अख्या पिढीला ‘वयात’ आणणारा राजा हिंदुस्तानी चा किस्स !

राजा हिंदुस्तानी रिलीज होऊन जवळपास पंचवीस वर्ष झाले. आपल्या पैकी बरेच जण कळत्या न कळत्या वयाचे होते. पण या पिक्चर मधल्या एका सीन मुळे कळत्या वयाकडे आपले पाउल पडले.

आता भिडूना सांगायची गरज नाही कोणत्या सीन बद्दल आम्ही बोलतोय ते. तोच तो आमीर खान आणि करिश्मा कपूरचा जगप्रसिद्ध किस्स.

आज हिंदी इंग्लिशच काय तर मराठी पिक्चर मध्ये कीसच्या बाबतीत बच्चू राहिले नाहीत. पण तेव्हाची गोष्ट वेगळी होती. किस वगैरे गोष्टी मेन स्ट्रीम सिनेमा मध्ये शांतम् पापम् होत्या. जास्तीतजास्त असल्या तर पप्प्या असायच्या.  कीस व्हायचे पण ते ‘बी’ ग्रेड सिनेमा मध्ये. त्याच बऱ्यापैकी चित्रण अश्लिलच असायचं. किस हा रोमांटिक प्रकार आहे हे भारतीय प्रेक्षकांच्या गावीही नव्हते.

या पिक्चरची स्टोरी टिपिकल श्रीमंत मुलगी, गरीब टॅक्सीवाला, सावत्र आई या वळणाने जाणारी होती. खरंतर दिग्दर्शक धर्मेश दर्शन यांनी या पिक्चरची स्टोरी जेव्हा आमीर आणि करिश्माला ऐकवली तेव्हा आमीर खान ने पिक्चरला नकार दिला होता. नुकतच त्याला हटके पिक्चरमध्ये काम करायच्या वेडाने झपाटले होते आणि हा तर टिपिकल मसाला सिनेमा होता. धर्मेश दर्शनने अक्षरशः त्याचा पिच्छा पुरवला.

हीच गोष्ट हिरोईनची. नुकत्याच मिस वर्ल्ड जिंकलेल्या ऐश्वर्यापासून ते जुही चावला पूजा भट्ट या सगळ्यांनी नकार दिला आणि शेवटी करिश्मा कपूरने हा सिनेमा साईन केला.

करिश्माची ओळख तेव्हा राज कपूरची न शोभणारी नात अशीच होती. या पिक्चरसाठी धर्मेश दर्शन आणि ड्रेस डिझायनर मनिष मल्होत्रा यांनी तिचा पूर्ण मेकओव्हर केला. करिश्मा कपूर या नावाभोवती ग्लॅमर निर्माण करण्याच क्रेडीट ती नेहमी या दोघांना देते.

पिक्चर तुफान हिट झाला. सगळ्यात जास्त पिक्चर मधली गाणी हिट झाली. संगीतकार नदीम श्रवण यांनी त्यांची जादू परत पडद्यावर दाखवली होती. यावेळी त्यांनी कुमार सानू-अनुराधा पौडवाल या त्यांच्या आवडत्या जोडी पेक्षा अलका याज्ञिक-उदित नारायण या गायकांना वापरले होते.  “आये हो मेरी जिंदगी में तुम बहार बनके “, किंवा “पुछो जरा पुछो मुझे क्या हुवा है “वगैरे सगळीच गाणी भारी होती .पण या मधल्या एका गाण्यान इतिहास घडवला “परदेसी परदेसी जाना नही

मै ये नही कहती के प्यार मत करना

किसी मुसाफिर का मगर ऐतबार मत करना

अशी फिलॉसोफीकल सुरवात करणाऱ्या गाण्यामध्ये शंभर अरजीतसिंग एकत्र रडावेत एवढा दर्द होता.

या दर्दच्या मागे पार्श्वभूमीपण होती. पिक्चर मध्ये दहाच मिनिटांपूर्वी तो फेमस किसिंगचा सीन झालेला.

झालं अस की टॅक्सीड्राईवर कम गाईड असलेला आमीर शहरातल्या मेमसाबला उर्फ करिश्माला  रानीखेत गावातल सौंदर्य दाखवत असतो. त्याच्या निरागस गाण्याला (नुसरत फतेह आली खानच्या गाण्यावरून ढापलेल कितना सोना तुझे रबने बनाया )  भाळून आणि अचानक आलेल्या पावसाने रोमांटिक होऊन बेबि मेमसाब आणि राजाजी कीस करतात. तेही फ्रेंच वालं आणि तब्बल ५२ सेकंद.

हिंदी चित्रपट इतिहासातला हा सर्वात मोठा कीस सुरु असतो इतक्यात पाउस थांबतो, ढग हटतात. करिश्मा आणि आमीर भानावर येतात.

करिश्मा गावाकडच्या मुली प्रमाणे तिथून धूम ठोकते आणि अमीरची केएलपीडी होते. लगेच पुढच्या सीन मध्ये करिश्मा आपल्या बापाबरोबर समान बांधून परत आपल्या घरी जायला निघते. आमीरच दुर्दैव म्हणजे त्यालाच ड्राईवर म्हणून जाव लागत.

आता एवढ दर्द साठल्यावर परदेसी परदेसी सारख गाणच बाहेर पडणार ना?

राजा हिंदुस्तानीने सुपरस्टार आमीर खान ला आठ नॉमिनेशन च्या प्रतीक्षेनंतर पहिला फिल्मफेअर मिळवून दिला. मात्र पिक्चरची चर्चा कीस ,परदेसी गाण आणि चिकणी झालेली करिश्मा यांचीच झाली. होणारच ना. इम्रान हाश्मी ने पुढे किती तरी कीस घेतले पण ५२ सेकंदात भारताल्या मुलांना वयात आणणारा कीस म्हणजे राजा हिंदुस्तानीच!!!

हे ही वाच भिडू.

Leave A Reply

Your email address will not be published.