राहुल रॉयसाठी एकदा 60 लाख खर्चून मायकल जॅक्सनच्या टीमला शूटिंगसाठी बोलावून घेतलं होतं…

90 चा काळ हा बऱ्याच तरुण पिढीला सदासर्वकाळ आठवत असतो. त्याकाळात बॉलिवुड सुद्धा भारी भारी गाणी देऊन लोकांचं मनोरंजन करत होतं. सलमान खान, शाहरुख खान ही नवी पिढी सिनेमात हवा करत होती पण या सगळ्यांना टक्कर द्यायला एक हिरो आला होता तो म्हणजे राहुल रॉय. राहुल रॉयला आपण सगळे ओळ्खतोच मुळात आशिकी या सिनेमासाठी. आशिकीने त्याला इतकं स्टारडम मिळवून दिलं होतं की त्या काळचा बॉलिवूडचा तो सगळ्यात गाजलेला आणि सुपरहिट हिरो ठरला होता. पण याच राहुल रॉयच्या सिनेमासाठी महेश भट्ट यांनी मायकल जॅक्सनला बोलावलं होतं.

आशिकी सिनेमानंतर राहुल रॉयला काय हिट सिनेमा देता आला नाही. वन हिट वंडरचा टॅग त्याला लागल की काय असं वातावरण झालं होतं पण त्याच वेळी त्याच्या डबघाईला आलेल्या करियरला सावरायला आला जुनुन हा सिनेमा. हा जुनुन सिनेमा आशिकी नंतरचा राहुल रॉयच्या आयुष्यातला दुसरा हिट सिनेमा ठरला. हा सिनेमा हॉलिवूडचा रिमेक होता. 1981 मध्ये एक हॉलीवूड सिनेमा आला होता अ अमेरिकन वेअरऊल्फ इन लंडन या नावाने. हा एक हॉरर कॉमेडी सिनेमा होता.

अ अमेरिकन वेअरऊल्फ इन लंडन हा सिनेमा लिहिलेला आणि दिग्दर्शित केलेला होता जॉन लँडिसने. हॉरर कॉमिक असल्याने प्रोड्युसर त्या स्क्रिप्टवर शांत राहिला होता कारण हा सिनेमा चालेल की नाही अशी अनेक प्रश्नचिन्ह नाचत होती. 1969 सालीच जॉन लँडिंसने स्क्रिप्ट लिहून टाकली होती पण प्रोड्युसर मिळत नव्हता शेवटी 1981 ला सिनेमा रिलीज झाला. लोकांनी या सिनेमाला चांगलंच उचलून धरलं. या सिनेमाला बेस्ट मेकपचा ऑस्कर मिळाला होता.

आशिकी नंतर राहुल रॉयचं करियर डळमळू लागलं होतं आणि त्याच करियर सावरायला आले महेश भट्ट. त्यांनी जुनुन हा सिनेमा राहुल रॉयला सोबत घेऊन करायचं ठरवलं. जुनुन मध्ये टी सिरीजकडून गाणी करून घेतली गाणीसुद्धा चांगलीच वाजली.

आता या सिनेमात मायकल जॅक्सन कसा काय आला ?

1982 ला मायकल जॅक्सनचा थ्रिलर अल्बम प्रसिद्ध झाला होता. तो व्हिडिओ भरपूर गाजला आता भलेही तो व्हिडिओ तुम्ही पाहिला नसेल पण त्यातील एक जिफ / गिफ् म्हणजे मायकल जॅक्सन पॉपकॉर्न खाताना दिसतो तो अल्बम म्हणजे थ्रिलरवाला अलबम. थ्रिलरच्या म्युझिक व्हिडिओमध्ये एक सीन आहे की मायकल जॅक्सनचं रूपांतर एका लांडग्यात होतं. आता तो सीन भरपूर गाजला होता. ज्या टीमने मायकल जॅक्सनचा तो सीन चित्रित केला होता त्याच टीमला महेश भट्टने जुनुन साठी बोलावून घेतलं.

जुनुन मधला तो सीन चित्रित करण्यासाठी 60 लाखांचा खर्च आला होता. मायकल जॅक्सनच्या टीमला महेश भट्टने बॉलिवूडमध्ये आणलं हीच तेव्हा मोठी चर्चेची गोष्ट ठरली होती. पण जुनुन हा सिनेमा फ्लॉप होता का हिट होता, त्याने किती पैसे कमावले, किती बजेट होतं याची कुठेही वाच्यता झाली नाही पण राहुल रॉयसाठी खास मायकल जॅक्सनची टीम आली याच गोष्टीची जास्त हवा झाली होती.

हे ही वाच भिडू :

Leave A Reply

Your email address will not be published.