व्हिजिटींग कार्डवर पेपरचं फ्रंट पेज लिहून काढणाऱ्या जोशी सरांचं डायरेक्ट मोदींनी कौतुक केलंय…

पंतप्रधान नरेंद्र मोदी आपल्या ऑल इंडिया रेडिओवर प्रसारित होणाऱ्या ‘मन की बात’ कार्यक्रमात नेहमीच वेगवगेळ्या विषयांवर आपलं मत मांडत असतात. हे विषय कधी राजकीय असतात, कधी आंतराष्ट्रीय मुद्दे, कधी देशांतर्गत विषय तर कधी एखाद्या व्यक्तीच्या कामावर फोकस केलं जातं. 

आताही पंतप्रधानांनी आपल्या मन की बात कार्यक्रमात  हिमाचल प्रदेशातल्या उना जिल्ह्यातील शिक्षक राम कुमार जोशी यांचा उल्लेख केलाय. राम कुमार यांच्या मायक्रो रायटिंगचं पंतप्रधांनी भरभरून कौतुक केलंय. 

आता थेट पंतप्रधांनाही कौतुक केलंय म्हंटल्यावर चर्चा तर होणारचं. आपल्या या कलेमुळे राम कुमार यांची त्यांच्या राज्यात तर चर्चा होतच आहे सोबतच आता देशपातळीवर सुद्धा त्यांच्या कलेची वाह वाह केली जात आहे.   

राम कुमार जोशी जखेडा मधल्या सरकारी प्राथमिक शाळेत शिक्षक म्हणून कार्यरत आहेत. ते गेल्या ३५ वर्षांपासून म्हणजे १९८४ पासून मायक्रो रायटिंगच्या माध्यमातून चित्रे तयार करण्याच्या कामात गुंतले आहेत.  

आता मायक्रो रायटिंग म्हणजे काय हा प्रश्न तुम्हाला पडला असेलच भिडू

तर फक्त शब्दांचा वापर करून लहान लहान अक्षरात चित्र काढणे, म्हणजे मायक्रो रायटिंग. जोशी यांनी आपल्या मायक्रो रायटिंगच्या कलेने आतापर्यंत प्रसिद्ध नेते, देवदेवता, मोठं मोठी प्रसिद्ध व्यक्ती, अभिनेते यांची चित्रे तयार केलीय आहेत. 

एवढंच नाही तर रामकुमार जोशी यांनी छोट्याश्या पोस्टाच्या स्टॅम्पवर नेताजी सुभाषचंद्र बोस आणि माजी पंतप्रधान लाल बहादूर शास्त्री यांचे चित्र काढले आहे. हेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना जास्त भावलं. आपल्या भाषणात त्यांनी राम कुमार यांच्या कलेचे भरभरून कौतुक केले. महत्वाचं म्हणजे त्यांनी आपली बहुतेक चित्रे ‘राम’ या शब्दानेच काढली आहेत. 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हंटल कि, 

राम कुमार जोशी यांनी छोट्या पोस्ट स्टॅम्पवर काढलेली चित्रे ही स्वतःमध्ये एक मोठी कला आहे.

राम कुमार जोशी यांनी आतापर्यंत भगतसिंग, नेताजी सुभाषचंद्र बोस, माजी पंतप्रधान लाल बहादूर शास्त्री, अमिताभ बच्चन, दक्षिण आफ्रिकेचे माजी राष्ट्रपती नेल्सन मंडेला, वर्ल्ड कपची ट्रॉफी, अयोध्याचं राम मंदिर, सत्य साई बाबा, शिर्डीचे साई बाबा, भगवान राम यांच्यासह अनेक व्यक्तिमत्त्वांचे चित्र रेखाटलं आहे.

या सगळ्यात चित्रांत राम कुमार यांनी राम शब्द किंवा त्या चित्राशी संबंधित नावाने ही चित्र काढली आहे. ही नाव त्यांनी इतक्या लहान अक्षरात लिहिली आहेत कि, जे वाचण्यासाठी लेन्स शिवाय पर्याय नाही. पण जोशी ही चित्रे कुठल्याही लेन्सशिवाय उघड्या डोळ्यांनी काढतात.

राम कुमार जोशी यांनी बनवलेली चित्रे मिलिमीटर ते सेंटीमीटर आणि अगदी इंचांपर्यंत आहेत. त्यांनी काढलेलं सर्वात मोठं गुरु नानक यांचं आहे, जे सुमारे ३ फूट आहे. सोबतच जोशी यांनी एका वृत्तपत्राचे पहिले पान एका पोस्टकार्डवर आणि उर्दू दैनिकाचे पान एका छोट्या व्हिजिटिंग कार्डवर लिहिले होते.

रामकुमार जोशी यांना आपल्या या कलेसाठी अनेक पुरस्कार मिळाले आहेत. २०१६ मध्ये त्यांना शिक्षक दिनी उत्कृष्ट शिक्षक पुरस्कारानेही गौरविण्यात आले आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी मन कि बात मध्ये आपला उल्लेख केल्यानंतर राम कुमार जोशी यांनाही  कॉलर ताठ झाल्यासारखं वाटतयं. त्यांनी म्हंटल कि,  ‘देशातील १३५ कोटी लोकांपैकी एका छोट्या कलाकाराला आणि शिक्षकाचा पंतप्रधानांनी मन की बात कार्यक्रमात उल्लेख केला. हि माझ्यासाठी ही खूप अभिमानाची बाब आहे.’

राम कुमार जोशी यांनी एका वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीत सांगितले की,

जेव्हा आधुनिक गॅझेटच नव्हते, तेव्हा फक्त चिठ्ठीच लिहिली जायची. त्या काळात ते आपल्या भागातील समस्या संपादकांना पत्राद्वारेच पाठवत असत. त्याच वेळी, त्यांना सूक्ष्म लेखनाची आवड निर्माण झाली आणि त्यांनी प्रथम एक ओळी किंवा दोन ओळींनी लेखन सुरू करून दोन हजार शब्दांचा टप्पा गाठला. त्यानंतर लाखात लहान शब्द लिहायला सुरुवात केली. या अंतर्गत त्यांनी पोस्टकार्डवर ३ लाखांपेक्षा जास्त शब्द लिहिले आहेत.

पंतप्रधानांच्या या भाषणानंतर प्रत्येक ठिकाणी राम कुमार जोशी यांची चर्चा आहे.  त्यांच्या परिसरात तर ते आधीही चर्चेत होतेच पण आता देशभरात त्यांच्या नावाचा बोलबाला सुरु आहे.

हे ही वाच भिडू:

Leave A Reply

Your email address will not be published.