राज कुंद्राच्या मित्राची बायको काही महिन्यांतच करोडपती बनली

सध्या राज कुंद्रा पोर्नोग्राफिक प्रकरण चांगलंच पेट घेतंय. पोर्नोग्राफिक फिल्म्स बनवून त्याची विक्री केल्याप्रकरणी अभिनेत्री शिल्पा शेट्टीचा नवरा राज कुंद्रा चांगलाच गोत्यात सापडलाय. या रॅकेटचा खुलासा झाल्यापासून दररोज वेगवेगळ्या घडामोडी समोर येतायेत. चौकशीचं सत्र सुरु आहे, नवनवीन लोकांची नाव समोर येतायेत,लोक ताब्यात घेतली जातायेत, त्यांची बँक खाती सीज केली जातायेत. पण प्रकरणाची सगळी माहिती अजूनही समोर आलेली नाही.

रायन थॉर्प, गहना वशिष्ठ, राज कुंद्राचा एक्स पीए उमेश कामत अश्या बऱ्याच लोकांची चौकशी सुरु असताना आणखी दोन नाव समोर आलीत. ती म्हणजे अरविंद श्रीवास्तव आणि त्यांची पत्नी हर्षिता श्रीवास्तव. मुंबई पोलीस क्राईम ब्रांचने या दोघांचीही बँक अकाउंट सीज केलीत. 

माहितीनुसार राज कुंद्राच्या स्पेशल व्हाट्सअप ग्रुपमध्ये अरविंद श्रीवास्तव हे नाव समोर आल्यानंतर चौकशीला नवीन वळण मिळालं. अरविंद श्रीवास्तव म्हणजेच यश ठाकुरच्या सीज केलेल्या या अकाउंटमध्ये जवळपास ६ कोटी रुपये होते. तसेच दुसऱ्या अकाउंटवर  २० महिन्यांत करोडो रुपये जमा झालेत. जे अकाउंट हर्षिता श्रीवास्तवच्या नावे आहे.

बँक ऑफ इंडियाच्या एक अधिकाऱ्याच्या म्हणण्यानुसार मुंबई पोलिसांनी त्यांना दोन बँक अकाउंट सीज करायला लावली. कारण गेल्या काही दिवसात या अकाउंटवर करोडो रुपये जमा झालेत. पोलिसांच्या मते हे बँक अकाउंट्स पोर्नोग्राफी प्रकरणाचा मुख्य आरोपी राज कुंद्राशी संबंधित आहेत. हे अकाउंट्स फ्लीज मुव्हीज नावाने पॉर्न विडिओ बनवणाऱ्या कंपनीशी जोडल्या गेलेल्या अरविंद श्रीवास्तव यांची पत्नी हर्षिता श्रीवास्तवच्या नावे आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, हर्षित श्रीवास्तवने १० जानेवारी २००८ ला कानपूरच्या बर्रा भागात असणाऱ्या पंजाब नॅशनल बँकेत आपले अकाउंट सुरु केले होते. त्यावेळी तिच्या अकाउंटवर फक्त २० हजार रुपये होते. मात्र मे २०१९ ते २०२१ च्या दरम्यान तब्ब्ल २ कोटी रुपये जमा झालेत. सध्या या अकाउंटमध्ये २ कोटी ३३ लाख २२२ रुपये जमा आहेत. त्यातले ९५ लाख गेल्या दोन महिन्यात जमा करण्यात आले होते. 

यात एक जानेवारीला ७ लाख, दोन जानेवारीला १५ लाख, पाच जानेवारीला १० लाख, एक फेब्रुवारीला ७ लाख, ८ फेब्रुवारीला १३ लाख. ९ फेब्रुवारीला १५ लाख, १० फेब्रुवारीला  १३ लाख आणि ११ फेब्रुवारीला   १५ लाख रुपये जमा झालेत. आता अचानक अकाउंटमध्ये एवढे पैसे जमा झाल्यानंतर क्राईम ब्रँचच्या सांगण्यावरून बँकेने अकाउंटचे ट्रॅन्जेक्शन बंद केलेत.

दरम्यान, हर्षिताच्या अकाउंटवर तिचा नवरा अरविंद पैसे ट्रान्सफर करायचा. जो सिंगापूरमध्ये राहतो. अरविंदनं हा पैसा पॉर्न व्हिडीओच्या माध्यमातून कमवल्याचा संशय पोलिसांना आहे. सध्या हर्षिताची तीनही बँक अकाउंट सीज करण्यात आलीत, ज्यात तब्ब्ल ४.२ कोटी रुपये जमा आहेत.

दरम्यान, अरविंद श्रीवास्तवचं नाव पोर्नोग्राफी प्रकरणात अनेक वेळा आलाय. पण चैकशी सुरु असलेल्या कोणीही या नावाचा उल्लेख केलेला नाही. त्यात आतापर्यंत पोलिसांना वाटायचं कि, अरविंद श्रीवास्तव आणि यश ठाकुर ही दोन वेगवेगळी नाव आहेत. ज्यामुळे या दोघांच्याही विरोधात लुक आउट नोटिस जारी करण्यात आलं होत. पण अरविंदने सांगितल्याप्रमाणं तो यश ठाकूर नावानं सोशल मीडिया चालवायचा. 

याआधीही एप्रिल महिन्यात  मुंबई पोलिसांनी एक चार्जशीट फाईल केली होती. ज्यात अरविंद श्रीवास्तव न्यूफ्लिक्स या पॉर्न कंपनीचा मालक असल्याचं सांगितलं गेलं होत. चार्जशीटमध्ये असंही म्हंटल गेलं कि, अरविंद दुसऱ्या कंपन्यांकडून पॉर्न व्हिडिओ खरेदी करून न्यूफ्लिक्स कंपनीची वेबसाईट आणि अॅपवर अपलोड करायचा.

पण अरविंदच्या म्हणण्यानुसार तो सिंगापूरमध्ये राहायचा आणि तिथं तो बऱ्याच कंपन्यांसाठी फ्रिलांसींग करायचा. त्याच मेन काम सर्वर मॅनेज करणं, ओटीटी प्लॅटफॉर्म डिजाईन करणं आणि न्यूफ्लिक्सच्या प्लॅटफॉर्मवर कंटेंट अपलोड करणं होत. तो न्यूफ्लिक्ससोबत एक फ्रिलान्सर कन्सल्टंट म्ह्णून जोडलेला होता.

राज कुंद्रा आणि अरविंद श्रीवास्तव कनेक्शन

राज कुंद्रा आपल्या अ‍ॅप आणि वेबसाइटसाठी बर्‍याच कंपन्यांकडून पॉर्न व्हिडिओ खरेदी करायचा. ज्यात न्यूफ्लिक्स सुद्धा आहे. आणि अरविंद न्यूफ्लिक्सचे ऑपरेशन्स मॅनेज करतो.  महत्वाचं म्हणजे राज जुन्द्र आपला सगळा व्यवसाय तीन व्हाट्सअप ग्रुपच्या माध्यमातून चालवतो. त्यातला सगळ्यात महत्वाचा ग्रुप एचएस नावाने आहे. याच ग्रुपमध्ये अरविंद श्रीवास्तव आहे. आणि  सगळ्यात जास्त देवाणघेवाण याच ग्रुपवरून झालीये.  अशा परिस्थितीत, या दोघांचे कनेक्शन असल्याची शक्यता आहे.

आता अरविंद खरं बोलतोय का पोलिसांनी दाखल केलेली चार्जशीट खरी आहे,हे आता चौकशी नंतरच समोर येईल.

हे ही वाच भिडू :

Leave A Reply

Your email address will not be published.