खरंच त्या मिशीवाल्या राणीसाठी १३ जणांनी जीव दिला होता ?

तुम्हाला आजीच्या गोष्टीतली राणी आठवते का? जगातल्या बऱ्यापैकी सगळ्याच आज्ज्यांची ‘राजा राणीची’ गोष्ट सेम असायची. या गोष्टीतली राणी दिसायची कशी? तर सुंदर, गोरीपान, मोठे मोठे डोळे, लाल ओठ, लांबसडक केस, सडपातळ.

आताच्या मेगन फॉक्सला लाजवेल एवढी सुंदर असायची आजीच्या गोष्टीतली राणी.. पण आज आपला भिडू तुम्हाला सांगणार आहे ‘मिशीवाल्या राणीची गोष्ट’

तर गोष्ट आहे २०१७ सालची. एका फोटोने इंटरनेटवर अक्षरशः धुमाकूळ घातला होता. ब्लॅक अँड व्हाईटच्या जमान्यातल्या त्या फोटोत लांब झब्बा फ्रॉक घातलेली एक स्त्री उभी होती. त्यात दिसत होते तिचे लांबसडक काळेभोर केस, दाट भुवया आणि लांबच लांब काळ्याभोर मिश्या.. हा फोटो होता, इराणच्या प्रिन्सेस कजरचा. आणि विशेष म्हणजे त्या फोटोला कॅप्शन होत

“पर्शिया (इराण) मधील सौंदर्याचे प्रतीक,जिच्यासाठी १३ तरुणांनी दिला होता जीव.”

वो कौन थी?

वो थी प्रिन्सेस ताज-अल-कझार .. लाखो दिलोंकी धडकन.. जिसकी मुछोंकी दुनिया दिवानी थीं.. असं आम्ही नाय इंटरनेट or दैनिक जागरण म्हणतंय.

होय.. इराणची राजकुमारी ताज अल काझार सुलतानाच्या सौंदर्याच्या किस्से आजही २१ व्या शतकात चवीचवीने सांगितले जातात. तिने सौंदर्याची परिभाषाच मोडीत काढली होती. राजकुमारीच्या चेहऱ्यावर भुवया आणि लांब मिशा होत्या. तसेच ती खूप लठ्ठ होती. इराणमध्ये तिचे रूप हे सौंदर्याचं मानक समजलं जात असे.

हिजाब घालून पाश्चात्य ड्रेस घालणारी ती त्या काळातील इराणमधली पहिली महिला होती.

इथं तर moco-choco नावाची वेबसाईट असं म्हणते की ती प्रिंसेस अनीस-अल-दोलेह म्हणजेच फातिमा खानम होती. एवढ्यावरच थांबतील कि नाही हे लोक.. तर ऐका.. दैनिक जागरण म्हणतंय पर्शियन किंग नासिर-अल-दिन-शाह-कझार हे तिचे पप्पा होते. तर moco-choco म्हणतय पर्शियन किंग नासिर-अल-दिन-शाह-कझार हे तिचे पतीदेव होते. भाई हम तो कन्फ्युजियागये..

पण..

भिडून केलेल्या रिसर्च प्रमाणे २०१७ मध्ये जे फोटो इंटरनेटवर प्रिंसेस कझार पर्शिया या नावाने व्हायरल होत होते त्यात २ प्रिन्सेस होत्या. एक होती प्रिन्सेस ताज-अल-कझार सुल्ताना म्हणजेच जाहरा खानम (१८८४ ते १९३६) आणि दुसरी प्रिन्सेस अनीस-अल-दोलेह म्हणजेच फातिमा खानम (१८५५ ते १९०५).

