बुलेट ट्रेनची कार्बन कॉपी असणाऱ्या ‘वंदे भारत’ ट्रेनमुळे येत्या ३ वर्षात प्रवास सुस्साट होणार

आजचा दिवस बजेटचा ! यातून मोठे उद्योजक ते सामान्य नागरिक या बजेटकडे लक्ष देऊन बसतात.  बजेटच्या जास्त खोलात जरी जात नसतील तरी प्रत्येक सामान्य नागरिकांसाठी हा अर्थ संकल्प महत्वाचा असतो, अर्थातच बजेटकडून अनेकांना अपेक्षा असतात.

पंतप्रधान मोदी यांनी मागील वर्षीच्या १५ ऑगस्ट रोजी लाल किल्ल्यावरून घोषणा केली होती की स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाच्या ७५ व्या आठवड्यात ७५ वंदे भारत एक्सप्रेस गाड्या देशाच्या कानाकोपऱ्यात पोहोचतील. या भारतीय रेल्वेच्या सध्याच्या दोन वंदे भारत एक्सप्रेस गाड्यांव्यतिरिक्त असतील. पहिली ट्रेन वाराणसी-दिल्ली मार्गासाठी आणि दुसरी कटरा-दिल्ली मार्गासाठी सुरू करण्यात आली.

अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी संसदेत येत्या आर्थिक वर्षासाठी पेपरलेस केंद्रीय अर्थसंकल्प जाहीर केला. आपण जाणतोच कि, २०१७ पासून रेल्वे अर्थसंकल्प हा एकूण में अर्थसंकल्पात च बिलीं केला गेला असून आता एकत्रच दोन्ही बजेट सादर केले जातात. यंदाच्या बजेट मध्ये भारतीय रेल्वेचे नेटवर्क अपग्रेड करण्यासाठी अनेक घोषणा करण्यात आल्या आहेत. याशिवाय, पीएम गति शक्ती मास्टर प्लॅनसह पायाभूत सुविधा क्षेत्राला मोठ्या प्रमाणावर चालना मिळेल. असो काही काळापासून चर्चेत असणाऱ्या वंदे भारत एक्स्प्रेसबाबत आज अर्थसंकल्प सादर करताना अधिकृत घोषणा केली आहे. 

केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी अर्थसंकल्प सादर करताना ४०० वंदे भारत एक्स्प्रेसची घोषणा केली आहे.

“एक उत्पादन एक रेल्वे स्टेशन लोकप्रिय केले जाईल, आणि ४०० नवीन वंदे भारत रेल्वे गाड्या सादर केल्या जातील,” ४०० नवीन पिढीच्या वंदे भारत गाड्या पुढील ३ वर्षात चांगल्या कार्यक्षमतेने आणल्या जातील, पुढील ३ वर्षांमध्ये १००PM गति शक्ती कार्गो टर्मिनल विकसित केले जातील आणि मेट्रो सिस्टीम तयार करण्यासाठी नाविन्यपूर्ण मार्गांची अंमलबजावणी केली जाईल,” असं सीतारामन यांनी २०२२-२३ च्या बजेट भाषणात सांगितले.

येत्या ३ वर्षांत या ४०० वंदे भारत एक्स्प्रेस धावणार आहेत. 

आधी माहिती घेऊ कि, ‘वंदे भारत एक्स्प्रेस’ आहे तरी काय?

‘वंदे भारत एक्स्प्रेस’ ही भारताची सेमी हायस्पीड रेल्वे आहे. वंदे भारत एक्सप्रेस’चा कमाल वेग १३० किमी प्रति तास इतका आहे. चेन्नईतील  इंटिग्रल कोच कारखान्यामध्ये या एक्स्प्रेसची निर्मिती करण्यात आली. ‘मेक इन इंडिया या धोरणाअंतर्गत १८ महिन्यात १०० कोटी खर्चून या सेमी हायस्पीडची संकल्पना प्रत्यक्षात उतरवण्यात यश आले. फेब्रुवारी २०१९ मध्ये नवी दिल्ली-वाराणसी दरम्यान ही एक्स्प्रेस प्रवाशांच्या सेवेत रुजू झाली आहे. 

