एकेकाळी मणिरत्नमच्या सिनेमात कीबोर्ड वाजवणारा मुलगा म्युजिक डायरेक्टर बनला.

मणिरत्नमची फॅमिली प्रोडकशन कंपनी “व्हिनस पिक्चर्स” डबघाईला आलेली होती, अशा वेळी आपल्या मुलाने एक चांगला कॉर्पोरेट जॉब करावा अशी त्यांच्या आई वडिलांची इच्छा होती. पण सिनेमा बनवण्याचं वेड हे मणिरत्नममधे आधीच भिनलं होतं.

MBA FINANACE केलेलं असतानाही सगळं सोडून हा पठ्या सिनेमा क्षेत्रात उतरला. त्याच्या पहिल्याच चित्रपटाने कर्नाटकचा राज्य पुरस्कार मिळवला.

पुढे आलेला “मौना रागम” या सिनेमाने मणिरत्नमला चांगलीच प्रसिद्धी मिळवून दिली. या फिल्मचं एक वैशिष्ट्य म्हणजे यातील  गाणी ज्यांचं संगीत दिग्दर्शन केलं होतं खुद्द इलैयाराजा यांनी आणि त्यांच्याच गाण्यांच्या रेकॉर्डिंग मधे रहमान कीबोर्ड वाजवायला असायचा.

नागराज मंजुळे आणि अजय अतुल हे जेवढे महाराष्ट्रात फेमस आहेत काहीसा त्याप्रमाणेच माणिरत्नम आणि इलैयाराजा यांची जोडी सिनेमा दर सिनेमा लोकांपर्यन्त दर्जेदार चित्रपट पोचवू लागले.

मणिरत्नम आपल्या संगीत दिग्दर्शकाच्या निवडी बद्दल निश्चिन्त होते, परंतु या कहाणीमध्ये एक वळण आलं, नवीन येणाऱ्या “रोजा” या सिनेमाचे निर्माते के. बालाचंदर यांचा इलैयाराजाशी वाद झाला.

त्यांनी 1990 च्या सुमारास इलैयाराजासोबत काम करणे पूर्ण बंद केले.

के. बालाचंदर यांनी मणि समोर एकाच अट घातली ती म्हणजे तुम्हाला एखादा नवीन संगीत दिग्दर्शक शोधावा लागेल.

शारदा ही मणिरत्नम यांची चुलत बहीण जी वेगवेगळ्या ऍड साठी जिंगल रेकॉर्ड करायची तिने रेहमान बरोबर खूप काम आधी केलं होतं. शारदाचे पती त्रिलोक हे सुद्धा याच व्यवसायात असल्या कारणाने ते मणिरत्नम समोर बऱ्याच वेळा रेहमान  च्या नावाचा उल्लेख करायचे पण मणिरत्नम सांगतात,

” मी कधीच ते  बोलणं मनावर घेतलं नाही.”

त्रिलोक आणि शारदा यांनी लिओ कॉफी साठी एक जिंगल केली जी फार जास्त प्रसिद्ध झाली आणि त्याचसाठी एक पार्टी ठेवण्यात आली. हीच ती वेळ ज्यावेळी मणिरत्नम  आणि रेहमान पहिल्यांदा चांगल्या पद्धतीने भेटले.

रेहमानने मणिरत्नमला आपल्या स्टुडिओमधे येण्यासाठी निमंत्रण दिले “मी एके दिवशी नक्की येईल” असं आश्वासन मणिरत्नमने दिलं. पण तो योग काही जुळत नव्हता.

शेवटी ती वेळ आली त्रिलोक ने रहमान ला फोन केला आणि “मी मणिरत्नम ला घेऊन तुझ्या स्टुडिओला येतोय” असं कळवलं.

रहमानने आपल्या स्टुडिओ मधे काही ट्यून्स ऐकवल्या मणिरत्नम ने काहीच प्रतिक्रिया न देता सगळ्या ट्यून्स ऐकून घेतल्या. काही वेळाने निवडक टेप्स घेऊन ते निघून गेले. रहमान बऱ्याच संभ्रमात राहिले  आणि त्रिलोक ने रहमानला मणिरत्नमच्या उत्तराची  वाट बघायला सांगितलं.

मणिरत्नम ने 25 वर्षांनी हे सांगितलं,

“त्या दिवशी रेहमान ने मला जे संगीत ऐकवलं त्यावर माझा विश्वास बसत नव्हता.”

पुढे “रोजा” प्रदर्शित झाला आणि त्यातल्या गाण्यांनी नवी उंची गाठली, “दिलं है छोटासा छोटीसी आशा”, “ये हसी वादिया” अशा गाण्यांनी लोकांना कितीतरी दिवस झुरत ठेवला.

या घटने नंतर भारतीय संगीत क्षेत्रात एक रहमान नावाची लहर आली जी आजवर सुद्धा थांबलेली नाही.

रहमान आणि मणिरत्नम या जोडीने पुढे बॉम्बे, दिल से, गुरु सारखे दर्जेदार सिनेमे दिले. काही गोष्टी या विधिलिखित असतात असा विश्वास हे वाचतांना बसतो.

कुणीच विचार केला नसेल चेन्नई  चा रहमान आणि मदुराई मधे जन्म घेतलेला मणिरत्नम हे पुढे जाऊन आंतरराष्ट्रीय दर्जाचे सिनेमे आणि संगीत बनवतील. स्वप्न बघून त्यामागे मेहनत घेणारे इतिहास घडवतात हे यांच्यासारख्या दिग्गजांकडे बघून शिकावं.

हे ही वाच भिडू.

Leave A Reply

Your email address will not be published.