ABP माझाचे पत्रकार राहूल कुलकर्णी बळीचा बकरा ठरलेत का ?

ABP माझा आणि पत्रकार राहूल कुलकर्णी हे सध्या हॉट टॉपिक आहे. थोडक्यात हे प्रकरण सांगायचं तर,

मुंबईमध्ये दिनांक १४ एप्रिल रोजी ४ च्या सुमारास वांद्रे पश्चिम येथे मजूरांचा मोठा जमाव गोळा झाला. हा जमाव गोळा होण्यामागे जी विविध कारणे होते त्यामधील एक कारण म्हणजे ABP माझाचे पत्रकार राहूल कुलकर्णी यांनी दिलेली बातमी असे सांगण्यात आले. त्यावरून राहूल कुलकर्णी यांना अटक देखील करण्यात आली. 

सर्वात पहिला या संपुर्ण प्रकरणाकडे कस पहावं यासाठी बोलभिडू काही निकष मांडत आहे

या प्रकरणाकडे पुर्वग्रहदूषितपणे पाहू नये. म्हणजे ABP चॅनेलबद्दल असणारं चांगल वाईट मत. पत्रकार राहूल कुलकर्णी यांच्याबद्दल असणारं चांगल वाईट मत. या गोष्टीतून बाहेर पडून प्रकरण पहावं.

राहूल कुलकर्णी यापूर्वी खूप चांगले वार्तांकन करत आहेत त्यामुळे ते चुक करणं अशक्य आहे किंवा राहूल कुलकर्णी यापुर्वी देखील खोडसाळपणा करत आलेले आहेत त्यामुळे ते चुकीचेच आहेत. अशा दोन्ही बाजूने पुर्वमत तयार करणं चुकीचं ठरणार आहे.

एकंदरित प्रकरण आणि राहूल कुलकर्णी बळीचा बकरा ठरत आहेत का? हे समजून घेण्यासाठी सर्व गोष्टी मुद्यांनुसार पहाव्या लागतील.

१) पहिला मुद्दा बातमीचा, ही बातमी बरोबर होती, चुकीची होती की अफवा होती.

पत्रकार राहूल कुलकर्णी यांनी दिलेली बातमी खालीलप्रमाणे होती.

इतक्या कठीण काळात,abp माझा एखाद्या सिरीयस बातमीला केवळ प्रश्नचिन्ह लावून बिनधास्त telecast करतय.हा लॉकडाऊन मध्ये अडकलेल्या मजुरांच्या जीवाशी,दिवसरात्र फिल्ड वर काम करत असणाऱ्या पोलिसांच्या जीवाशी,हॉस्पिटलमध्ये झुंजत असणाऱ्या डॉक्टर नर्सेस च्या जीवाशी खेळ नाहीये का..? नीच साले.खांडेकर राजीनामा द्या. #Banabp_majha

Mohasin A. Shaikh ಅವರಿಂದ ಈ ದಿನದಂದು ಪೋಸ್ಟ್ ಮಾಡಲಾಗಿದೆ ಮಂಗಳವಾರ, ಏಪ್ರಿಲ್ 14, 2020

 

या बातमीमध्ये राहूल कुलकर्णी म्हणतात,

आपल्याकडे जे आत्ता रेल्वे विभागातील सुत्रांनी दिलेले पत्र आहे. त्या पत्रानुसार दररोज व्हिडीओ कॉन्फरंसिंग द्वारे रेल्वे मंत्र्यांशी व रेल्वे बोर्डांशी वेगवेगळ्या डिव्हीजनमधले लोक संपर्क साधतात.

या पत्रानुसार, 

प्रत्येक डिव्हीजनला त्या त्या डिव्हीजनला किती मजूर अडकले आहेत त्याचा डेटा देण्यात आला आहे. त्या मजूरांना त्यांच्या त्यांच्या गावाकडे परत पाठवण्यासाठी जनसाधारण विशेष ट्रेन सुरू करायच्या आहेत.

त्याचे तपशील पण गेलेले आहेत. 

याचा दूसरा अर्थ असा की, एकीकडे लॉकडाऊन आज वाढलं तर त्याबरोबरच वेगवेगळ्या शहरात मजूर अडकून आहेत त्या मजूरांना शहराच्या बाहेर काढण्याच्या दृष्टीने वेगळा प्लॅन बनलेला आहे. 

