पुतीनच्या सेनेनं युक्रेनचं होत नव्हतं ते ‘ड्रीम’ सुद्धा मोडून टाकलं

रशिया- युक्रेनमध्ये सुरु असलेलं युद्ध सध्या जगभरात चिंतेचा विषय बनलाय. गेल्या ४ ते ५ दिवसांपासून सुरु असलेल्या या हल्ल्यात आतापर्यंत ३५२ लोकांचा जीव गेलाय तर १६८४ जण जखमी आहेत. बेवारस पडलेले मृतदेह, रक्ताळलेले चेहरे, हतबल झालेले नागरिक, घरदार सोडून बोजा बिस्तारा बांधून जीव वाचवण्यासाठी लपून बसलेली लोक हे सगळे व्हायरल होणारे फोटो पार अंगावर शहारे आणणारे आहेत. जसं काय रशियानं संपूर्ण युक्रेन उध्वस्त करायचंच हे मनाशी पक्के केलंय.  

युक्रेनच्या राजधानीत तर आग आणि धुरांच्या लोटांशिवाय दुसरं कुठलं चित्रचं दिसेना झालंय. रशियाची लढाऊ विमान युक्रेनच्या शहरावर घिरट्या घालतायेत. जवळपास साडेचार कोटी लोकसंख्या असेलेल्या या छोट्या  देशानं जे काही साम्राज्य उभं केलं होत, ते रशिया एक-एक करून भुईसपाट करायच्या मागे लागलाय.

सगळं काही संपत चाललंय या विचारानं खचलेल्या युक्रेनला त्यात आता आणखी एक मोठा झटका बसलाय. ते म्हणजे त्यांचं ‘ड्रीम’ रशियाच्या सैन्यानं नष्ट करून टाकलाय.

युक्रेनच ड्रीम म्हणजे मिरिया विमान, जे रशियाच्या सैन्यानं उध्वस्त करून टाकलंय. मारिया विमान जगातलं सगळ्यात मोठं विमान होत. रशियाच्या सैनिकांनी गोळीबाराचा मारा करून ते जाळून टाकण्यात आल्याचं बोललं जातंय.  या बातमीनं युक्रेनचे राष्ट्रपती वोलोदीमीर जिलेंस्की यांनी नाराजी व्यक्त केलीये. 

युक्रेनच्या भाषेत ‘मिरिया’ला खास स्वप्न असं म्हंटल जात.

युक्रेनचे परराष्ट्र मंत्री दिमित्री कुलेबा यांनी सांगितले की, जगातील सर्वात मोठे विमान रशियन सैन्याने आज कीव जवळील हॉस्टोमेल  एअरफील्डवर नष्ट केले. एएन-२२५ ‘मिरिया’ युक्रेनियन अ‍ॅरोनॉटिक्स कंपनी अँटोनोव्हने बांधले होते. हे जगातील सर्वात मोठे मालवाहू विमान म्हणून ओळखलं जायचं. रशियाने आमची मरीया जरी नष्ट केलं असलं, तरी ते आमचे मजबूत युरोपीय राज्याचं स्वप्न कधीही नष्ट करू शकणार नाहीत. आम्ही नक्की विजयी होऊ’!

विमानाच्या नुकसानामुळे दुखावलेल्या युक्रेनच्या सरकारने ट्विट केलं कि. 

जगातील सर्वात मोठे विमान ‘मिरिया’ म्हणजे (द ड्रीम) रशियन सैन्याने किवीजवळ नष्ट केले. पण आम्ही ते विमान पुन्हा बांधू. आम्ही आमचे मजबूत, स्वतंत्र आणि लोकशाही युक्रेनचे स्वप्न पुन्हा पूर्ण करू.’

युक्रेनसाठी खास असणाऱ्या या विमानाबद्दल सांगायचं झालं तर, ८४ मीटर म्हणजे २७६ फूट लांबीच हे भलं मोठं विमान ताशी ८५० किमी वेगानं २५० टन माल वाहून नेण्यास सक्षम होत.  अँटोनोव्ह कंपनीने कमपणीने बनवलेल्या या विमानाने १९८८ साली पहिल्यांदा उड्डाण केलं होत. 

मरीयाची खासियत म्हणजे हे विमान १८ तास न थांबता उडाण करू शकत होतं. हे जगातील एकमेव विमान होते ज्याचा विंग एरिया  बोईंग ७४७ विमानाच्या विंग एरियापेक्षा दुप्पट होता. या कार्गो विमानाचे वजन ६०० टन होते जे एकाचवेळी ६४० पर्यंत वजन वाहून नेण्यास सक्षम होते. विमानात ११७ टन वजनाचा इलेक्ट्रिक जनरेटर बसवण्यात आला होता. ६ टर्बोफॅन इंजिनच्या मदतीने हे चालवलं जात होत.

सोव्हिएत युनियन संपल्यानंतर बरीचवर्षे हे विमान असचं उभं होत. पण कोरोनाच्या काळात हे विमान जगाची सर्वात मोठी आशा म्हणून समोर आलेलं. २०२० मध्ये युरोपमध्ये इतर आवश्यक उपकरणांसह कोरोनाची औषधे पोहोचवण्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. 

२०१६ साली पहिल्यांदा हे कार्गो विमान भारतात आलं होत. तुर्कमेनिस्तानवरून उड्डाण घेऊन हैदराबादच्या राजीव गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावर या विमानाने लँडिंग केलं होत. पण आता पार डॅमेज झालेल्या या मिरियाच्या दुरुस्तीसाठी ३ अब्ज डॉलर्सपेक्षा जास्त खर्च येईल असा अंदाज बांधला जातोय. तसचं पुन्हा उड्डाण करण्यासाठी या विमानाला पाच वर्ष तरी लागतील.

हे ही वाच भिडू :

 

 

 

Leave A Reply

Your email address will not be published.