शाहू महाराजांच्यामुळे त्यांच्या घराण्याला राजगुरू हे नाव मिळालं.

शिवराम हरी राजगुरू ! भगतसिंग आणि सुखदेव या आपल्या साथीदारांसह देशासाठी हसत हसत फासावर गेलेले हे क्रांतिकारक. राजगुरू हे महाराष्ट्रातील होते हे आपणा सर्वाना ठाऊक आहे पण त्यांच्या घराण्याचा इतिहास आपल्याला ठाऊक नसतो.

एकदा स्वतः शिवराम हरी राजगुरू यांनी आपल्याला राजगुरू हे आडनाव कसे मिळाले हे सांगितले होते.

अठराव्या शतकातली गोष्ट. औरंगजेब महाराष्ट्रात मराठा साम्राज्य उध्वस्त करण्यासाठी ठाण मांडून बसला होता. बरेच वर्ष प्रयत्न करूनही त्याला ते शक्य झालं नव्हत. संभाजी महाराजांना त्याने छळ करून मारलं, त्यांच्या मुलाला आपल्या अटकेत ठेवलं.

जवळपास पंचवीस वर्ष प्रयत्न करूनही त्याला मराठ्यांना संपवण शक्य झालं नाही. तो मराठी मातीतीच मेला. संभाजी पुत्र शाहू महाराजांची सुटका झाली. ते स्वराज्यात परतले.

परतत असताना त्यांचा मुक्काम पुण्याजवळील चाकण येथे पडला. तिथे त्यांची भेट स्वामी कचरेश्वर यांच्याशी झाली.  पुण्याजवळच्या चाकण इथे त्यांचं वास्तव्य होत. एक सत्वशील तपस्वी म्हणून लोक त्यांचा आदर करायचे. त्यांच्या विद्वत्तेची कीर्ती चारी मुलुखात पसरलेली होती. शाहू छत्रपतींनी देखील त्यांची परीक्षा घ्यायचं ठरवलं. दोघांची प्रश्नोत्तरे झाली.

कचरेश्वरांच्या विद्वत्तेचा खूप मोठा प्रभाव शाहू महाराजांवर पडला. त्यांना आपला गुरु मानलं. कचरेश्वर बाबांनी देखील आदरातिथ्य करून महाराजांची रवानगी केली.

पुढे शाहू महाराजांचा सातारा येथे राज्याभिषेक झाला. त्यानंतर त्यांनी कचरेश्वर बाबांना बोलावून घेतल. पण ते चाकण सोडून आले नाहीत. पण तरीही शाहू महाराजांनी त्यांना आपल्या गुरुस्थानाची जागा दिली. चाकणला नियमित शिधासामग्री साताऱ्याहून जात असे. कचरेश्वर महाराजांची महती सर्वत्र पसरली. शाहू छत्रपतींचे गुरु म्हणून त्यांना राजगुरू म्हणल जाऊ लागलं.

पुढे कालांतराने त्यांचे  आडनावच राजगुरू झाळे. याच घराण्याचे वंशज त्यांचा नातू म्हणजे हरी राजगुरू. ते आपल्या कुटुंबासह खेड येथे वास्तव्यास आले आणि त्यांचा मुलगा पुढे जाऊन शहीद शिवराम हरी राजगुरू म्हणून प्रसिद्धीस पावला. त्यांच्या नावावरून खेडचे नाव राजगुरूनगर करण्यात आले आहे.
हे ही वाच भिडू.

Leave A Reply

Your email address will not be published.