युवराज राहुल गांधी यांची ‘युवा काँग्रेस टीम’ तयार होण्यापूर्वीच विस्कटत आहे….

माजी खासदार आणि अखिल भारतीय महिला काँग्रेसच्या माजी अध्यक्षा सुष्मिता देव यांनी मागच्या आठवड्यात काँग्रेस सोडली. त्यांनी पक्ष सोडल्यानंतर खुद्द काँग्रेसच्या नेत्यांना देखील आश्चर्य वाटलं नसणार. कारण वृद्धांचा पक्ष म्हणून कायम बोललं जाणाऱ्या पक्षात युवा सदस्य म्हणून पक्ष सोडून जाणाऱ्यांच्या यादीत त्या पहिल्याच नाहीत.

याआधी प्रियंका चतुर्वेदी, ज्योतिरादित्य सिंधिया, प्रद्योत माणिक्य देववर्मा, जितिन प्रसाद यांच्या यादीत आता सुष्मिता देव हे नवीन नाव जोडलं गेलं आहे. त्यांनी कोणत्याही भावनिकतेत किंवा सिद्धांतांमध्ये न अडकता तृणमूल काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे.

दुसऱ्या बाजूला असमाधानी सचिन पायलट, अनिश्चिततेच्या वाटेवरचे दिपेंदर हुड्डा आणि सध्या मुख्य प्रवाहापासून लांब असलेले मिलिंद देवरा हे सगळे नेते देखील आगामी काळात काँग्रेसला रामराम करू शकतात असं बोललं जातं आहे. त्यामुळेच सध्या राहुल गांधी यांच्या स्वप्नातील तरुण आणि आक्रमक नेत्यांची युवा काँग्रेस संकटात आहे असं म्हंटल्यास वावगं ठरणार नाही.

पण या मागची नेमकी कारण काय आहेत?

तर यातील पहिलं कारण म्हणजे सत्तेपासून लांब असलेला पक्ष :

ज्योतिरादित्य सिंधिया, सुष्मिता देव, जितीन प्रसाद अशा सगळ्यांना राजकारण आणि राजकारणाचे धडे हे सगळे वारस्यामध्ये मिळाले होते. त्यामुळे त्यांना पक्षाच्या मुख्य वर्तुळात पोहोचायला नक्कीच सोपं झालं. मात्र राजकारण हे जितकं जनसेवेचे माध्यम आहे तेवढंच ते सत्ता मिळवण्याचं देखील साधन आहे.

मात्र अडचण अशी आहे कि, काँग्रेस पक्ष मागच्या ७ वर्षांपासून सत्तेतून बाहेर आहे. त्यामुळेच ज्या ज्या तरुण नेत्यांनी अलीकडच्या काळात पक्ष सोडला त्या सगळ्यांना वाटत होते कि, जर कायम विरोधातच बसायचं असेल तर राजकारणात राहून उपयोग काय?

सोबतच पक्षात असा एक मतप्रवाह आहे जो असं मानतो कि काँग्रेस आज सत्तेतून बाहेर आहे, पण ती परत मिळवण्याचा देखील प्रयत्न केला जात नाही. उलट पक्षाची परिस्थिती आणखी खराब होतं आहे.

दुसरं कारण म्हणजे पक्षात मिळत नसलेली संधी :

असं म्हणतात कि राजकारणात पक्षाशी प्रामाणिक राहणं आणि वाट बघण्याची भूमिका घेणं या गुणांना खूप महत्वाचं मानलं जातं. यामुळे एक ना एक दिवस संधी नक्की मिळते. पक्ष तुमच्या कार्याची दखल घेतो. पण अलीकडच्या काळातील प्रॅक्टिकल राजकारणात हा विचार काहीसा मागे पडलेला दिसून येतो.

त्यामुळे प्रॅक्टिकल राजकारणात युवा नेते प्रॅक्टिकल विचार करतात. त्यांना तरुण वयातच संधी हवी असते. पण काँग्रेस सत्तेपासून दूर असल्यामुळे पक्षात नव्याने येणाऱ्या आणि सध्या पक्षात असलेल्या तरुणांना संधी देण्यावर काँग्रेसला मर्यादा असल्याचं दिसून येते. 

तृणमूल मध्ये गेल्यानंतर आता सुष्मिता यांना त्रिपुरामध्ये पक्षाचे प्रभारी पद मिळण्याची दाट शक्यता आहे. कारण पुढच्या वर्षी त्रिपुराच्या विधानसभेच्या निवडणुका आहेत. तर ज्योतिरादित्य सिंधिया यांनी काँग्रेस सोडून भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर त्यांना केंद्रात मंत्रिपद मिळाले.

पक्षात जेष्ठ नेत्यांमुळे केलं जाणार दुर्लक्ष :

या तरुण नेत्यांचं पक्ष सोडण्याचं आणखी एक कारण सांगितले जाते ते म्हणजे काँग्रेसमध्ये जेष्ठांना असलेलं महत्व आणि त्यामुळे केले जाणारे दुर्लक्ष. उदाहरण घ्यायचं झालं तर पुन्हा एकदा सुष्मिता यांचं घेऊ शकतो. या वर्षीच्या आसाम विधानसभा निवडणुकांमध्ये उमेदवारांच्या निवडप्रक्रियेत पक्षाने त्यांचा कोणताही सल्ला घेतला नसल्याचा दावा केला जातो.

यातून एकप्रकारे पक्षातील तरुण नेत्यांकडे जेष्ठ नेत्यांमुळे दुर्लक्ष केलं जात असल्याचं दिसून आलं होतं. त्यामुळे देखील सुष्मिता देव नाराज असल्याचं बोललं गेलं होतं.

सोबतच महिला अध्यक्ष म्हणून सुष्मिता देव यांचा कार्यकाळ देखील संपत आला होता. त्यामुळे आता पुढे काय हा प्रश्न त्यांना पडला असणार. कारण काँग्रेसमधील वरिष्ठ नेते हे अनेकदा मंत्रिपद आणि मुख्यमंत्री पद भुषवून बसले आहेत. मात्र तरुण नेते असं हातावर हात ठेऊन बसू शकत नाहीत, हे अलीकडील राजकारणाचं गमक आहे.

कपिल सिब्बल यांचं वक्तव्य बरंच बोलकं आहे….

जुलै २०१८ मध्ये राहुल गांधी यांनी दिल्लीच्या हॅबिटॅट सेंटरमध्ये महिला पत्रकारांशी संवाद साधला होता. या संवाद बैठकीचे आयोजन पक्षातील तीन महिला सदस्यांनी केले होते. यात होते, प्रियंका चतुर्वेदी, सुष्मिता देव आणि दिव्या स्पंदन. मात्र आज प्रत्यक्षात या तिघी देखील तीन वर्षानंतर पक्षातून बाहेर आहेत. हि परिस्थिती बरंच काही सांगून जाते.

याबाबत अलीकडेच कपिल सिब्बल यांनी केलेलं वक्तव्य खूपच बोलकं होतं. त एम्ह्नाके होते कि,

पार्टीने अपनी आंखें पूरी तरह बंद’ कर रखी हैं.

हे हि वाच भिडू

Leave A Reply

Your email address will not be published.