‘बोल राधा संगम होगा के नही’ राज कपूरने विचारले आणि नवी लव्ह स्टोरी सुरू झाली…

बॉलिवूडचा सुपरस्टार राज कपूर आपल्या अभिनयामुळे नेहमीच नावाजला जातो. त्याने ‘बरसात’, ‘चोरी चोरी’, श्री चार सौ बीस’ अशा अनेक चित्रपटात आपल्या जबरदस्त अभिनयाने चाहत्यांकडून वाह वाह मिळवली आहे. यासोबतच राज कपूर जेवढा त्याच्या चित्रपटांमुळे चर्चेत आहे तेवढाच तो त्याच्या वैयक्तिक आयुष्यामूळेही तितकाच चर्चेत आहे. त्याचे रील्सपासून रीअल लाइफपर्यंतचे अनेक किस्से फेमस आहेत.

असाच राज कपूर आणि वैजयंतीमाला यांच्या लव्ह स्टोरीचा किस्सा नेहमीच चर्चेत असतो.

त्या दोघांच्या ‘संगम’ चित्रपटाच्या सेटवरचे फोटोजही सोशल मीडियावर नेहमी व्हायरल होत असतात. ‘संगम’ चित्रपट राज कपूरच्या सुपरहिट चित्रपटांपैकी एक. वैजयंतीमाला आणि राज कपूर यांच्या दमदार अभिनयामुळे या चित्रपटाने चाहत्यांच्या मनात स्पेशल जागा बनवली, जी आजतागायत कायम आहे.

पण या चित्रपटाच्या सेटवर त्यांची जूळालेली लव स्टोरी देखील तितकीच फेमस आहे. राज कपूरने सेटवर चमच्याने वैजयंतीमालाला खायला घालतानाचे फोटो सोशल मीडियावर पहायला मिळतील. 

वैजयंतीमालाने राज कपूर बॅनरच्या या चित्रपटातून त्याच्यासोबत काम करण्यास सुरुवात केली. असे म्हंटले जाते की, अनेक अभिनेत्रींनी या चित्रपटासाठी राधाची भूमिका करण्यास नकार दिला होता. शेवटी, राज कपूरने या भूमिकेसाठी वैजयंतीमालाशी संपर्क साधला आणि पण तिनेही ते सहजासहजी मान्य केले नाही.

राज कपूरने तिला या भूमिकेसाठी फोन केला होता, पण वैयजंतीमाला हे बराच वेळ टाळत होती.

दिलीप कुमारमुळे वैजयंतीमाला हा चित्रपट करू इच्छित नसल्याचीही चर्चा होती. त्या वेळी वैजयंती माला आणि दिलीप कुमार यांची जोडी पडद्यावर हिट होती आणि दोघांनी एकत्र अनेक चित्रपट केले होते. वैयजंतीमाला आपल्याला टाळतेय हे लक्षात आल्यावर राज कपूरने पुन्हा एकदा फोन केला आणि फिल्मी स्टाईलमध्ये विचारले,

‘बोल राधा बोल, संगम होगा के नही?’

यावर वैजयंतीमाला म्हणाली – ‘अरे बाबा होगा.’ मग काय, दोघांच्या जोडीने पडद्यावर धमाका केला.

याच चित्रपटादरम्यान राज कपूर आणि वैजयंतीमाला जवळ आले आणि नर्गिस त्यांच्यापासून दूर गेली. अशीही चर्चा आहे की, राज कपूर आणि वैजयंतीमाला यांची लव्ह स्टोरी समजल्यानंतर अभिनेत्याची पत्नी कृष्णा राज खूप अस्वस्थ झाली आणि मुलांसमवेत हॉटेलमध्ये राहायला गेली.

‘माझ्या वडिलांचे नर्गिसजींशी अफेअर होते’

त्रषी कपूर यांच्या ‘खुल्लम खुल्ला’ या पुस्तकात त्यांनी काही खुलासे केलेत, ज्यात या अफेअरचाही उल्लेख आहे. कृष्णा राज कपूर यांच्याशी लग्न केल्यानंतरही त्यांच्या वडिलांचे इतर महिलांसोबत संबंध असल्याचे या पुस्तकात सांगण्यात आले. त्यांनी लिहिले होते, ‘माझ्या वडिलांचे नर्गिसजींशी अफेअर होते, त्यावेळी मी खूप लहान होतो, त्यामुळे मला फारसा फरक पडला नाही.

त्यांनी पुढे म्हंटले की, ‘ घरात काही कमतरता होती हे मला आठवत नाही. पण मला आठवते की, वैजयंतीमालासोबतच्या अफेअर दरम्यान आम्हाला मुंबईतील नटराज हॉटेलमध्ये शिफ्ट व्हावे लागले होते.’

‘त्यानंतर दोन महिन्यांसाठी आम्ही चित्रकूटमधील एका अपार्टमेंटमध्ये शिफ्ट झालो. माझ्या वडिलांनी आमच्यासाठी हे अपार्टमेंट खरेदी केले. त्यांनी आईला समजवण्याचा खूप प्रयत्न केला पण तिच्या लाइफ या हा चॅप्टर क्लोज होईपर्यंत हार मानली नाही. असे म्हटले जाते की, वैजयंतीमालानेच कृष्णा राजला घरी परत आणले होते आणि तिने वचन दिले की ती राज कपूरसोबत इथून पुढे कोणताच चित्रपट करणार नाही.

हे ही वाच भिडू : 

Leave A Reply

Your email address will not be published.