निवडणुकांचा निकाल काहीही असो राज ठाकरेंची मराठवाड्यातील क्रेझ कमी होत नसते

आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शहरातील सर्वच पक्ष झपाट्याने कामाला लागले आहेत.  त्याच्या तयारीचा भाग म्हणून राजकीय नेते आपल्या-आपल्या भागातल्या विकासकामांचा पाढाच वाचून दाखवत आहेत. तर काही नेते वादग्रस्त वक्तव्य करून चर्चेत येत आहेत. साहजिकच आहे त्यात कुणी जातीय, धर्मीय राजकारणाचा आधार घेतायेत.

आता पक्षप्रमूखांचं बोलायचं झालं तर असे बडे नेते वेगवेगळ्या भागातले दौरे आटोपत आहेत. त्यात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांचा मराठवाडा दौरा बराच चर्चेत आला आहे. इतर वेळेस मराठवाड्याकडे कुणी ढुंकूनही बघत नाही मात्र निवडणुकिंच्या काळातच या राजकीय नेत्यांना मराठवाड्याची आठवण येते हा भाग वेगळा..

आपण आता वळूया राज ठाकरे यांनी मराठवाडा दौरा काढण्यामागे काय राजकीय गणिते आहेत कारण आगामी महानगर पालिका आणि नगरपंचायत निवडणुकींच्या तयारीच्या दृष्टीने हा दौरा महत्वाचा मानला जातोय.

पक्षाने सांगितल्यानुसार, अध्यक्ष राज ठाकरे औरंगाबाद जिल्ह्यातील पक्षाच्या कामाचा आढवा घेण्यासाठी हा दौरा आयोजित केला होता. पण मुळात हा दौरा हा आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आहे. त्याबाबत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची महत्त्वपूर्ण बैठक आज औरंगाबादमध्ये आयोजित करण्यात आली होती. 

पण विशेष गोष्ट हि आहे कि, मनसेच्या इतिहासात आजवर पहिल्यांदाच मराठवाड्यात घेतली जाणारी मनसेची हि पहिलीच बैठक होती. 

त्यासाठी आदल्या दिवशीच राज ठाकरे औरंगाबादेत पोहचले होते. त्यांचे जंगी स्वागत देखील तिथे झाले. आटा आपण आगामी महापालिका निवडणुकीची तयारी म्हणून जरी हे दौरे आणि बैठका असतील तरीही साधं-सोपं लॉजिक आहे कि, महापालिका निवडणुकीचे निमित्त असेलही तरीही माणसे आता  मराठवाड्यात देखील एंट्री करू पाहतंय. तसाच राज्यभर पक्षाचं जाळं मजबूत करण्यासाठी जोरदार तयारी चालूये. त्यामुळे त्या अनुषंगाने राज ठाकरे यांचे येत्या काही काळात राज्यभर दौरे होऊ शकतात. 

मनसेने मराठवाडा पातळीवरील पदाधिकाऱ्यांची घेतलेलय बैठकीत मराठवाड्यातील आठही जिल्ह्यातील आणि तालुक्यांतील सुमारे १५०० पदाधिकारी हजर होते असं सांगण्यात येतंय.

पण या दौऱ्याच्या मानाने आणखी एक गोष्ट चर्चेत आली ती म्हणजे,  औरंगाबाद शहरात झालेली मनसे पक्षाची बॅनरबाजी, याची चर्चा संपूर्ण शहरभर होती. तसंच औरंगाबादेतल्या मुस्लिम बहुल भागात लावलेल्या ‘जय श्रीराम’ चे मोठ-मोठे बॅनर. त्यात भाजपसोबत जाण्याची त्यांची तयारी आणि आत्ताचे हे बॅनर यामुळे मनसे उघड-उघड  हिंदुत्वाचं कार्ड खेळतंय हे तर स्पष्ट आहे….जरी स्पष्ट फार्स नसेलही तरीही या बॅनरबाजीमुळे वातावरणनिर्मिती तरी नक्कीच झाली आहे.  

कारण याआधी मनसेने औरंगाबाद शहरात काय कामगिरी केली याचं फारसं सकारात्मक रेकॉर्ड नाहीये. कारण २०१५ मध्ये महापालिका निवडणुकीत मनसेने सहभाग घेतला नव्हता. त्याच्या २०१० मध्ये महापालिकेच्या निवडणुकीत मनसेने राज गौरव वानखेडे यांच्या निमित्ताने पहिल्यांदाच खाते उघडले होते. मात्र २०१४ च्या मोदीलाटेच्या प्रभावात येत हे नगरसेवक भाजपमध्ये दाखल झाले होते. त्यामुळे महापालिकेत मनसेचा एकही नगरसेवक नाहीये.

