दोन वर्षांपूर्वी जाहिरात काढली पण परीक्षा घ्यायला रेल्वे विभाग तयारचं होत नाहीये

भारताच्या इतिहासात चळवळ, मोहिमा, आंदोनलातून बऱ्याच गोष्टींना उजाळा मिळालाय. एवढंच काय आपल्याला  स्वातंत्र्य सुद्धा चळवळींमधूनच तर मिळालंय. आणि हे चित्र फक्त भारतापुरतं नाही तर जगभरात आपल्या मागण्या पूर्ण करण्याचे एकमेव साधन म्हणजे चळवळ.

आता चळवळ म्हंटल कि, आपल्याला रस्त्यावर  उतरून आपल्या हक्काची मागणी करणारे कार्यकर्त्ये अर्थात लोक आठवतात. पण काही वर्षांपासून ऑनलाईन चळवळीला सुद्धा तितक्याच मोठ्या स्तरावर प्रतिसाद मिळतोय. ही ऑनलाईन चळवळ म्हणजे हॅशटॅगचा वापर करणं.

हॅशटॅग हे एक असं माध्यम आहे, ज्याच्या मदतीने सोशल मीडियावर समान कल्पना एकत्रित आणल्या जातात.  जेव्हा बरेच लोक एकाच वेळी एकाच प्रकारची गोष्ट किंवा कल्पना पोस्ट करू लागतात, तेव्हा तो हॅशटॅग ट्रेंडिंग सुरू होतो.  या हॅशटॅगची एक फायद्याची गोष्ट म्हणजे आपला आवाज एक विशिष्ठ भागापुरता मर्यादित न राहता जगभरात त्याची दखल घेतली जाते. 

आता सुद्धा भारतात सोशल मीडियावर #JusticeForRailwayStudents हा हॅशटॅग ट्रेंड होतोय. आतापर्यंत जवळपास ३० लाखांपेक्षा जास्त लोकांनी हा हॅशटॅग ट्विट केलायं. जो सकाळपासूनच ट्विटरवर धुमाकूळ घालतोय. 

हा हॅशटॅग ट्रेंड होण्यामागचं कारण म्हणजे गेल्या २ वर्षांपूर्वी रेल्वेने विभागातील रिकाम्या जागांसाठी भरतीची जाहिरात काढली होती. पण त्यासाठी विद्यार्थी आजही आंदोलन करत आहेत.  रेल्वेने २०१९ च्या फेब्रुवारी महिन्यात भरतीची  जाहिरात प्रसिद्ध केली होती. यात मोठ्या संख्येने रिक्त पदांवर भरती करण्यात येत होती. यात दोन कॅटेगरी होत्या. 

पहिली कॅटेगरी NTPC म्हणजेच नॉन-टेक्निकल पॉप्युलर कॅटेगरी ज्यात ३५ हजार २०८ पदांवर भरती केली जाणार होती. या कॅटेगरीत लिपिक, तिकीट लिपिक, गुड्स गार्ड, स्टेशन मास्तर अशा पदांवर भरती केली जाते. या जाहिरातीनंतर एनटीपीसीसाठी सुमारे १ कोटी २६ लाख लोकांनी अर्ज केला होता. या जागांसाठी अर्जदारांची परीक्षा त्याच वर्षी जून ते सप्टेंबर या कालावधीत होणार होती.

तर दुसरी कॅटेगरी ग्रुप डीची. या कॅटेगरीत १ लाख ३ हजार ७६९ जागा रिक्त होत्या. या जागांसाठी सुद्धा १ कोटी १५ लाख अर्ज प्राप्त मिळाले होते. NTPC परीक्षेनंतर २०१९ मधेच सप्टेंबर-ऑक्टोबर महिन्यात ग्रुप डीची परीक्षा होणार होती. म्हणजे आपण दोन्ही कॅटेगरीचा विचार केला तर एकूण अर्जदारांची संख्या ४० लाख एवढी होती. पण या दोन्हीही परीक्षा वेळापत्रकानुसार घेण्यात आल्या नाहीत. 

आता यात कोरोनाचं कारण सरकारने दिलं, पण या काळातही अनेक महत्वाच्या परीक्षा घेण्यात आल्या. पण या रेल्वेच्या परीक्षा मात्र सतत पुढे ढकलण्यात आल्या. 

याच पार्श्वभूमीवर गेल्या २०२० च्या सप्टेंबरमध्ये बेरोजगार तरुणांची मोठी चळवळ समोर आली,  जी सोशल मीडियापासून रस्त्यावर उतरण्यापर्यंत प्रचंड होती. यात सगळ्याच क्षेत्रातील बेरोजगार तरुणांनी सहभाग घेतला होता. परीक्षा कधी होणार? भर्ती कधी करणार असे प्रश्न या तरुणांनी सरकारला विचारला होता.

हे आंदोलन इतके पेटले होते कि, सरकारला सुद्धा याची दखल घ्यावी लागली. यानंतर सरकारने डेट शीट जारी केली होती. ज्यात आधी एनटीपीसी आणि नंतर ग्रुप डी ची परीक्षा घेणार असल्याचे सांगितले. NTPC ची पहिल्या टप्प्यातील परीक्षा डिसेंबर २०२० पासून सुरू झाली आणि जुलै २०२१ मध्ये संपली.

आता आंदोलनामुळे दबावाखाली येऊन का असेना सरकारने परीक्षा घेतल्या. पण या परीक्षांचा निकाल अजून लागलेला नाही. म्हणजे आधी परीक्षा घ्या म्ह्णून आंदोलन करणारे विद्यार्थी आता परीक्षेचा निकाल लावावा म्ह्णून आंदोलन करत आहेत.

एनटीपीसीच्या परीक्षेचा एक टप्पा तरी झाला. पण ग्रुप डीच्या विद्यार्थिनीची परीक्षा अजून झालेली नाही. आणि या परीक्षांची जाहिरात निघून जवळपास २ वर्ष झालीत.

त्यात रेल्वे विभागाने या परीक्षांच्या प्रत्येक फॉर्मसाठी ५०० रुपये घेतले आहेत. म्हणजे जवळपास ६०० कोटींपेक्षा जास्त पैसे रेल्वेला या परीक्षांच्या फॉर्ममधून मिळालेत.  पण अजूनही ग्रुप डीचे फॉर्म भरणाऱ्या एक कोटी १५ लाख लोकांना माहीतच नाहीये कि,  त्यांची परीक्षा नेमकी होणार तरी कधी? 

याबाबत आंदोलनाच्या माध्यमातून  रेल्वे विभागाला प्रत्यक्षवेळी जाब विचारण्यात आला. मात्र विभाग विद्यार्थ्यांच्या या प्रश्नावर मूग गिळून गप्प आहे. 

हे ही वाच भिडू :

Leave A Reply

Your email address will not be published.