मजूर आहेत कामगरा आहेत त्यांना त्याच्या ठिकाणावरून काढून जनसाधारण रेल्वे सुरू करण्यात येणार आहेत. 

एखादी बातमी संपुर्ण कधी होते याबाबत जेष्ठ पत्रकार सुनिल तांबे सांगतात की,

ती बातमी ताजी असेल, पुर्ण असेल आणि सत्य असेल तर ती बातमी परिपुर्ण आहे, योग्य आहे असे म्हणावे लागते.

हे तीन निकष आपण राहूल कुलकर्णी यांनी दिलेल्या बातमीला लावून पाहू.

बातमी ताजी आहे का ?

ही बातमी दिनांक १४ एप्रिल रोजी सकाळी देण्यात आली. बातमीचा आधार अथवा सोर्स म्हणून रेल्वेच्या एका डिव्हिजनने दिलेले पत्र आधार मानले गेले. पत्रकारांना मिळालेल्या सोर्सचा आधार घ्यायचा झाल्यास ही बातमी ताजी आहे हे नक्की होतं.

बातमी पुर्ण आहे का ?

बातमी पुर्ण आहे हे कस ठरवायचं असतं तर बातमी कुठे संपते.  अर्थात रेल्वे सुरू होणार असल्यास त्या कुठून सुरू होणार. कुठे थांबणार. कधी सुरू होणार.कशा सुरू होणार याची सविस्तर माहिती बातमीत देणे.

या गोष्टी बातमीत कुठेही देण्यात आलेल्या नसल्याने बातमी पुर्ण आहे अस म्हणता येत नाही.

आत्ता तिसरा मुद्दा उरतो तो म्हणजे बातमी सत्य आहे का ?

याबाबत APB माझाचे म्हणणे आहे की, ही बातमी रेल्वे विभागातील पत्रावर आधारित असून त्याद्वारे बातमी देण्यात आली आहे.

याबाबत पत्रकार अजित वायकर यांना बोलभिडूने विचारले की, अशा अंतर्गत पत्राच्या आधारावर बातमी करता येते का? तर अशा प्रकारे बातमी करता येवू शकते असे उत्तर मिळाले.

पण

पत्र आणि पत्रकार देत असणारी बातमी यात साम्य हवं. वरती राहूल कुलकर्णी काय म्हणाले ते आम्ही दिलेले आहे. खाली रेल्वेच्या विभागातील पत्र देत आहोत. या पत्रात एक विभाग दूसऱ्या विभागाकडे अशा रेल्वे सुरू करण्याचा प्रस्ताव ठेवत आहे. अर्थात तो प्रस्ताव विचाराधीन आहे. त्यावर हो किंवा नाही असा दोन्हीप्रकारे खुलासा होवू शकतो.

मात्र राहूल कुलकर्णी आपल्या बातमीमध्ये,

  • मजूरांना शहराच्या बाहेर काढण्याच्या दृष्टीकोनातून प्लॅन बनलेला आहे.
  • मजूर आहेत कामगारांना त्याच्या ठिकाणावरून काढून जनसाधारण रेल्वे सुरू करण्यात येणार आहेत. 

बनलेला आहे, सुरू करण्यात येणार आहेत अशी पुर्ण झाल्याची वक्तव्य वापरतात. पत्राच्या आधारे असणारी बातमी असा प्रस्ताव देण्यात आला आहे इथे संपते. मात्र राहूल कुलकर्णी आपल्या बातमीत प्लॅन बनलेला आहे. जनसाधारण रेल्वे सुरु करण्यात येणार आहे अशी वाक्य वापरतात,

त्यामुळे ही बातमी खोटेपणाकडे झुकते. 

Screenshot 2020 04 16 at 3.50.55 PM

अनेक मान्यवर पत्रकारांसोबत बोलताना त्यांनी सांगितलं की बातमीच्या मेरीट बद्दल चर्चा व्हायला हवी. बातमी चुकीची असल्यास तशा प्रकारचा गुन्हा संपादक आणि वार्ताहर दोघांवर देखील होतो.

लक्षात घ्या संपादक यांच्यावर देखील असा गुन्हा दाखल होतोच विशेष म्हणजे संपादकच सर्वाधिक जबाबदार राहतात.

आत्ता दूसरा मुद्दा राहतो तो या बातमीचा आणि वांद्रे येथे झालेल्या गर्दीचा.

