“अशा बाहेर चर्चायत”, आबांनी हे तीन शब्द लिहले आणि त्यांचं निलंबन वाचलं..!!! 

आज आबा असते तर विरोधकांसाठी ते तोफ असते. सत्ताधारी पक्षात असताना आबांनी झालेल्या टिका खोडून काढण्यासाठी केलेली भाषण आजही नेत्याकडून चवीने चर्चेली जातात. लोकांच्या मते आज आबा असते तर आघाडीवर इतकी वाईट वेळ आली नसती. 

असाच आबांचा एक किस्सा.

राज्यात तेव्हा युतीच शासन होतं. मुख्यमंत्री म्हणून मनोहर जोशी आणि गृहमंत्री म्हणून गोपीनाथ मुंडे चांगला कारभार हाकत होते. युतीच्या शासनावर लोक खुष होते की नाही हे सांगता येवू शकत नसलं तर युती शासनाच्या काळात कोणत्याच नेत्यावर भ्रष्ट्राचाराचे आरोप झाले नव्हते. पारदर्शक सरकार हि थीम लोकांना सुखावत होती. 

आर. आर. पाटील मात्र सभागृहात वेगवेगळे आरोप करुन मंत्र्यांसह प्रशासकिय अधिकाऱ्यांना कामाला लावायचं काम करायचे. झालं असं की नेहमीप्रमाणे जोरदार खंडाजंगी चर्चाचालू होती. आर. आर. आबा नेहमीप्रमाणे आपली तोफ घेवून विरोधकांवर तुटून पडले होते. 

यातच आबांनी थेट मुख्यमंत्र्यांवर आरोप केला, 

सहारा प्रकरणात मनोहर जोशींनी १०० कोटींचा भ्रष्ट्राचार केला.  

आबांचा आरोप गंभीर होता. थेट सभागृहात मुख्यमंत्र्यांवर १०० कोटींच्या भ्रष्ट्राचाराचा तो आरोप होता. पण आबा विरोधकांवर तुटून पडले होते तेव्हा केबीनमध्ये स्पीकरवर आबांचा भाषण खुद्द पवार साहेब ऐकत होते. शरद पवारांनी आबांचा आरोप ऐकला आणि तात्काळ चिठ्ठी पाठवून त्यांना केबीनमध्ये बोलावून घेतलं. 

आबा लगबगीने शरद पवारांच्या जवळ गेले. सभागृह सोडून इतक्या लगबगीने बोलवण्याची काय गरज अस आबांनी विचारलं,

तेव्हा शरद पवार म्हणाले, पुरावे कुठायत..? 

आबा म्हणाले,

कुठले पुरावे. कागदपत्री काहीच पुरावे नाहीत. पण सभागृहात बोलल्यामुळे अब्रुनुकसानीचा दावा दाखल केला जावू शकत नाही. म्हणूनच सभागृहात टिका केली. 

शरद पवार सभागृहाचे नियम कोळून प्यायले होते. हक्कभंग येवू शकतो. आमदारकी जावू शकते हे शरद पवारांनी आबांना समजावून सांगितलं. 

आत्ता मात्र आबांच धाब दणाणलं. कारण युती शासनाला आबांनी चांगलच धारेवर धरलं होतं. आबांची आमदारकी रद्द करण्यासाठी युती शासन सहज हक्कभंग आणु शकत होतं. 

पवार साहेब म्हणाले,

तुमचं भाषण करण्यासाठी आत्ता प्रत येईल. त्यावर सगळ्या भाषणापुर्वी एक ओळ घाला,

“अशा बाहेर चर्चायत”

आबांकडे भाषणाच्या प्रती आल्या. आबांची सही झाली के ते अधिकृत भाषण ठरणार होतं. आबांनी प्रत्येक आरोपाच्या मागे अशा बाहेर चर्चायत इतकच टाकलं. 

इकडे मनोहर जोशींनी हक्कभंग आणण्याची तयारी केली होती. त्यासाठी विधानसभेच्या सचिवांना देखील सांगण्यात आलं होतं. आबांच्या भाषणाच्या प्रती आल्या.

त्या विधानसभेच्या सचिवांनी पाहिलं आणि जोशींनी सांगितलं.

“अशा बाहेर चर्चायत” या वाक्यामुळं आपल्याला हक्कभंग आणता येणार नाही.  

हे हि वाच भिडू. 

1 Comment
  1. PRAVEEN BARDAPURKAR says

    ही तर हकीकत झाली .
    किस्सा , हकीकत आणि अनुभव यातला फरक माहिती नसला की अशीच गल्लत होणार म्हणा !

Leave A Reply

Your email address will not be published.