ढग असले की रडारवर घावत नाय हे वैज्ञानिक दृष्ट्या खरं आहे काय ? 

वातावरणात ढग आहेत. समोर पाकिस्तान. आपल्याला पाकिस्तानात विमान घुसवून हल्ला करायचा आहे. सगळ्यांच्या चेहऱ्यावर एकच प्रश्न आत्ता रडारला कस गंडवायचं. तेव्हा वरिष्ठ म्हणतात, ढग आहे. आपण रडारला घावणार नाय घुसवा. 

इथपर्यन्त ठिक आहे अस म्हणता येईल,

पण फक्त वरिष्ठांची मर्जी ऐकायची म्हणून असा निर्णय घेतला तर. आत्ता बोंबलल कनाय. बर हि सत्यघटना आहे. पात्र देखील सत्य आहेत हे खुद्द पंतप्रधान मोदींना आपल्या मुलाखतीत सांगितलं. माणसांनी लगेच चेष्टा चालू केली. 

अस कुठ असतय का?  

अहो ढगाला पण भेदून रडार जातय अस शाळेपासून वाचत आलोय आणि हे काय नविन. पण लोकांना माहिती नाय मोदी हैं तो मुमकीन हैं. मोदींनी आत्तापर्यन्त कित्येक अशक्य गोष्टी शक्य करुन दाखवल्या आहेत हे आपल्याला मनापासून मान्य करायला पाहीजे. 

तर भिडू लोक्स, लोकांनी कितीही चेष्टेचा विषय केला तर आपण विज्ञानाच्या पातळीवर रडार विमान ढग आणि पंतप्रधान पदाची जबाबदारी या गोष्टी समजून घ्यायला हव्यात अस आम्हाला वाटतं. 

म्हणून म्हणलं वैज्ञानिक पातळ्यांच्या कसोट्यावर या सर्वांच मुल्यमापन करुन काय खर काय खोट ते तुमच्यापुढे मांडाव. 

पहिली गोष्ट रडार काय असतं. 

RADIO DETECTION AND RANGING (RADAR)

या वाक्याचा शॉर्टफॉर्म म्हणजे रडार. रेफेल्शन ऑफ इलेक्टोमॅग्नेटिक वेव्स या प्रणालीवर रडार काम करतं. या टॅक्निकमध्ये दोन गोष्टी असतात एक सेंडर आणि दूसरा रिसिव्हर. म्हणजे कस तर सेंडर कडून इलेक्टोमॅग्नेटिक व्हेव म्हणजे सुक्ष्मतरंग सोडली जातात. आत्ता इलेक्ट्रोमॅग्नेटिक व्हेव हे धातूचं जे मटरियल असेल त्याला धडकतात आणि परत रिसिव्हरकडे येतात. तिथे परत आलेले जे व्हेव आहेत त्यावरुन एक चित्र दिसतं. एवढं सोप्प प्रकरण असतय हें. 

आत्ता हे कुणाला धडकतात, कुणातून आरपार जातात हा डिटेल अभ्यासाचा विषय पण भारताने जे विमान पाकिस्तानवर सोडलं होतं ते रडारवर दिसतात आणि ढग मग तो कितीही मोठ्ठा असो अगदी उद्धव ठाकरे म्हणाले होते त्या प्रकारे ९ किमी जाडीचा का असो त्यातून सुक्ष्मतरंग आरपार जातात. म्हणजेच अख्खा मराठवाड्यात चार वर्ष पाऊस झाला नाय तरी दुष्काळ पडणार नाय असा एक पावसाचा ढग जरी आला तरी सुक्ष्मतरंग त्यातून आरपार जाणारचं. 

आत्ता दूसरा मुद्दा रडारचा वापर कुठे करतात. 

रडार हे विमान, समुद्रातील बोटी, पाण्याखालच्या पाणबुड्या शोधण्यासाठी वापरले जातात. साधारण प्रत्येक देश सुरक्षेसाठी सध्या रडारचाच वापर करतो. इतकच नाही तर रडारचा वापर आत्ता रडार गन म्हणून रस्त्यावरून ओव्हरस्पीडने जाणाऱ्या गाड्यांचा स्पीड शोधण्यासाठी देखील केला जातो. कारण अस की रडारवर फक्त कोणती गोष्ट कुठे घुसले इतकच कळत नाही तर त्याचा वेग, अचूक लोकेशन, जमिनीवरूनची उंची अस जे काही असेल ते सगळं कळतं. 

रडारपासून वाचण्यासाठी भारताकडे काय टॅक्नॉलॉजी आहे का ? 

हे बघा मध्ये कोणतरी म्हणालं होतं गाईच शेण विमानावर लावलं तर ते रडारवर सापडत नाही. या प्रकरणात रडार लाजून आत्महत्या करण्याच्या तयारीत होतं पण काही शास्त्रज्ञांनी मनधरणी करुन प्रकरण मिटवलं. असो तर रडारच्या टप्यात न येण्यासाठी काय करता येत, 

याच उत्तर आहे, 

Stealth टेक्नॉलॉजी.

आत्ता हि पद्धत नेमकी काय आहे ते आम्हालापण माहिती नाही फक्त हा प्रकार लय खर्चीक आहे इतकं कळत. कारण स्टेल्थ टेक्नॉलॉजी असणारी विमाने फक्त अमेरिकी आणि रशियाकडे असल्याची माहिती मिळते. अशी टेक्नॉलॉजी मिराज वर पण नाही. आणि हो आपण जे राफेल घेणार आहोत त्या विमानांकडे देखील अशी टेक्नॉलॉजी नाही. 

राहता राहिला विज्ञानाच्या पातळीवर पंतप्रधान पदाची चकित्सा करण्याबाबत तर तो विषय तुमच्याकडे कदाचित रडार सुद्धा महाभारत किंवा रामायणातून आलेलं असू शकतं. कारण पंतप्रधानच मागे म्हणाले होते गणपती प्रकरण हे प्लॅस्टिक सर्जरीच उदाहरण आहे. शिवाय ते गटारीतून गॅसनिर्मीतच प्रकरण देखील आहेच. 

  • लेख पुर्णपणे वैज्ञानिक आहे भावना राखून वाचावे. 

हे ही वाच भिडू. 

Leave A Reply

Your email address will not be published.