 

द वायर हिंदी यांनी दिलेल्या बातमीनुसार राहूल कुलकर्णी यांना इंडियन पिनल कोड कलम 188, 269, 270 और 117 नुसार अटक करण्यात आली आहे. 

कलम २६९/२७० नुसार, 

अशी गोष्ट करणे ज्यामुळे संक्रमण रोगाचा फैलाव करण्यास मदत होईल.

कलम ११७ नुसार 

दहा किंवा दहा हून अधिक व्यक्तिंना अपराध करण्यासाठी प्रवृत्त करणे. ( याचाच अर्थ किती मोठ्या संख्येने जमाव जमला हे महत्वाचं नसून दहा हून अधिक व्यक्ती जरी अशा ठिकाणी एका बातमीमुळे गोळा होत असतील तरी ११७ नुसार सदरची कारवाईस पात्र असेल)

कलम १८८ नुसार

Dicobedience to order duly promulgated by public servant

अर्थात सरकारी सेवकांनी काढलेल्या आदेशाची अवज्ञा करणं. या कलमात असही सांगण्यात आलं आहे की,  यह आवश्यक नहीं हैं कि अपराधी का आशय अपहानी उत्पन्न करने का हो या उसके ध्यान में यह हो की उसकी अवज्ञा करने से अपहानी होना संभाव्य है. यह पर्याप्त है की जिस आदेश की अवज्ञा करता है उस आदेश का उसे ज्ञान हैं.

राहूल कुलकर्णी यांच्या बातमीमुळे वांद्रे या ठिकाणी गर्दी गोळा झाली का? या प्रश्नाचे उत्तर शोधण्याअगोदर त्यांच्यावर कोणत्या कलमांद्वारे कारवाई करण्यात आली आहे हे पाहणं आवश्यक ठरत.

यामध्ये दहाहून अधिक लोक अपराध करण्यासाठी एकत्र येतील अस कृत्य करणं, सरकारी आदेशाची अवज्ञा करणं आणि विशेष म्हणजे संक्रमण रोग फैलावला जावू शकतं अस कृत्य करणारे कलम दाखल करण्यात आलेले आहेत.

यानुसार पोलीस तपासात वरील गोष्टी निष्पन्न होतीलच. तुर्तास

ABP माझा चे संपादक राजीव खांडेकर यांच्या मते,

  • आमच्या बातमीमुळे एकाच ठिकाणी कशी काय गर्दी जमली ?
  • बातमीमुळे गर्दी जमली असती तर ती महाराष्ट्राच्या प्रत्येक स्टेशनवर जमली असती

बातमी चुकीची होती हे सांगणारे अनेक वरिष्ठ पत्रकार देखील फक्त राहूल कुलकर्णी यांच्यामुळेच गर्दी जमली हे मान्य करत नाहीत. अचानकपणे आलेल्या गर्दीमागे अनेक कारणे असू शकतात अस सांगतात.

पण या शंभर कारणांपैकी राहूल कुलकर्णी आणि ABP माझाची बातमी देखील असू शकते ही शक्यता देखील नाकारता येत नसल्याचं सांगण्यात येतं.

रेल्वे सुरु होणार अशी अफवा पसरल्याची माहिती व याच अफवेमुळे लोक गोळा झाले हे गृहितक खरे धरल्यास ही अफवा कुठून पसरली याचा मुख्य सोर्स काय याचा विचार करावा लागतो.

या गृहितकापर्यन्त पोहचण्याच काम पोलीसांच असून ते त्यांच काम करतील व या तपासापुर्वीच राहूल कुलकर्णी यांना अटक करणे हे कठोर निर्णय असल्याचं स्पष्टपणे दिसून येतं.

थोडक्यात राहूल कुलकर्णी यांना बळीचा बकरा करण्यात येत आहे का?

या गोष्टीत खालील निष्कर्ष निघतात. 

