आज युक्रेनचे बॉस बनू पाहणारे पुतिन हे एकेकाळी तिथल्या गॅस क्वीनला घाबरायचे

सध्या अख्ख्या जगात एकाचं गोष्टीची चर्चा सुरूये, ती म्हणजे रशिया – युक्रेन युद्ध. रशियानं  युक्रेनवर हल्ले सुरू केलेत, ज्यामुळे तिसऱ्या महायुद्धाला सुरुवात होणार का? असा प्रश्न सध्या पडलायं. युक्रेनची राजधानी कीवसोबतच देशातील  बऱ्याच शहरांमध्ये बाॅम्ब हल्ले झालेत.

युक्रेनच्या जनतेमध्ये भीतीचं वातावरण पसरलयं, लोक देश सोडून जायला लागले आहेत. त्यासाठी वेगवेगळे उपाय शोधत आहे. अशा परिस्थितीत लाखो नागरिकांना  बेस कँपमध्ये हलवण्यात आलयं. देशाचे राष्ट्रपती स्वःता रस्त्यावर उतरून परिस्थितिवर लक्ष ठेऊन आहेत. आंतरराष्ट्रीय स्तरावरून मदत मिळेल का याची वाट पाहत आहेत. युक्रेनच्या अशा या परिस्थतीत तिथले लोक त्यांच्या गॅस क्वीनला मिस करतायेत.

कोण होती हि गॅस क्वीन? तिला युक्रेनमधील नागरिक का मिस करत आहेत?  

युक्रेनची गॅस क्वीन म्हणजे युलिया टिमोशेंकोवा, जी युक्रेनची पहिली महिला पंतप्रधान होती. पण ती अशी पंतप्रधान होती जी कधीही रशियापुढं झुकली नाहीत. रशिया आणि पुतिनला तिने कायम विरोध केला आणि वेळ आली की, सडेतोड उत्तर सुद्धा दिलयं.

युक्रेनची ती आवडती पंतप्रधान होती. तिच्या या फेममुळेच तिथल्या नागरिकांनी तिला दोनदा पंतप्रधान पदावर बसवलं. यूलियाची खासियत म्हणजे ती कधीच रशियापुढे झुकली नाही, ति पाश्चिमात्य देशांशी चांगल्या संबंध प्रस्थापित करण्याच्या बाजूने होती, तिला युक्रेनला नाटोमध्ये सुद्धा समाविष्ट करायचं होतं.

आता जो रशिया युक्रेनला आक्रमकता दाखवतोय तो युलियाला कधीही घाबरवू शकला नाही.  युलिया नेमही म्हणायची मी रशियाला एक इंचही जमीनसुद्दा देणार नाही. त्यामुळे युक्रेनच्या जनतेला वाटतयं की युलियाच्या  हातात देशाचे नेतृत्व असते तर आजची परिस्थिती वेगळी असती.

युलिया तशी काही साधी सुधी महिला नव्हती. युक्रेनमध्ये तिला गॅस क्वीन म्हणून ओळखायचे कारण तिचा गॅसचा मोठा व्यापार होता. युक्रेनच्या सगळ्याच यशस्वी उद्योजक महिलांमध्ये युलियाची गिनती व्हायची. आपल्या याचं फेममुळे तिने पुढे राजकारणात जाण्याचा निर्णय घेतला, नशिबाने तिला साथ दिली आणि लवकरचं युक्रेनची पहिली महिला पंतप्रधान बनली.

यूलिया आधी २००५ मध्ये काही महिन्यांसाठी पंतप्रधान बनली आणि त्यानंतर पुन्हा २००७ ते २०१० पर्यंत पंतप्रधान पदावर होती. महत्वाचं म्हणजे युलिया फक्त युक्रेनचं नाही तर सगळ्या सोव्हिएत संघाच्या देशांमधील पहिली महिला पंतप्रधान बनली होती.

२००४ च्या निवडणूकीत रशियाला सर्मथन करणारे विक्टर यूश्नकोव यांची राष्ट्रपति म्हणून निवड झाली. त्यावेळेस युलियासोबत अनेक विरोदही पक्षाच्या नेत्यांनी विक्टरवर निवडणूकीत गडबड केल्याचा आरोप केला. ज्यामुळे देशांत ‘ऑरेंज रिवोल्यूशन’ ची सुरुवात झाली. युलियाच्या पक्षाचा झेंडा ऑरेंज रंगांचा होता, जो रशियाला सर्मथन करणाऱ्या विक्टरच्या विरोधात सगळ्यात पुढे  होता. ज्यामुळे या आंदोलनाला ऑरेंज रिवोल्यूशन’ असं नाव देण्यात आल.

युलिया या आंदोलनात मोठ्या नेत्या म्हणून समोर आल्या. या आंदोलनाची तिव्रता इतकी होती की  शेवटी विक्टरला पदासोबत देशसुद्धा सोडवा लागला.

दरम्यान. २०१० ला आपला पंतप्रधान पदाचा दुसरा कार्यकाळ संपल्यानंतर युलिया परत निवडणूकीला उभी राहिली, पण यावेळेस  ३.३ टक्के मताने मागे पडली आणि विक्टर युश्नकोव यांच्या हातात सत्ता गेली.

पण सत्ता विक्टरच्या हातात जाताचं युलियाचं उलटी गिनती  सुरू झालं. पंतप्रधान असताना एका गॅस डिल प्रकरणात फ्राॅड केल्याचा आरोप यूलियावर ठेवण्यात आला आणि अटक करण्यात आली. तिला जेव्हा अटक करण्यात आलेली तेव्हा युक्रेनची जनता रस्त्यावर उतरून तिच्या अटकेचा विरोध करत होती. 

२०११ ते २०१४ दरम्यान त्या जेलमध्ये राहिल्या. सगळ्या जगात त्यांच्या अटकेमुळे एकचं खळबळ उडालेली, युरोपीयन युनियन आणि अमेरिकेसोबत जगभरातल्या कित्येक देशांनी युलियाचं समर्थन केलं होत. 

युलिया यांच्या धाडसी भुमिकेमुळे फोर्ब्स मॅगझीनने त्यांना २००५ साली जगातल्या सगळ्यात धाडसी महिलांच्या यादीत तिसर्या नंबरवर ठेवलेलं. त्यांच्या या धाडसाची युक्रेनला कमतरता भासन सहाजिक आहे.

हे ही  वाच भिडू :

Leave A Reply

Your email address will not be published.