सोलापूरचं काय घेवून बसलाय, हा माणूस बियरवर पाऊस पाडून दाखवतोय ! 

काल एक राडा झाला आहे. त्या राडाची चर्चा तुमच्या कानावर आलीच असेल. आली नसली तर आम्ही सांगतो, तर झाल काय की सोलापूरात वरिष्ठ पातळीवर कृत्रीम पाउस पाडण्याचे आदेश आले. महाराष्ट्रात विमानातून कृत्रीम पाऊस पाडायचा प्रयोग जयंत पाटलांनी मागच करुन दाखवलेला मात्र यंदाची गोष्ट खास होती. कारण हा पाऊस चक्क फुकटात पडणार होता. 

मॅटर असा आहे की, पन्नास किलो मीठ, ३ क्विंटल लाकडं, टायर वगैरे वगैरे माळरानावर उभ्यानं जाळायची. त्याचा धूर ढगात जाणार. तो धूर ढगांना चार्ज करणार आणि पाऊस पडणार. प्रशासन कामाला लागलं आणि सोलापूरातल्या तीन तालुक्यात हा प्रयोग राबवला. 

पाऊस पण पडला हे विशेष !! 

आत्ता खरोखरत ढग चार्ज झाले का योगायोग झाला हे ढगांनाच माहिती पण झाडं जाळून पाउस पाडायची दिवाळखोरी उभ्या महाराष्ट्राला बघायला मिळाली हे विशेष. आत्ता सोलापुरच्या प्रशासनाकडं कौतुकानं बघितलं जातय. वाह काय अचाट कामगिरी केली. त्यांच्याकडे बघणाऱ्यांचे डोळे जरासे किलकिले व्हावेत म्हणून त्यांच्यापेक्षा भन्नाट माणसाची स्टोरी आम्ही तुमच्यापुढं घेवून आलोय. 

तर हे व्यक्ती काय करतात तर बियर आणि जीनच्या दोन बाटल्यांवर पाऊस पाडून दाखवतात. आणि हो पाऊस फक्त पाडतच नाहीत तर थांबवून पण दाखवतात. 

नायझेरियात राहणारे गॉडविन ओनासेदू .. ते म्हणतात, 

“मी सांगितलं पाऊस पडं तर पाऊस पडतो, मी सांगितल पाऊस पडू नको तर पाऊस पडत नाही !!! 

हाण तिच्या मारी … फुल्ल कॉन्फिडन्स.. 

तर यावर BBC ने देखील एक स्टोरी केली आहे. हा रिपोर्टर त्याच्या गावात जातो आणि विचारतो, दाखवता का पाऊस पाडून. गॉडवीन ओके म्हणतो बियर पितो आणि कामाला लागतो. काही वेळातच पाऊस पडायला सुरवात होते. 

पण मुद्दा असाय नायझेरियाचा हा भाग जास्त पाउस पडणाराच आहे. आपल्या कोकणासारखा. त्यामुळे त्यांच्याकड असणार दुसरं स्किल लांकासाठी जास्त महत्वाच आहे. ते म्हणजे गॉडवीन हे पाउस बंद देखील करु शकतात. कुणाच्या घरात लग्न वगैरे असलं. तर पावसामुळं खोळंबा नको म्हणून माणसं त्यांना सांगून ठेवतात. मग हा माणूस पुन्हा बियर पितो आणि कामाला लागतो. थांब म्हणतो आणि पाऊस थांबतो… 

आत्ता हा योगायोग म्हणायचा कि दूसरं काही.. तर दूसरं तिसरं काहीच नाही असल्या गोष्टी योगायोगच असतात. जशा कालच्या सोलापूरातल्या कृत्रीम पावसामुळे झाल्या. तिथल्या प्रशासनानं लाकडं जाळून पाउस पाडला त्यापेक्षा तर कमी खर्च गॉडवीनला लागतो. फक्त बियर मग काय पाऊसच पाऊस. 

हे ही वाचा –  

Leave A Reply

Your email address will not be published.