राहूल गांधींच्या सोबत असणारी त्यांची हि भावी बायको नेमकी आहे तरी कोण ?

 

राहूल गांधी, पप्पू पप्पू म्हणतं गुजरातच्या विधानसभेनंतर देशभर हवा केलेला बॅचलर मुलगा. वय काहीका असणां लग्न झालं नाही म्हणजे बॅचलरच. आणि बॅचलर असला की मुलगाच याच न्यायानं सलमान पण मुलगाच आहे. असो तो विषय नाही विषय हा आहे कि, राहूल गांधीबरोबर असणारी हि युवती मिन्स दावा करण्यात येणारी त्यांची भावी बायको नेमकी कोण आहे ?

तर नेमकं कांड काय आहे ?

Screen Shot 2018 05 06 at 7.37.17 PM

वॉटस्अप विद्यापीठाच्या माहितीनुसार राहूल गांधींसोबत दिसणारी हि महिला रायबरेलीच्या आमदार आदिती सिंग असून त्या लवकरच राहूल गांधींसोबत विवाह बंधनात अडकणार आहेत. त्याचसोबत भावी नवरा नवरीला शुभेच्छा देणारे मॅसेज देखील असून दाखला म्हणून सोनिया गांधी, राहूल गांधी, अदिती सिंग आणि अखिलेश सिंह यांचा कौटुंबिक फोटो देखील शेअर केला जात आहे.

Screen Shot 2018 05 06 at 7.37.02 PM
आदिती सिंग कोण आहेत ?

आदिती सिंग या खरच रायबरेलीच्या आमदार आहेत. त्यांचे वडिल अखिलेश सिंह कॉंग्रेसचे एकनिष्ठ म्हणून ओळखले जातात. रायबरेलीतून सलग पाच वेळा आमदार म्हणून ते निवडून आले आहेत. २०१७ च्या निवडणुकीत त्यांनी आपली सिट कॉंग्रेसच्या नियमानुसार आपल्या मुलीसाठी रिकामी केली. अदिती सिंग २०१७ साली कॉंग्रेसच्या आमदार म्हणून निवडून आल्या. त्यांच इतर क्रेडिट म्हणजे त्या शिक्षणासाठी बाहेर होत्या. अमेरिकेतल्या ड्यूक युनिव्हर्सिटीतून मॅनेजमेंटच शिक्षण पुर्ण करुन त्या भारतात आल्या आणि आमदार झाल्या इतका सोप्पा पॉलिटिकल संघर्ष त्यांचा राहिला आहे.

मग साखरपुड्याचं काय ?

डिटेलमध्ये गेल्यावर अस कळलं की येत्या निवडणुकी आधी राहूल गांधीनी उरकावं म्हणून विरोधकांनी कंबर कसली आहे. राहूल लवकर संसारात अडकून पडावे अशी विरोधकांची खेळी आहे. त्यातूनच हे कांड करण्यात आलं आहे. अखिलेश सिंह आणि गांधी परिवार यांचे कौंटुंबिक संबध. आत्ता हे संबध डिफाईन करण्यासाठी दोन चार वर्षातून का होईना गांधी परिवाराची भेट घेणं गरजेचं असतं. त्यातून सिंह यांच्या परिवाराने त्यांची भेट घेतली. त्यापुर्वी अदिती सिंह आणि राहूल यांचे सार्वजनिक कार्यक्रमातले फोटो उपलब्ध होतेच. मग या सर्व फोटोंच एकत्रीकरण करुन सुंदर अशी अफवा रचण्यात विरोधकांना यश आलं.

 

आदिती सिंह याचं काय मत आहे ?

Screen Shot 2018 05 06 at 7.37.30 PM

आदिती सिंह यांच्यापर्यन्त या अफवा पोहचल्यावर आदिती सिंह यांच्या डोळ्यासमोर निश्चितच भावी पंतप्रधानपदाची स्वप्न फुलली असणार पण त्यांनी मनावर दगड ठेवून असलं खरचं काय नाय वो ? तुम्हाला सांगितल नसतं का ? असा सुर आवळलां.
इथपर्यन्त ठिक होतं पण यापुढं आदिती सिंह म्हणाल्या, “ राहूल माझे मानलेले भाऊ आहेत.” च्या आयच्या गावात डायरेक्ट भाऊ. नाही म्हणाल्या तिथपर्यन्त ठिक होतं पण राहूल गांधींना थेट भाऊ करण्यात कोणत सुख मिळालं हे त्यांनाच ठावूक.

 

राहूल गांधी काय म्हणाले ?

आत्ता आदिती सिंह यांनी ते माझे भाऊ आहेत सांगितल्यावर राहूल गांधी काय बोलतील अस वाटतं का ? या सगळ्या प्रकरणावर राहूल गांधी यांनी गप्प बसल्यालं बरय नाहीतर उद्या पाहूण्यात दंगा नको म्हणून शांत रहायचा उत्तम स्टॅण्ड घेतलां.

1 Comment
  1. College Catta says

    खुप छान! लिहण्याची पद्धत आवडली.

Leave A Reply

Your email address will not be published.