  • राहूल कुलकर्णी यांची बातमी पुर्ण नव्हती. प्रस्ताव संमत झाल्याप्रमाणे ती सांगण्यात आली. त्यामुळे बातमी चुकीची होती अस सांगण्यात येत . बातमीच्या मेरीटवर चर्चा व्हावी व त्या संदर्भातून संपादक देखील तितकेच जबाबदार आहेत.
  • गर्दी गोळा होण्यास अनेक घटक कारणीभूत ठरले असतील ज्याचा तपास पोलीस यंत्रणा करत आहेत. या अनेक कारणांपैकी एक कारण राहूल कुलकर्णींची बातमी असू शकते का? ही गोष्ट पोलीस तपासात निष्कर्ष काढणारी आहे.
  • तुर्तास बातमीचे मेरीट हा स्वतंत्र अभ्यासाचा विषय आहे व राहूल कुलकर्णी यांच्या बातमीमुळे गर्दी जमली हा स्वतंत्र तपासाचा विषय आहे इतकेच स्पष्ट होते.
  • राहूल कुलकर्णी यांचा मुद्दा पुढे करुन मजूरांचे प्रश्न, इतक्या मोठ्या संख्येने जमाव कोणत्या मार्गाने आला, तो इथे येईपर्यन्त प्रशासनाला कोणतीच कल्पना कशी आली नाही, सुरत सह देशाच्या विविध ठिकाणी असे मजूर रस्त्यांवर आले आहेत ही वस्तुस्थिती नाकारून चालणार नाही. त्यामुळे एकमेव राहूल कुलकर्णी या घटनेला जबाबदार असल्याची शक्यता कमी वाटते.

सौरभ पाटील 

आपल्या मतांसाठी बोलभिडूचे व्यासपीठ खुले असून आपली प्रतिक्रिया/ प्रतिवाद आपण आम्हास मेल करु शकता.

3 Comments
  1. संजोग पिसे says

    काळाच्या ओघात स्पर्धात्मक वार्तांकन करण्याचे प्रमाण फार वाढले आहे. हातात आलेलं पत्र योग्य माहिती डेट असताना ती चुकीची कशी सांगितली गेली. अशाप्रकारे टोकाची आणि धोक्याची पत्रकारिता करताना जशी “ही बातमी तुमच्या साठी सर्व प्रथम……. चॅनेल वर आम्ही घेऊन आलोय” असे उजळ माथ्याने सांगून त्याचा क्रेडिट घेतात त्याचा प्रमाणे चुकीची बातमी दिली तर जबाबदारीही घ्यावी लागेल.. आता राहिला प्रश्न फौजदारी कारवाई चा त्यांनी बातमी प्रसिद्ध केली, लोक गोळा झाले भा दं सं अन्व्ये गुन्हा करण्यास आवश्यक असलेल्या क्रिया तुम्ही केल्या व त्याचा परिणामही झाला.. आता चार्जशीट आल्यावर वेळ त्यांची असेल हे सिद्ध करायची कि आमच्या वार्तांकनामुळे गर्दी जमा झाली नाही. यात कोणताही भावनिक मुद्दा तपासाला जाणार नाही आणि आरोपीचं बॅकग्राउंड पाहिलं जाणार नाही. मुळात हा वाद आता सुप्रीम कोर्टात पर्यंत जाणार आहे. त्यामुळे यात सुप्रीम कोर्टात नक्कीच लांडे मार्क जजमेंट देईल जे या पुढे वापरण्यात येईल.

  2. रामेश्वर जाधव says

    मी पण पूर्ण लेखन वाचले
    या बातमी साठी व लोकं जमवण्यासाठी राहुल कुलकर्णी तर दोषी आहेच परंतु त्या बरोबर विनय दुबे, गृहमंत्री, व मुख्यमंत्री सुद्धा दोषी आहेत
    पोलिसांनी एवढी गर्दी जमुच का दिली ?
    धारा 144 लागू असताना 5 पेक्ष्या जास्त लोकं जमले त्याचवेळी का पांगावले नाही.
    मुख्यमंत्र्यांना त्यांच्या गुप्तचर विभागाने याची कल्पना दिलीच असेल परंतु मुख्यमंत्री गाफील का राहिले
    गृहमंत्री, काय करत आहे.
    म्हणून तर राहुल कुलकर्णी यांना बळीचा बकरा केला असे वाटते

  3. सुशिलकुमार उटगे says

    किती खोल माहिती आहे , raw एजंट ला सुद्धा एव्हडी माहिती नसेल 😂😂😂😂😂कुलकर्णी साहेब तुमचं काम चांगलं आहे आम्ही तुमच्या पाठीशी आहोत . वांद्रे पोलिसांनी कोर्टात कुलकर्णी यांना अटक ही चुकीची असल्याची कबुली . बोलभिडू you don’t have level of analysis .shame on you 👎👎👎👎

Leave A Reply

Your email address will not be published.