‘निर्भया’ कुटूंबासाठी राहूल गांधींनी जे केलं ते सख्खा मुलगा देखील करत नाही…

दिनांक १६ डिसेंबर २०१२ रोजी दिल्लीतील मुनिर्का परिसरात निर्भया बलात्काराची घटना घडली होती. या अमानवीय घटनेच्या विरोधात संपूर्ण देश एकवटला होता.

सध्याच्या केंद्रिय मंत्री स्मृती इराणी यांनी तेव्हा राहूल गांधींना या प्रकरणावरून बांगड्या पाठवण्याची घोषणा देखील केली होती.

गल्ली पासून दिल्ली पर्यन्त मनमोहनसिंग सरकारविरोधात वातावरण तापलं होतं.

पण या प्रकरणात कॉंग्रेस पक्षाकडून कोणत्या गोष्टी घडल्या हे देखील पहावं लागतं. घटना घडल्यानंतर सरकारने निर्भयाला तातडीने एम्समध्ये दाखलं केले. सर्वोतोपरी उपचार करुन जीव वाचवण्याचा आटोकाट प्रयत्न केला जाऊ लागला. जेव्हा निर्भयाची तब्येत खालावू लागली तेव्हा एअर ॲम्ब्युलन्स मार्फत तिच्यावर पुढील उपचार करण्यासाठी पिडीतेला सिंगापूर येथे घेऊन जाण्यात आलं.

थोडक्यात निर्भयाचे प्राण वाचवण्यासाठी शक्य ते प्रयत्न कॉंग्रेस सरकारमार्फत करण्यात आले. मात्र दूर्देवाने २९ डिसेंबर रोजी निर्भयाचा मृत्यू झाला.

मृत्यू झाल्यानंतर तत्कालीन पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी ट्विट करून शोक संदेश देण्याची औपचारिकता पार पाडली नाही तर स्वत: पार्थिव स्विकारण्यासाठी विमानतळावर गेले.

शासन म्हणून आम्ही पिडीतेला न्याय मिळवून देऊ हे त्यांनी आपल्या कृतीतून दाखवून दिलं.

हाथरस चे प्रकरण झाल्यानंतर मुख्यमंत्री, पंतप्रधान किंवा कोणताही वरिष्ठ नेता पिडीतीचे घरी गेल्याचे, त्यांचे सांत्वन केल्याची बातमी आली नव्हती, तेव्हा मात्र खुद्द सोनिया गांधी सांत्वन करण्यासाठी पिडीतेच्या घरी गेल्या होत्या.

या नंतरची प्रमुख जबाबदारी होती ती म्हणजे निर्भयाच्या कुटूंबाचे पाठीमागे ठाम उभा राहण्याची.

ती जबाबदारी राहूल गांधी यांनी पार पाडली. राहूल गांधी काहीच न बोलल्याने या प्रकरणात राहूल गांधींवर टिका झाल्याचे मत २०१४ देशाचा चेहरा बदलणारी निवडणूक या पुस्तकात पत्रकार राजदीप सरदेसाई यांनी व्यक्त केले आहे.

निर्भयाची आई आशादेवी यांनी जाहीर मुलाखतीत सांगितलं होतं की,

या घटनेनंतर माझ्या मुलाच्या मनावर मोठा आघात झाला होता. तो निराशेत गेला होता. त्याला लष्करात जाण्याची इच्छा होती. तेव्हा राहूल गांधी यांनी व्यक्तिश: निर्भयाच्या भावाची भेट घेऊन १२ वीत असणाऱ्या सागरला शिक्षण संपल्यानंतर पायलटचे प्रशिक्षण घ्यावे व त्यासाठी आपण तुझ्या मदतीस असू असा शब्द दिला होता.

नुसता सल्ला किंवा शब्द न देता राहूल गांधी थांबले नाहीत तर त्यांनी सागरला सर्वोतोपरी मदत देखील केली.

१२ वीत असणाऱ्या सागरने CBSE ची परिक्षा दिल्यानंतर रायबरेलीच्या इंदिरा गांधी राष्ट्रीय उड्डाण ॲकेडमीत त्याला ॲडमीशन मिळवून दिले.

फक्त प्रवेश मिळवून देऊनच न थांबता निर्भयाच्या भावाच्या राहण्याच्या, जेवणाचा, शिक्षणाचा खर्च देखील त्यांनी व्यक्तिगत खर्चातून पुर्ण केला. या दरम्यान निर्भया केसची संबधित माहिती देखील ते घेत होते, पण त्याहून अधिक निर्भया कुटूंबासोबत सातत्याने संपर्कात राहून तिच्या भावाशी सातत्याने संपर्कात राहून त्याला स्वत:च्या पायावर उभा राहण्यासाठी प्रोत्साहन देत राहिले.

आपला मुलगा आणि आपचे कुटूंब हिम्मतीने या दुखत: प्रकरणातून बाहेर पडू शकलो असं निर्भयाची आई आशादेवी यांनी आपल्या मुलाखतीत स्पष्ट केलं होतं.

एक चांगल सरकार असण्या सोबत गरज असते एक चांगला माणूस असण्याची.

हे ही वाच भिडू.

Leave A Reply

Your email address will not be published.