राहून गेलेली बातमी : कॅगच्या अहवालानुसार सियाचीनमधील सैनिकांच्या गरजा सरकार पुर्ण करत नाही.

सियाचीन सह अधिक उंचावर असणाऱ्या खडतर अशा ठिकाणी देशाची सेवा करणाऱ्या सैनिकांकडे खाण्यापिण्याच्या साहित्यासह, रहाण्याची, अशा तापमानात आवश्यक असणाऱ्या साधणांची कमतरता आहे. आवश्यक असणाऱ्या अशा गोष्टींवर सरकामार्फत लक्ष दिले जात नसल्याचा ठपका कॅगच्या अहवालामध्ये देण्यात आलेला आहे.

कॅगचा एक अहवाल संसदेत मांडण्यात आला.

या रिपोर्टमध्ये सांगण्यात आलं आहे की, 

उंचावर असणाऱ्या क्षेत्रासाठी आवश्यक असणारे विशेष कपडे, आवश्यक असणारी इतर साधने, उपकरणे यांच्या खरेदीमध्ये चार वर्षांचा विलंब करण्यात आला. कॅगच्या अहवालानुसार उंचावरील क्षेत्रासाठी लागणाऱ्या विशेष प्रकारच्या गॉगलसाठी ६२ टक्यांची कमतरता आली आहे.

नोव्हेंबर २०१५ ते सप्टेंबर २०१६ (नोव्हेंबर २०१६ साली नोटबंदी करण्यात आली, त्यानिमित्ताने ATM लाईनमध्ये उभे राहण्याऱ्या लोकांना सियाचीनमधील सैनिकांचे दाखले भाजप समर्थकांकडून देण्यात येत होते.) या काळात आवश्यक असणारे मल्टी पर्पज बूट देखील देता येवू शकले नाहीत. त्यामुळे सियाचीनमधील सैनिकांना जूने बुट दूरुस्त करुन वापरावे लागले होते.

कॅगच्या रिपोर्टमध्ये इंडियन नॅशनल युनिवर्सिटीच्या स्थापनेत होत असणाऱ्या विलंबाबात देखील ताशेरे ओढण्यात आले आहेत. १९९९ चसाली झालेल्या कारगील युद्धानंतर एक समिती स्थापन करण्यात आली होती. कॅगच्या मते या योजनेसाठीच्या ३९५ कोटीं संभाव्य निधी या विलंबामुळे ४००७.२२ कोटी इतका झाला आहे. तरिही ही योजनेबाबत कोणतिही हालचाल होत नाही.

यंदाच्या अर्थसंकल्पात एकूण GDP च्या 1.5 टक्के निधी हा तिन्ही दलांसाठी देण्यात आलेला आहे. ही टक्केवारी १९६२ नंतरची सर्वात कमी टक्केवारी असल्याची माहिती देण्यात आली आहे. वर्षांनुवर्षे तिन्ही दलांकडून थकित असणाऱ्या कामांसाठी मोठ्या प्रमाणात निधी मिळणारी अपेक्षा होती मात्र मागील वर्षीच्या तुलनेत अंशत: वाढ यावर्षी करण्यात आली आहे. गेल्या वर्षी ३.१८ लाख कोटींचा निधी संरक्षण दलांसाठी देण्यात आला होता तो यावर्षी ३.३७ लाख कोटी करण्यात आला.

संदर्भ : https://www.thehindu.com/news/national/siachen-troops-given-poor-gear-cag/article30728491.ece

Leave A Reply

Your email address will not be published.