राहूल गांधी RSS सारखी संघटना उभा करण्याच्या तयारीत ? 

पप्पू म्हणणाऱ्या राहूल गांधीना गुजरात आणि कर्नाटकच्या पराक्रमानंतर सिरीयस घेण्यास सुरवात केली आहे. अस आम्ही नाही तर कॉंग्रेसचेच नेते म्हणतात. आम्ही आपलं नेमका विजय कसा झाला विचारलं तर मतांची टक्केवारी आमच्या तोंडावर फेकण्याचं काम केलं जातं. 

असो तर राहूल गांधींनी सध्या फुल्ल फार्मात आहेत याबद्दल कोणी शंका घेण्याचं कारण नाही इतकचं. आत्ता कर्नाटकात हातात आलेला घास राहूल गांधीनी पळवून नेल्याचा आनंद होणं स्वाभाविकच होतं. हाच आनंदउत्सव साजरा करताना आपण कुठं चुकत आहे आणि त्याचबरोबर येणाऱ्या २०१९ ला आपल्या प्रचाराची यंत्रणा नेमकी कशी असावी याचा विचार करण्यासाठी राहूल गांधी आणि प्रियंका गांधी यांनी एक मिटींग बोलवली होती. याच मिटींगमधील बातमी लिक झाली आणि दिल्लीतील वर्तमानपत्रात झळकू लागली. 

याला हिंदीत कहिसुनाई म्हणत असल्यानं यात तथ्य किती हे सांगण अवघड असलं तरी झालेल्या चर्चेचा जो घोषवारा दिल्लीच्या वर्तमानपत्रांमध्ये मांडण्यात आला तोच आम्ही तुमच्यापर्यन्त पोहचवत आहोत. 

सातत्याने होणाऱ्या पराभवाची कारणं काय असावीत याची विचारणा राहूल यांनी करताच सोशल वॉर रुममधील तज्ञांनी आपआपली मत राहूल गांधी यांना सांगण्यास सुरवात केली. पराभवाचं प्रमुख दोन कारण राहूल यांच्यासमोर मांडण्यात आली होती. 

पैकी एक कारण म्हणजे, प्रत्येक राज्यात पक्षाकडे नसणारं दमदार नेतृत्व आणि दूसरं कारण, प्रत्यक्ष मैदानावर काम करणारी संघटना. 

भारतीय जनता पक्षाच्या जिंकण्याचा अहवाल मांडण्यात आल्यानंतर दोन प्रमुख निकषांवर सर्वाच एकमत झालं असल्याचं सांगण्यात आलं. या दोन्ही ठिकाणी कॉंग्रेस कोणती भूमिका घेवू शकतो याची चाचपणी केल्यानंतर २०१९ पर्यन्त राज्यस्तरावर कोणतही दमदार नेतृत्व उभा करणं शक्य होणार नसल्याचं मत व्यक्त करण्यात आलं. त्यामुळे प्रत्यक्ष मैदानावर कोणत्या प्रकारे संघटना उभा करता येवू शकते याची चाचपणी राहूल यांनी केल्याच सांगण्यात आलं. 

सध्या भारतीय जनता पक्ष जोरदार असताना त्यांना बंगाल आणि केरळ मध्ये शिरकाव करता आलेला नाही. त्याचं मुख्य कारण म्हणजे बंगालमध्ये तृणमुल कॉंग्रेसच केडर बेस असणार राजकारण. तृणमुल कॉंग्रेसचे कार्यकर्ते संघाच्या शिरकाव करु पाहणाऱ्या कार्यकर्त्यांना उत्तर देत असतात तिच परस्थिती केरळ मध्ये देखील अाहे. केरल मध्ये डाव्या पक्षाचं केडर बेस राजकारण पहिल्यापासून संघासाठी डोकेदुखीचा भाग बनलं आहे. या दोन्ही राज्यांमध्ये मोदी लाटेत सुद्धा भाजपला शिरकाव करता आला नाही त्याचं मुख्य कारण या दोन्ही पक्षाच्या केडर बेस राजकारणाला दिलं जातं. 

याबाबत त्यांच्या वॉर रुममधील एका व्यक्तीने अस मत मांडल की, जेव्हा राहूल गांधीनी सोशल मिडीयाद्वारे सक्रिय विरोध करण्याचा निर्णय घेतला तेव्हा कॉंग्रेस भाजपच्या जवळपास देखील नव्हती. सोशल मिडीयावर आप आणि भाजप या दोनच पक्षांचा प्रभाव होता. मात्र राहूल यांनी सोशल रुम निर्माण करत विरोधाची दिशा ठरवली. आज सोशल मिडीयावर असणारा प्रभाव पाहता एखादी संघटना निर्माण करणं अशक्य आहे अस नाही. 

भारतीय जनता पक्ष आणि संघ या दोन्ही वेगवेगळ्या गोष्टी आहेत. स्वयंसेवक असेल तर भाजपचा कार्यकर्ता असावाच असा नियम नाही. जेव्हा संघ सांगेल तेव्हाच स्वयंसेवक भाजपसाठी मैदानात उतरतात. मुळात विचारांवर आधारित केडर बेस राजकारण निर्माण करण्यात यश मिळालं तर फक्त राजकिय महत्वकांक्षेपोटी राजकारणात येणाऱ्या व्यक्तीशिवाय एक चांगली वैचारिक फौज निर्माण करता येईल अस मत या मिटींगमध्ये मांडण्यात आलं.

एकेकाळी मोठी असणारी सेवादल सारखी संघटना अथवा कॉंग्रेस युथ च्या धर्तीवर याचा अंदाज घेण्याची रणनिती राहूल यांनी आखल्याचं सांगण्यात येत आहे. 

Leave A Reply

Your email address will not be published.