सोप्या भाषेत फायनान्सच्या गोष्टी सांगणाऱ्या रचना रानडेंचं युट्युब चॅनेल सुपरहिट ठरलंय

चार्टड अकाउंट म्हणजे सीए. या नुसत्या शब्दानं एकदम हायक्लास असल्याची फिलिंग येते. पण नावासारखं हे फिल्ड सुद्धा तितकंच हायक्लास आहे. खासकरून गणित हा आवडता विषय आहे असं म्हणणारी मंडळी या फिल्डकडे वळतात. आणि याची परीक्षा म्हणाल तर जगातल्या सगळ्यात टफ परीक्षांपैकी एक मानली जाते. पण त्याच्या हायक्लास पॅकेजमुळे या फिल्डकडे वळणारी मंडळीसुद्धा तितकीचं आहे. 

आता यात असतं काय तर आपल्या रेग्युलर आयुष्याचा भाग असणाऱ्या सगळ्या व्यावहारिक पण महत्वाच्या गोष्टी, पण त्याचं कनेक्शन आकड्यांशी आणि अख्ख्या जगाशी असल्यामुळं कन्फ्युजन होत.  त्यात भर म्हणजे सेन्सेक्स, निफ्टी, स्टॉक, क्रिप्टो शेअरमार्केट अशी त्याची डेंजर नाव. 

पण या सगळ्यां गोष्टींचं एक साधं सोपं सोल्युशन म्हणजे सीए रचना रानडे. ज्या आपल्या युट्युब व्हिडीओच्या मदतीनं हे सगळे  इकॉनॉमिक प्रॉब्लेम एकदम डीपमध्ये, पण समजेल अशा भाषेतून ते पण उदाहरणासकट सांगतात. ज्याचा फायदा सीएबरोबरचं तुमच्या आमच्या सारख्या कॉमन लोकांनासुद्धा होतो.

आपल्या याच अवघड विषय समजून सांगण्याच्या पद्धतीमुळे रचना रानडे आज भारतातल्या फेमस कन्टेन्ट क्रिएटर आहेत. त्याचे युट्युबवर ३५ लाख स्बस्क्राइबर्स आहेत. एवढंच नाही तर त्या इतक्या फेमस आहेत कि, स्वतः गुगलनं त्यांची जाहिरात केलीये. 

तर या रचना रानडे मूळच्या पुण्याचा. आता त्यांचं फायनान्शिअल नॉलेज बघून कोणालाही वाटेल कि, त्यांची फॅमिली पक्की सीए लोकांनी भरलेली असणार नाहीतर लहानपणापासून रचना सीएचे धडे गिरवत असणार. पण रिऍलिटी जरा वेगळी आहे. रचना यांचे वडील किर्लोस्कर ब्रदर्समध्ये फायनान्स डिपार्टमेंटमध्ये काम करायचे. भाऊ सीएचं शिक्षण घेत होते. पण बाकी कोणी प्रॉपर सीए नव्हतं.

पण रचना यांची सीए बनण्याची स्टोरी एकदम इंटरेस्टिंग आहे, म्हणजे नॉर्मली होत काय आपण आवड म्हणून किंवा घरच्यांची इच्छा म्हणून एखाद करियर निवडतो. पण रचना यांनी सिरिअसवाल्या रिलेशनशिपसाठी सीए व्हायचं असं ठरवलं. 

म्हणजे झालं काय रचना यांचं स्वप्न होत सिंगिंगमध्ये काहीतरी करायचं. त्यासाठी त्यांनी १२ ते १४ वर्ष सिंगिंगचे क्लासेस सुद्धा घेतले. त्यांच्या विडलांची सुद्धा इच्छा होती कि रचना यांनी सिंगिंगमध्ये फुलटाईम करियर करायचं. पण ११-१२ वीला कॉलेजला असताना त्या एका सिरिअस रिलेशनशिपमध्ये आल्या. असचं दोघांमध्ये करियर बाबत गप्पा सुरु असताना रचना यांच्या पार्टनरने म्हंटल कि, मी तर सीए करणार आहे आणि तू सिंगिंग करायचं म्हणतेय, मग आपण भेटणार कसं?

त्यावेळी कॉलेजच्या वयात असणाऱ्या रचना यांना हा मोठा प्रॉब्लेम वाटला, म्हणून त्यांनी आपल्या रिलेशनशिपसाठी सिंगिंग सोडून सीए करायचं ठरवलं. आता यावर विश्वास बसणं अवघड आहे, पण हे स्वतः रचना यांनी एका मुलाखतीत सांगितलंय. रिलेशनशिपमुळे का होईना त्यांची सीए फिल्डमध्ये एन्ट्री झाली, आणि त्यांचे ते सीए पार्टनर अजय रानडे आज त्यांचे लाईफ पार्टनरसुद्धा आहेत.  

तसं रचना यांचं लहानपणी शिक्षणात जास्त डोकं नव्हतं, ॲव्हरेज मार्क मिळाले तरी त्या ओके असायच्या. पण सीए शिक्षण पूर्ण झाल्यानंतर त्यांनी सीएच्या पोरांना शिकवायला सुरुवात केली. २००९ पासून त्या सीए, एमबीए आणि पीजीडीएमच्या पोरांना शिकवायच्या. हे रुटीन जवळपास १० वर्ष असचं सुरु होत.

