इंग्लंडमध्ये सध्या एकच चर्चा रंगलीय.. ऑपरेशन लंडन ब्रिज काय आहे ?

जन्म आणि मृत्यू अशा गोष्टी आहेत ज्या कोणीही टाळू शकत नाही. एखाद्याला जन्म द्यायचा कि नाही ते ठरवता येत मात्र जन्माला आलेल्या व्यक्तीचा मृत्यु अटळ असतो. किंबहुना मृत्यू त्रिकालाबाधित सत्य आहे. आता ही गोष्ट ही तितकीच खरी आहे कि मृत्यू काही सांगून येत नाही, तो अचानक येतो.

पण आता लोक मृत्यूनंतरच्या दफनविधीची आधीच तयारी करून ठेवतायत. आणि जगात असं बऱ्याच हा ठिकाणी घडतंय. पण इंग्लंडच्या राणीसाठी पण जर यंत्रणा कामाला लागत असेल तर मग विशेष आहे.

होय इंग्लंडची राणी दुसरी एलिजाबेथ आता ९५ वर्षांची झाली आहे. आणि तिच्या मृत्युनंतर उद्भवणारी परिस्थिति हाताळता यावी म्हणून इंग्लंडच्या सरकारने एक प्लॅन आखलाय.  

खरं तर राणीच्या निधनानंतर युके सरकार काय करणार आहे याचे डॉक्युमेंट्सच लीक झालेत. “ऑपरेशन लंडन ब्रिज” असं या ऑपरेशनच कोडनेम आहे. या ऑपरेशनचा काही भाग प्रथम २०१७मध्ये गार्डियन या वृत्तपत्राच्या हाती लागला होता. परंतु आता ‘पॉलिटिको’ या मीडिया हाऊसला संपूर्ण डॉक्युमेंट्सचं मिळाले आहेत.

“ऑपरेशन लंडन ब्रिज” मध्ये राणीच्या अंत्यसंस्काराची व्यवस्था कशी असेल याची माहिती आहे.

इंग्लंडच्या ९५ वर्षीय राणी एलिझाबेथ द्वितीयच्या मृत्यूनंतर कायदा आणि सुव्यवस्थेची परिस्थिती निर्माण होऊ शकते असं यूके सरकारला वाटत आणि त्याविषयी ते गंभीर आहेत. म्हणजे थोडक्यात काय तर इंग्लंडच्या लोकांचं त्यांच्या राणीवर प्रेम आहे.

त्यानुसार, सरकार राणीच्या मृत्यूनंतर सुरक्षा ऑपरेशन म्हणून राजघराण्याचे आणि सरकारचे अधिकृत सोशल मीडिया अकाउंट्स ब्लॅकआउट करेल आणि रिट्वीटवर बंदी घालेल.

 

सोशल मीडियावर कडक नियंत्रण ठेवण्यात येईल. 

“ऑपरेशन लंडन ब्रिज” मध्ये सोशल मीडिया स्ट्रॅटेजी हा एक महत्त्वाचा घटक आहे. डॉक्युमेंटनुसार, राजघराण्याच्या वेबसाईट ब्लॅकआउट होतील. आणि राणीच्या मृत्यूची पुष्टी करणारे एखादे लहानसे निवेदन प्रसिद्ध केले जाईल.

दुसरीकडे सरकारी वेबसाइट, gov.uk आणि इतर सर्व सरकारी सोशल मीडिया पेजवर काळे बॅनर लावले जातील. त्यावेळी कोणतेही अनावश्यक कंटेन्ट प्रसिद्ध केले जाणार नाहीत. सरकारच्या कम्युनिकेशन हेड व्यतिरिक्त मान्यता दिल्याशिवाय कोणाच्याही रीट्वीटवर बंदी घातली जाईल.

मृत्यूनंतर १० दिवसांनी अंत्यसंस्कार केले जातील.

“ऑपरेशन लंडन ब्रिज” नुसार, राणीच्या शवपेटीची बकिंघम पॅलेस ते वेस्टमिन्स्टर पॅलेस पर्यंत मिरवणुकी काढण्याची योजना आहे. त्यानंतर पॅलेसजवळ राणीच्या पार्थिवाचे दर्शन घेण्यासाठी २३ – २३ तासांसाठी सलग तीन दिवसांसाठी जनतेसाठी खुले असेल. व्हीआयपी लोकांना दर्शनासाठी टाइम स्लॉट ठरवून दिला जाईल. आणि त्यासाठी तिकिटे बुक करावी लागतील.

राणीच्या मृत्यूनंतर १० दिवसांनी अंत्यसंस्कार केले जातील. राणीच्या मृत्यूचा दिवस “राष्ट्रीय शोक दिवस” ​​म्हणून साजरा केला जाईल. तथापि, ही अधिकृत बँक सुट्टी असणार नाही. जर ते कामाच्या आठवड्याच्या दिवशी राणी वारली तर ते बँक त्यांच्या कर्मचाऱ्यांना एक दिवस सुट्टी द्यावी की देऊ नये हा निर्णय स्वतः घेईल.

राणीच्या मृत्यूबद्दल पंतप्रधानांना एका नागरी सेवकाद्वारे सूचित केले जाईल की “लंदन ब्रिज डाउन आहे”, त्यानंतर मृत्यूची घोषणा पीए मीडिया वायरवरील न्यूजफ्लॅशद्वारे केली जाईल.

ऑपरेशन लंडन ब्रिज नंतर ऑपरेशन स्प्रिंग टाइड करण्यात येईल. 

ऑपरेशन लंडन ब्रिज राणीच्या मृत्यूशी जोडलेले आहे , तर ऑपरेशन स्प्रिंग टाइड मध्ये एलिझाबेथ राणीनंतर चार्ल्सला राजा घोषित करण्यात येऊन सिंहासनावर बसवले जाईल. संरक्षण मंत्रालय सर्व सलामी स्थानकांवर तोफांची सलामी देईल. यूके संसद आणि स्कॉटलंड, वेल्स आणि उत्तर आयर्लंडच्या विधानसभेला तात्पुरत्या स्वरूपात स्थगिती दिली जाईल.

 

हे ही वाच भिडू.

Leave A Reply

Your email address will not be published.