पीएम गतीशक्ती योजनेद्वारे एक्स्प्रेस हायवे विकसित करण्याचे ध्येय असणाऱ्या या योजनेसाठी २५ हजार कोटी रुपयांचा खर्च प्रस्तावित वाहतूक आणि दळवळण वेगवान होणार.  त्यातून दोन गोष्टी साध्य होणार आहेत त्या म्हणजे, एक प्रवासाचा वेळ कमी होणार अन दुसरं म्हणजे इंधनाचा खर्च कमी वाचणार आहे असे अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी घोषणा करताना म्हटले आहे.

कशी असणार आहे हि ट्रेन?

वंदे भारत एक्सप्रेस २०१९ मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी वाणसी ते नवी दिल्ली दरम्यान सुरू केली होती. याला ट्रेन१८ असेही म्हणतात. देशातील ही अशा प्रकारची पहिलीच आणि वेगवान ट्रेन आहे. त्याचा लूक अगदीच बुलेट ट्रेनसारखा बनवण्यात आला आहे.

नवीन वंदे भारत ट्रेन्स आधुनिक वैशिष्ट्यांनी सुसज्ज असतील.  ज्यामध्ये अशी उत्कृष्ट आधुनिक वैशिष्ट्ये असतील जी आपत्कालीन परिस्थितीत लोकांना सुरक्षितरित्या बाहेर पडण्यास मदत करतील. आपत्कालीन परिस्थितीत प्रवाशांना सहज बाहेर काढण्यासाठी या ट्रेनमध्ये चार आपत्कालीन खिडक्या बसवण्यात येणार आहेत. ट्रेनमधील इमर्जंसी पुश बटणांची संख्या दोनवरून चार करण्यात येणार आहे. वंदे भारत ही देशातील पहिली ट्रेन आहे जी अत्याधुनिक वैशिष्ट्यांनी सुसज्ज लोकोमोटिव्ह इंजिनशिवाय धावली आहे.

तसेच या नवीन आगामी वंदे भारत ट्रेनमध्ये GPS-आधारित पॅसेंजर इन्फॉर्मेशन सिस्टीम, सीसीटीव्ही कॅमेरे, ऑटोमॅटिक स्लाइडिंग डोअर्स आणि व्हॅक्यूम बेस्ड बायो टॉयलेट यासारख्या अत्याधुनिक सुविधा असणार आहेत. 

याशिवाय विमानात असतात त्याप्रमाणे या ट्रेनमध्ये एअर होस्टेस असणार आहेत. 

विमान प्रवासात तुमच्या मदतीसाठी जशा एअर होस्टेस असतात, त्याच प्रकारे होस्टेस आता या वंदे भारत ट्रेनमध्ये असणार आहेत. या ट्रेनच्या प्रवासात तुमच्या मदतीसाठी या होस्टेस असणार आहेत. इतक्या फॅसिलिटीज आणि आता एअर होस्टेसदेखील असणार त्यामुळे सेवा देण्याच्या बाबतीत भारतीय रेल्वे आता थेट विमानासोबत स्पर्धेत उतरल्याच्या चर्चा आहेत. थोडक्यात वंदे भारत हि प्रीमियन ट्रेन्समध्ये गणली जाणार आहे. 

याने काय फरक पडणार आहे ?

आता पुढील ३ वर्षात या ट्रेन आपल्या सेवेत येणार म्हणजे, त्याचे कामकाज देखील येत्या ३ वर्षात पूर्ण व्हायलं लागेल. अर्थमंत्र्यांनी सांगितल्याप्रमाणे, १००PM गती शक्ती कार्गो टर्मिनल पुढील तीन वर्षांत बांधले जातील. यासोबतच ८ नवीन रोपवे बांधण्यात येणार आहेत. २०२२-२३ दरम्यान राष्ट्रीय महामार्गाची लांबी २५,००० किमीपर्यंत वाढवण्यात येणार असल्याचे अर्थमंत्र्यांनी सांगितलेय. डोंगराळ भागातील पर्वतमाळा रस्ता पीपीपी मोडवर आणण्यात येणार आहे. तसेच अर्थमंत्री म्हणाल्या की, शेतकरी, तरुणांना अर्थसंकल्पाचा फायदा होईल. आत्मनिर्भर भारतातील १६ लाख तरुणांना नोकऱ्या दिल्या जाणार आहेत…आता या प्लॅननुसार वंदे भारत ट्रेन योजनेचा अवलंब होणार काय हे पाहणे महत्वाचे आहे.

हे हि वाच भिडू :

 

 

 

 

 

 

Leave A Reply

Your email address will not be published.