा असतो. मग त्या गरोदर होतात आणि पुन्हा आपआपल्या देशात जातात. तर अशी हि गोष्ट.

आत्ता पुढे अस की,

अभ्यासकांच्या मते भारतावर आक्रमण करायला आलेल्या अलेक्झांडर सोबत हि लोकं भारतात आली. त्यांची चेहरेपट्टी पाहिली तरी ते आसपासच्या गावांतील लोकांप्रमाणे नाहीत. सांस्कृतिक आणि धार्मिकदृष्ट्या वेगळा असणारा ब्रोगपा मात्र स्वत:ला प्युअर आर्य समजतो हे फिक्स. 

आत्ता याची भूरळ  संजीव सिवन या माणसाला देखील पडलेली. त्यानं द अचतुंग बेबी – इन सर्च ऑफ प्युरिटी नावाची एक डॉक्युमेंटरी काढली. त्यात एका रात्रीसाठी या गावात आलेल्या मुलींसोबतचा प्रवास दाखवलेला आहे. जर्मनची ती मुलगी इथल्या सेवांग नावाच्या मुलासोबत रात्र घालवते. त्याबदल्यात सेवांगला डॉलर मिळतात. घरातल्यांना मोठ्ठमोठ्ठे गिफ्ट मिळतात. मग ती मुलगी प्युअर आर्य वंश पोटी येणार या खुषीत पुन्हा जर्मनीला जाते. असा एकंदरीत प्रकार. 

यावर मानवंशशास्त्राचा अभ्यास करणारे विचारवंत म्हणतात की, जनुकियदृष्या हे आर्य आहेत हे सिद्ध होत नाही. कारण आर्य लोकांचेच सॅम्पल नाहीत. (हाय का आत्ता). तर अशी हि गोष्ट आहे प्युअर आर्य लोकांची. 

हे ही वाचा. 

Leave A Reply

Your email address will not be published.