पण व्हायचं काय, स्पेशली सीए शिकायला बाहेर गावावरून पोरं- पोरी पुण्यात यायची आणि सिलॅबस संपला कि परत घरी जायची. पण या सुट्ट्यांच्या काळात नवीन काही गोष्टी घडल्या कि, त्या पोरांपर्यंत पोहोचवणं फार अवघड होऊन बसायचं. त्यावेळी रचना आणि त्यांची टीम सगळ्यांना महत्वाच्या नोट्स  इमेल करून पाठवायच्या.

पण पोरं रचना यांना म्हणायची कि मॅडम तुम्ही पाठवलेल्या नोट्सपेक्षा तुमची समजून सांगायची पद्धत डोक्यात फिट होते, तेव्हा रचना यांनी ठरवलं कि आपण युट्युबवर छोटे व्हिडिओ बनवून त्यांना शेअर करायचे.  त्या २०१५ पासून आपले हे व्हिडिओ युट्युबवर शेअर करायच्या. फारसा रिच यायचा नाही तरीही त्यांचे प्रयत्न सुरू होते.

पण त्यांना खरा बूम मिळाला लॉकडाऊनमध्ये. घरात निवांत बसेलले लोक शेअर मार्केट, स्टॉक्स यासंदर्भात गोष्टी सर्च करायला लागले आणि याच दरम्यान २०१९ ला ‘बेसिक ऑफ स्टोक मार्केट’ हा व्हिडिओ रचना यांनी अपलोड केला होता तो लोकांपर्यंत मोठ्या प्रमाणात पोहोचला.या व्हिडिओ ला २ कोटीपेक्षा जास्त व्ह्यूज आहेत, या व्हिडिओनेचं रचना यांची लाईफ चेंज केली.

त्यानंतर त्यांनी असेच फायनान्शिअल व्हिडिओ बनवायला सुरुवात केली, त्याला चांगला प्रतिसाद मिळायला लागला. स्टोक मार्केटच्या अगदी बेसिक बेसिक गोष्टीं त्या सहज समजतील अश्या पद्धतीनं सांगायला लागल्या. त्यामुळे अवघड वाटणाऱ्या गोष्टी सुद्धा सहज समजायला लागल्या. 

आपल्या युट्युबच्या शिकवणीत मग त्यांनी वेगवेगळे विषय सुद्धा घ्यायला सुरुवात केली. म्हणजे गुगलवरून पैसे कसे कमवायचे ते पार निफ्टी, क्रिप्टोमध्ये गुंतणावणूक कशी असते इथपर्यंत. हे अवघड विषय सुद्धा त्यांच्या समजून सांगायच्या स्टाइलने एकदम सोपे वाटायला लागले, ज्यामुळे त्यांच्या फॅन फॉलोईंगमध्ये सुद्धा मोठी वाढ व्हायला लागली. 

भारी गोष्ट म्हणजे युट्युबच्या सीईओ वोजसिकी यांनी सुद्धा रचना यांचं कौतुक करताना आपल्या ब्लॉगमध्ये लिहिलं होत की, भारतीय क्रिएटर रचना रानडे आपल्या चॅनेलचा वापर लोकाना आर्थिकदृष्ट्या साक्षर बनवण्यासाठी करत आहेत. 

आपण जर रचना यांचा युट्युबचा प्रवास जर पहिला तर २०१५ मध्ये त्यांनी २ विडिओ अपलोड केले होते, २०१६ मध्ये ५ , २०१७ मध्ये ६०, २०१८ मध्ये ६८ व्हिडिओ होते. पण आज हा आकडा ७०७ वर जाऊन पोहोचलाय. ‘बेसिक्स ऑफ स्टॉक’ हा व्हिडिओ २ कोटींच्या वर गेलाय आणि सध्या त्यांच्या सीए रचना रानडे या चॅनेलवर  १६ कोटींच्यावर व्ह्यूज आहेत. 

म्हणजे २०१९ मध्ये टाकलेला पहिला व्हिडिओ आणि आज २०२२ या तीन वर्षांच्या काळातच त्यांनी मिलियन ऑफ फॉलोवर्सच्या घरात एन्ट्री केलीये. त्यांचा तीन वर्षांतचं युट्युबवरचा गल्ला हा ३ ते ४ कोटींच्यावर जाऊन पोहोचलाय. हे पैसे त्यांना युट्यूब ॲड्स , मेंमरशीप प्लॅन,व्हिडिओ कोर्सेस या माध्यमातून मिळतात. महत्वाचं म्हणजे त्या शेअर मार्केटमधल्या एक सक्सेसफुल इन्व्हेस्टर आहेत. 

त्यामुळे  बायकांना व्यवहार कळत नाहीत अस म्हटलं जातं, या गोष्टीला छेद देत आज रचना रानडे युट्यूबवर फायनॅन्शियल नॉलेज देत करोडोंची कमाई करतायत.

हे ही वाच भिडू :

 

Leave A Reply

Your email address will not be published.