राज कपूरने गहाण पडलेला स्टुडिओ आणि घर सोडवण्यासाठी काढलेला पिक्चर म्हणजे बॉबी
राज कपुरच्या आयुष्यातला सर्वात महत्वकांक्षी सिनेमा कोणता, तर तो मेरा नाम जोकर. आज मेरा नाम जोकर हा एक कल्ट पिक्चर वाटू शकतो पण सिनेमागृहात हा पिक्चर जोरात आपटला होता. या सिनेमासाठी राज कपूरने आपला आर.के. स्टुडिओ आणि घर देखील गहाण ठेवलं होतं.
त्यातून आलेल्या पैशातून बरीच कमाई होईल असा त्याचा अंदाज होता पण तो अंदाज चुकला आणि आजवर मिळवलेलं सगळं खड्ड्यात जाण्याची वेळ आली.
आत्ता राजकपूर समोर एकच पर्याय होता तो म्हणजे पैसा उभा करायचा. बरीच माणसं काय करतात तर एका धंद्यात नुकसान आलं की ते भरून काढण्यासाठी दूसरा धंदा शोधतात. पण दूसऱ्या धंद्यातली गणितं माहिती नसल्याने ते परत बुडतात. आमचा एक मित्र म्हणतो की जिथे तुमचा पैसा जातो तिथूनच तो काढायचा असतो.
राज कपूरने पण असाच डाव खेळला. पण मेरा नाम जोकर पेक्षा हा डाव अती घातकी होता. त्याचं मुख्य कारण सिनेमाची स्टोरी नाही तर सिनेमाचा नायक..
मनात आलं असत तर एखाद्या सेटल झालेल्या सुपरस्टारला घेवून तो सिनेमा करू शकला असता. पण या सर्व चक्रव्युहातून सुटण्यासाठी दोन नवीन चेहऱ्यांना घेवून त्याने सिनेमा करायचं ठरवलं. यातला पहिला चेहरा होता तो डिंपल कपाडियाचा आणि दूसरा चेहरा होता तो ऋषी कपूरचा..
ऋषी कपूरसाठी देखील तसाच अवसानघातकी निर्णय होता. एकदा फ्लॉपचा शिक्का लागला तर ऋषी कपूरसाठी कायमचे सिनेसृष्टीचे दरवाजे बंद होणार होते. तरिही राज कपूरने त्याला लॉन्च करायचा निर्णय घेतला.
हा सिनेमा होता बॉबी…
झालं अस की कमी बजेट, कमी मानधन आणि तेवढेच चार पैसे कमावण्याच उद्देश ठेवून बॉबी तयार करण्यात आला. बॉबी थेटरात आला आणि एकामागून एक कमाईचे आकडे ऐवू लागले. त्या काळात सर्वाधिक कमाई करणारा सिनेमा होता देवानंदचा जॉनी मेरा नाम. जॉनी मेरा नाम ने प्रत्येक विभागातून किमान ५० लाख मिळवल्याचं सांगण्यात येत होतं.
बॉबीची कमाई समोर आली तेव्हा प्रत्येक विभागातला आकडा कोटीत जावू लागला.
या सिनेमामुळे राज कपूरला आपलं घर आणि स्टुडिओ दोन्ही गोष्टी वाचवता आल्या. ऋषी कपूर स्टार बनला. डिंपल स्टार झाली. सिनेमाच्या सहा महिन्यापुर्वीच डिंपलने काका सोबत लग्न केलं होतं. पण या सर्व घडामोडीत राज कपूरला एक सक्सेसफुल सिनेमा देता आल्याचं समाधान देखील होतं.
हे ही वाच भिडू.
- वाजपेयींना हरवण्यासाठी कॉंग्रेसने बॉबी सिनेमा दाखवण्यास सुरवात केली
- राजदूत, RD350 आणि बॉबी निर्माण गाड्या काढून त्यांनी एका पिढीवर उपकार केलं.
- बायकोची परवानगी काढून राज कपूर यांनी मेरा नाम जोकर साठी चिंटूला साईन केलं