आता मनसेची नाशिकमधली ताकद पाहिली तर हे स्पष्ट आहे कि, मनसे तितकीशी औरंगाबादेत सक्रिय नाही आणि तितकं पक्षाचं वजनही नाही. 

 पण आत्ता मनसेला औरंगाबादेत चांगले दिवस येऊ शकतात.

मात्र असं बोललं जातंय कि, यावेळेस औरंगाबादमध्ये यंदाच्या महापालिका निवडणुकीत पक्षाला  शकते. कारण सुरुवातीपासून हिंदुत्वाच्या मुद्द्यावरून आणि संभाजीनगरच्या नामकारणाच्या मुद्द्यावरून हा भाग शिवसेनेचा गड मानला जातो. पण औरंगाबादची जनता यंदा पक्षावर नाराज आहे असं एकंदरीत चित्र आहे. 

एकीकडे भावनिकतेचं राजकारण बोलावं तर औरंगाबादचं नाव संभाजीनगर करावं या मुद्द्यावर सेने खाई बोलेना आणि सामान्य लोकांचं बोलावं तर इथे,  रखडलेली पाणी योजना, भरभक्कम पाणीपट्टी, अनियमित होणारा पाणीपुरवठा, गुंठेवारी, मंद गतीने सुरु असलेली रस्त्याची कामे, त्यामुळे गल्लोगलीतल्या नागरिकांचे हाल, या बऱ्याच कारणांमुळे जनता वैतागलेली आहे. 

आणि येथील राजकीय अंदाज पाहता सेने आणि भाजपचं ताकदीचे पक्ष राहिलेले आहेत. पण आता मनसेने इथे एन्ट्री मारल्यामुळे असं एक चित्र आहे कि, येथी जनता मनसेला संधी देऊन बघेल. थोडक्यात आता मनसेने स्वबळावर उमेदवार उतरवले किंव्हा भाजपसोबत युती केली तरीही जवळपास मनसे ताकदवान ठरण्याची चिन्हे आहेत.

आणि असंही मनसेने आक्रमक हिंदुत्वाकडे वाटचाल करत असताना शिवसेनेचे मुद्दे हायजॅक करण्याचा प्रयत्न केला आहे, पण सेनेवर टीका करत वेगळ्या पद्धतीने हे मुद्दे मांडण्याचा प्रयत्न करत आहे. यातच मराठवाडा दौऱ्यावर मनसे अध्यक्ष राज ठाकरे असल्यामुळे औरंगाबादचं नाव संभाजीनगर करावं अशी मागणी येत्या निवडणुकीत मुख्य मुद्दा असू शकतो. कारण शहरामध्ये राज ठाकरे यांच्या स्वागताचे बॅनर लावण्यात आले आहेत. या बॅनरवर मनसेकडून संभाजीनगर असा उल्लेख करण्यात आलाय. त्यामुळे शिवसेनेच्या हातातून औरंगाबाद की संभाजीनगर हा मुद्दा राज ठाकरे महानगरपालिकेच्या निवडणुकीत वापरतील याचेही संकेत दिसतायेत.

मराठवाड्यात राज ठाकरेंची क्रेझ खूप आहे…

राज ठाकरे जेंव्हा औरंगाबाद दौऱ्यासाठी आले तेंव्हापासूनच तेथील कार्यकर्ते उत्सुक होते. जेंव्हा राज ठाकरेंचा ताफा औरंगाबादमध्ये आला तेंव्हा औरंगाबादकरांसाठी चांगळीच डोकेदुखी ठरली होती.औरंगाबादमध्ये राज ठाकरेंनी प्रवेश करताच त्यांचा मनसे कार्यकर्ते व नेत्यांकडून जंगी स्वागत करण्यात आलं होतं.  यावेळी बाबा पेट्रोल पपांवर ठाकरे यांचा ताफा येताच मनसे कार्यकर्त्यांनी मोठी घोषणाबाजी करत त्यांच स्वागत केलं होतं. यावेळी कार्यकर्ते थेट रस्त्यावरच जमा झाल्याने मोठी वाहतूक कोंडी झाली होती. 

त्यामुळे ट्रॅफिक जाम झाली, त्याच्या बंदोबस्तसाठी हजर असलेल्या पोलिसांची चांगलीच धावपळ झाली होती. यावरूनच कळते राज ठाकरेंची मराठवाड्यात बरीच लोकप्रियता आहे.

 

 

 

 

Leave A Reply

Your email address will not be published.