दोघींमध्ये एक साम्य होत, ते म्हणजे दोघी पण प्रिन्सेस होत्या आणि दोघींना पण मिश्या होत्या. आणि त्या दोघी सावत्र बहिणी होत्या. आणि पर्शियन किंग नासिर-अल-दिन-शाह-कझार हे त्या दोघींचे पप्पा होते. त्यांचे पप्पा वारंवार युरोपला भेटी द्यायचे आणि त्यांना फोटो काढण्याचा नाद होता. म्हणून त्यांनी आपल्या दोन्ही मुलींचे फोटो काढले तर लोकांनी काय व्हायरल केलं बघा. काय भेंडी नुसता घोळ..

तुम्ही जर इंटरनेटवर प्रिंसेस कझार पर्शिया असं शोधलत तर साहजिकच या दोघींचे पण आणि बऱ्याच राजकुमाऱ्यांचे फोटो तुम्हाला दिसतील.

याच कारण असं कि १७८५ ते १९२५ पर्यंत इराणवर तुर्की वंशाच्या काझर राजवंशाने राज्य केलं. लॉजिकली बघायला गेलं तर काझर राजघराण्यातील प्रत्येक राजकन्येला प्रिंसेस कझार पर्शिया असच म्हंटल जाणार ना.

सौंदर्याचं प्रतीक?

१९ व्या शतकात पर्शियात चेहऱ्यावरचे केस हे महिलांच्या सौंदर्याचं प्रतीक होत हे तितकच खरं आहे. त्या काळात पर्शियन महिलांना चेहऱ्यावर मिश्या ठेवणं फॅशनेबल वाटायचं. एकोणिसाव्या शतकातील पर्शियन पुस्तक तसेच छायाचित्रे हे दाखवून देतात की कझार महिलांनी सौंदर्याचं आणि सौम्यतेचं प्रतीक म्हणून चेहऱ्यावर पातळ मिश्या ठेवल्यात किंवा रंगवल्या तरी आहेतच.

खरचं १३ जणांनी जीव दिला होता का?

इंटरनेटवरच्या काही वेबसाईट वर अशी माहिती मिळते कि, प्रिन्सेस ताज-अल-कझार- सुल्ताना नाहीतर मग तिची बहीण प्रिंसेस अनीस-अल-दोलेह ही इराणमधली त्याकाळातली लग्नासाठीची सर्वात इलिजिबल तरुणी होती. तिच्या लग्नाच्या वयात तिला आसपासच्या राज्यांमधून कमीतकमी १५० श्रीमंत पुरुषांकडून लग्नाचे प्रस्ताव आले होते, त्यापैकी १३ जणांना तिने लग्न करण्यास नकार दिल्यामुळे त्यांनी आत्महत्या केली होती.

पण…

भिडूनं इराणच्या इतिहासात हा किस्सा शोधण्याचा प्रयत्न केला. कोणत्याही पुस्तकात किंबहुना Crowning Anguish या पुस्तकातही (ज्यात प्रिन्सेस ताज-अल-कझार- सुल्तानाचे किस्से आहेत) १३ पुरुषांनी आत्महत्या केल्याचे निदर्शनास आले नाही. सध्या उपलब्ध असलेल्या इंटरनेटवरच्या जंक हिस्ट्रीवर कितीपत विश्वास ठेवायचा हा ज्याचा त्याचा विषय.. बाकी आम्हाला काय घावलं नाय.

इतिहासकार व्हिक्टोरिया मार्टिनेझच्या म्हणण्यानुसार,

अनीस १२ वर्षांची होण्यापूर्वीच लग्न झाले होते. तर ताज-अल चे अमीर हुसेन खान शुजा-अलशी लग्न झाले होते. त्यांना दोन मुल आणि दोन मुली झाल्या, परंतु त्यांचा घटस्फोट झाला होता.

अशाप्रकारे दोन्ही बहिणींचे किस्से मिक्स करून एका मिशीवाल्या राणीची गोष्ट तुम्हाला इंटरनेटने सांगितली. पण बस काय भिडू.. खरी गोष्ट आम्ही नायतर कोण सांगणार. अशाप्रकारे मिशीवाल्या राणीची गोष्ट संपली आहे.

हे ही वाच भिडू.

Leave A Reply

Your email address will not be published.