आणि मोदींना धमक्या देणाऱ्या पाकिस्तानी सिंगरचा न्यूड व्हिडीओ व्हायरल झाला.

मित्रानो आणि मैत्रिणीनो तुम्हाला कधी कोणी नेटवर खास व्यक्ती भेटली आहे का? तिच्याशी तुम्ही खास गप्पा मारल्या आहात का? नक्की डिलीट करतोच्या आणाभाका घेऊन काही खास एकमेकाला शेअर केलं आहे का? तर खास तुमच्यासाठी आमच्या गुरुनी सांगितलेला संदेश तुम्ही पण लक्षात ठेवा,

“कोणताही फोटो डिलीट होत नसतो.”

नुकताच याचा अनुभव घेतला एका पाकिस्तानी गायिकेने, रबी पीरझादा. 

गेल्या आठवड्यात तिचे अतिशय पर्सनल असे न्यूड व्हिडीओ अख्ख्या इंटरनेटवर व्हायरल झाले. कुठल्यातरी मित्रावर विश्वास ठेवून तिने तो व्हिडिओ पाठवला होता पण आता फक्त पाकिस्तानच नाही तर प्रत्येक भारतीय, बांगलादेशी, श्रीलंकन माणसांच्या मोबाईलमध्ये तो पोहचला आहे.

कोण आहे हे रब्बी पीरझादा?

एका पाकिस्तानी आर्मीमनची मुलगी. क्वेट्टामध्ये जन्मली, शाळेत असतानापासून गायला सुरवात केली.

रब्बी पिरझादा २००४ पासून पाकिस्तानी सिनेमात गाणी म्हणते. बर गाते. पण कोण पाकिस्तानमध्ये तिला ओळखत अस काही नाही. पण आपले भारतीय मोदीभक्त तिला विशेष ओळखतात. कारण काय तर तिने मध्यंतरी काश्मीर प्रश्नावरून मोदींना धारेवर धरल होतं. हातात साप,अजगर वगैरे गोळाकरून भारताला, आपल्या प्रधानमन्त्री मोदीना धमक्या दिल्या होत्या. मग तिला शिव्या देण्याच्या निमित्ताने आपली ट्रोल मंडळी तिला ओळखू लागले.

आपल्या कडे राष्ट्रवादाच्या नावाखाली फालतूपणा करून पब्लिसिटी मिळवणारे काही गायक सेलिब्रिटी आहेत त्याप्रमाणे पाकिस्तानमध्ये रबी पीरझादा होती. इम्रान खानला कोणी काही म्हटल तर चवताळून उठणारी, भारताला शिव्या देणे म्हणजे देशप्रेम समजणारी रबी मात्र ते व्हिडीओ बनवून गोत्यात आली.

अस म्हणतात की भारताच्याच कुठल्यातरी आयटीसेलवाल्याने सर्जिकल स्ट्राईक करून तिचा व्हिडीओ बाहेर काढलाय.

ते काही असो पण एकेकाळी पाकिस्तानी कट्टर धार्मिक, देशप्रेमी लोकांच्यामध्ये फेमस असणारी रब्बी त्या व्हिडीओ मुळे मात्र एकदम हिटलिस्टवर गेली. आपल्या देशाच, समाजाच तिने नाक कापलं असच लोकांचं म्हणण पडल. बुरखा, घुंगट कसा महत्वाचा, पोरींनी कस चार भिंतीत राहिलं पाहिजे, देवाला घाबरल पाहिजे याच ज्ञान तिला देण्यात आलं.

तिचं बिचारीच लग्न झालंय, पदरात दोन पोरं आहेत. तरी असा मूर्खपणा करायची दुर्बुद्धी तिला का झाली असा प्रश्न विचारण्यात आला. 

अखेर रबी पीरझादा सोशल मिडियावर एका नव्या व्हिडिओमधून सगळ्यांच्या समोर आली. यावेळी ती बुरख्यात होती. तिने चूक मान्य केली. अल्ला कडे माफी मागितली आणि शिवाय सोशल मिडिया सोडून देणार असल्याचंही सांगितलंय.  हे त्याहूनही वाईट. तिची चूक झाली हे जरी मान्य केलं तरी तिच्यावर पाकिस्तानात जो हल्ला होतोय हे सुद्धा काही बरोबर नाही.

हीच ट्रोल मंडळी सगळ्यात पहिल्यांदा व्हिडीओ डाऊनलोड करून बघतात आणि हीच मंडळी पुढे त्या पोरीला संस्कृती शिकवतात. त्यामुळे पोरीनो आणि पोरानो या इंटरनेटच्या जंजाळात सावध राहा. कधी पण कोण पण शिकार करतय.

हे ही वाच भिडू.

Leave A Reply

Your email address will not be published.